
India Pakistan War Fact Check : ऑपरेशन सिंधूनंतर पाकिस्तानच्या उलट्या बोंबा अजूनही थांबण्याचं नाव घेत नाहीये. या देशाकडून भारताबाबत अपप्रचार केला जातोय. भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर पाकिस्तानमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळे दावे केले जात आहेत. याच दाव्यांना पीआयबीकडून फॅक्ट चेकच्या माध्यमातून फेटाळून लावले जात आहे. यावेळी तर पाकिस्तानने अजब असा अपप्रचार केला आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या नावाने पाकिस्तानतर्फे एक खोटे पत्र व्हायरल केले जात आहे. याच पत्राला खोटं असल्याचं पीआयबीने म्हटलं आहे.
भारतीय सेनेने हे पत्र दिलेले नाही असे पीआयबीने सांगितले आहे. याच पत्राचा आधार घेत पाकिस्तानी सोशल मीडिया अकाऊंट्सद्वारे चुकीचा प्रचार केला जात आहे. भारतातील नागरिकांनी अशा चुकीच्या माहितीपासून दूर राहावे. तसेच भारत सरकारद्वारे अधिकृतपणे देण्यात आलेल्या माहितीवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन पीआयबीने केले आहे. या खोट्या पत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उदमपूर हवाई तळाला भेट दिल्याचाही दावा करण्यात आला आहे. यासोबत या पत्रात 112 सैनिक शहीद झाल्याचाही दावा करण्यात आला आहे. या सर्व दाव्यांना पीआयबीने खोटं असल्याचं सांगितलं आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणावाची स्थिती झाल्यापासून पाकिस्तानी सोशल मीडिया अकाऊंट्सने याआधी अनेक खोटे दावे केले होते. पीआयबीने हे दावे खोटे असल्याचे सांगितले होते. नुकतेच एक इन्फोग्राफिक व्हायरल करण्यात आले होते. यात भारत-पाकिस्तान संघर्षात कोणाचे किती नुकसान झाले, याची तुलना करण्यात आली होती. एलओसीवरील संघर्षाबाबतही यात वेगवेगळे दावे करण्यात आले होते. हे सर्व दावे पीआयबीने फेटाळून लावले होते.
A #FAKE letter purportedly addressed by Defence Minister of India, @rajnathsingh, to General Officer Commanding-in-Chief, Northern Command is being shared on social media.
✅ It is being spread by Pakistani accounts as False Propaganda aimed at spreading… pic.twitter.com/u8TCH21hIx
— PIB Fact Check (@PIBFactCheck) May 15, 2025
काही दिवसांपूर्वी भारतीय सेनेसाठी मदत मागितली जात आहे, असा मेसेज व्हायरल करण्यात आला होता. सेनेच्या आधुनिकीकरणासाटी तसेच शस्त्र खरेदी करण्यासाठी एक बँक खाते खोलण्यात आले आहे. या बँक खात्यात तुम्ही एक रुपयाजरी टाकला तरी त्यातून भारत देशाची सेना ही जगातील सर्वाधिक ताकवान सेना बनेल, असे सांगण्यात आले होते. पीआयबीने हा दावाही खोटा असल्याचे सांगितले होते.