Stampede: माणूसकी मेली, स्टेडियम बाहेर चाहत्यांना CPR तर आत खेळाडूंचा सत्कार

१८ वर्षांनंतर आरसीबीने आयपीएल ट्रॉफी जिंकल्याचा आनंद उत्सव साजरा करण्यासाठी लाखो चाहते स्टेडियमबाहेर जमले होते. त्यानंतर विजयी खेळाडूंची परेड सुरु असतानाच ही चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली आहे.

Stampede: माणूसकी मेली, स्टेडियम बाहेर चाहत्यांना CPR तर आत खेळाडूंचा सत्कार
| Updated on: Jun 04, 2025 | 7:13 PM

IPL मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलुरु ( RCB ) च्या विजयानंतर झालेल्या मिरवणूकीत चेंगराचेंगरीत दहा जण ठार झाले आहेत. या बंगळुरु स्टेडियममध्ये बाहेर चाहते चेंगराचेंगरी होऊन गुदमरत असताना आत मात्र विजयी खेळाडूंचा सत्कार होत होता असे विचित्र दृश्य माणूसकीलाही लाजवणारे होते. रॉयल चॅलेंजर्स बंगलुरुच्या ( RCB ) विजयानंतर बाहेर मातम सुरु असताना आत खेळाडू राज्य सरकारकडून हार तुरे स्वीकारत असल्याचा प्रकार पाहून यावर आता कठोर टीका होत आहे.

जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर

१८ वर्षांनंतर आरसीबीने आयपीएल ट्रॉफी जिंकली होती. त्यामुळे काल रात्री संपूर्ण बंगळुरु शहरात दिवाळी सुरु होती. आज विजेते वीर विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी बंगळुरुत पोहचले. लाखो लोक स्टेडियमच्या दावर चाहत्यांची एक झलक पाहण्यासाठी चातका प्रमाणे स्टार खेळाडूंची वाट पाहात होते. गर्दी आवाक्या बाहेर जातेय याचा अंदाज आला तेव्हा खूपच उशीर झाला होता. त्यामुळे पोलिसांनी नेहमीचा लाठीमाराचा उपाय शोधला. परंतू त्याने परिस्थिती आणखीनच हाताबाहेर गेली. या घटनेत महिला आणि लहान मुलांचा मृत्यू झाल्याचे म्हटले जात आहे.

येथे पोस्ट पाहा –

 गेटमधून शिरत असतानाच चेंगराचेंगरी

प्रत्यक्षदर्शींच्या मते, विजयी मिरवणूकी दरम्यान, गर्दी अचानक स्टेडियमच्या आत जाण्याचा प्रयत्न करु लागली. त्यामुळे तिकीट काढलेले प्रेक्षक गेटमधून शिरत असतानाच विनातिकीट चाहते अनियंत्रित झाले. ज्यामुळे गोंधळ उडाला. यात अनेक लोक चिरडले गेले आणि डझनभर जखमी झाले आहेत. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, विजयी मिरवणूकीनंतर सर्व चाहते खेळाडूंची एक झलक पाहण्याासाठी गर्दी करीत असतानाच अचानक स्टेडियमच्या आत आणि बाहेर गर्दी अनियंत्रित झाल्यामुळे गोंधळ उडाला. १० चाहते यात चिरडले गेले आणि २० हून जखमी झाले.

येथे पोस्ट पाहा –