गेल्यावर्षी मुंबईत २० वर्ल्ड कप मिरवणूकीत मरिन ड्राईव्हच्या वानखेडेत टळले, ते बंगळुरुत घडले…
आरसीबी संघाच्या विजयी खेळाडूंची मिरवणूक काढली केला जात असताना बंगळुरु येथे चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली आहे. अशीच मिरवणूक गेल्या वर्षी २० वर्ल्ड कप जिंकल्यानंतर मुंबईत मरीन ड्राईव्हवर काढण्यात आली होती. तेव्हाही अशीच चेंगराचेंगरी झाली होती.

आरसीबी संघाची विजयी मिरवणूक सुरु असताना क्रिकेट स्टारना पाहाण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमवर प्रचंड गर्दी केली होती. त्यानंतर बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये संपूर्ण क्रिकेट संघाचा सत्कार होणार होता. त्यासाठी विजयी मिरवणूकीतून खेळाडू कारमधून जात असतानाच हा चेंगरा चेंगरीचा प्रकार घडला आहे. यात १० जणांचा मृत्यू झाल्याचे म्हटले जात आहे. विशेष म्हणजे मुंबईतील मरीन ड्राईव्ह येथे गेल्यावर्षी ४ जुलै २०२४ रोजी येथे २०-२० वर्ल्ड कप जिंकल्यानंतर मिरवणूक निघाली असताना स्टार क्रिकेट पटूंना पाहण्यासाठी आलेले प्रेक्षक एकमेकांवर पडून चेंगराचेंगरी झाली होती. त्यावेळी सुदैवाने कोणाचा मृत्यू झाला नव्हता. बंगळुरु येथील घटनेने मुंबईतील मरीन ड्राईव्ह येथील मिरवणूकीच्या कटू स्मृती जाग्या झाल्या आहेत.
आरसीबी संघाच्या विजयी खेळाडूंची मिरवणूक काढली केला जात असताना बंगळुरु येथे चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली आहे. या मिरवणूकीला मोठी गर्दी उसळली होती. मात्र विजयोत्सव साजरा करताना गर्दी किती होईल याचे भान न राहिल्याने का दुखद प्रकार घडला आहे. असे काही घडेल अशी कोणालाही अपेक्षा नव्हती.
येथे पोस्ट पाहा –
#WATCH | Bengaluru: Fans climb over the M Chinnaswamy Stadium walls and fences; police appeal to people to leave and not indulge in such activities
A large number of #RoyalChallengersBengaluru fans have turned up to catch a glimpse of their champion team.
A special… pic.twitter.com/CBn37w9xxp
— ANI (@ANI) June 4, 2025
स्टार खेळाडूंची एक झलक पाहण्यासाठी….
चिन्नास्वामी स्टेडियमजवळ खेळाडू वाहनातून आत शिरत असताना त्यांची एक झलक पाहणाऱ्यांनी इतकी गर्दी केली ती पोलिसांच्या आवाक्याबाहेर गेली. त्याचे परिवर्तन गर्दीच्या लाटेत. चेंगराचेंगरी झाली आणि त्यात १० जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. या चेंगराचेंगरीत २० जण जखमीही झाले आहेत. वृत्तानुसार, एका व्यक्तीची प्रकृती गंभीर आहे.
येथे पोस्ट पाहा –
From Fireworks to Sirens.💔
What should’ve been a sea of celebration for #RCB turned into a scene of sorrow.
Outside #chinnaswamystadium , joy turned to tragedy — 11 lives lost, 20+ injured in a stampede. This isn’t how a victory should end. Prayers for the families. 🕯️#RCBWin… pic.twitter.com/MgHfKFb4kR
— Ashish Kumar Meher (@AshishMeher7) June 4, 2025
पुष्पा – २ च्या प्रदर्शनातही चेंगराचेंगरी
हैदराबाद येथे पुप्षा २ चित्रपटाच्या प्रिमीयरला अभिनेता अल्लू अर्जून याला पाहाण्यासाठी जमलेल्या जमावाने चेंगराचेंगरी होऊन एका 34 वर्षीय महिलेचा मृत्यू तर तिचा लहान मुलगा गंभीर जखमी झाला होता. या घटनेनंतर अभिनेता अल्लू अर्जून याच्यावर गुन्हा दाखल करुन आंध्र सरकारने अटक केली होती. त्यानंतर त्याला जामीन झाला. त्यानंतर कोमात गेलेल्या या लहान मुलाला अभिनेता अल्लू अर्जून मदतही केली होती.
महाकुंभ मेळ्यातही चेंगराचेंगरी
उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे महाकुंभ मेळात पविस्र स्नानाचा मुहूर्त गाठण्यासाठी पहाटे गंगा तीराकडे धावत निघालेल्या जमावाने झोपलेल्या श्रद्धाळूंना चिरडले होते. तसेच रेल्वे स्थानकातही महाकुंभसाठी गाडी पकडताना चेंगराचेंगरी होऊन प्रवाशांचा मृत्यू झाला होता.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
