AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घृणास्पद! ‘मुलीला 3 लाखात विक…’, हॉस्पिटलबाहेरच दीराचा मोठा राडा, महिलेला सर्वांसमोर…

एकीकडे मुलीला लक्ष्मी मानतात, तर दुसरीकडे मुलीला विक... असं म्हणणाऱ्या विकृत लोकांची सख्या देखील फार मोठी आहे... अशीच घटना समोर येतेय, जिथे दीराना हॉस्पिटलबाहेरच मोठा राडा घातला आणि सर्वांसमोरच महिलेला...

घृणास्पद! 'मुलीला 3 लाखात विक...', हॉस्पिटलबाहेरच दीराचा मोठा राडा, महिलेला सर्वांसमोर...
| Updated on: Mar 24, 2026 | 10:43 AM
Share

महिला आणि तिच्या मुलीसोबत माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुलीच्या जन्मानंतर निराश झालेल्या सासरच्या मंडळींनी महिलेला मारहाण केली आणि नुकताच जन्मलेल्या मुलीसोबत तिला हॉस्पिटलच्या बाहेर काढलं.. हॉस्पिटर परिसरात बराच वेळ गोंधळ सुरु होता आणि पीडित महिला न्याय मिळेल यासाठी अनेकांकडे मदत मागत होता… घटना समोर आल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. अनेक जण असे आहेत, जे मुलीला लक्ष्मी मानतात, पण दुसरीकडे समाजातील काही लोक अद्यापही त्यात भुरसट विचारात जगत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंतरीन नावाच्या महिलेचं लग्न वसीम नावाच्या एका व्यक्तीसोबत 11 महिन्यांपूर्वी झालेलं. सात दिवसांपूर्वी मुंतरीन हिने एका खासगी रुग्णालयात एका मुलीला जन्म दिला… आरोप असे आहेत की, वसीम आणि त्याच्या कुटुंबियांना मुलगा होईल अशी अपेक्षा होती. पण मुलगा झाल्यामुळे मंतरीन हिच्या सासरचे नाराज होते.

सोमवारी म्हणजे 23 मार्च रोजी मुंतरीन टाके काढण्यासाठी रुग्णालयात पोहोचली… तेव्हा तिचे आई – वडील देखील तिच्यासोबत होतो… हॉस्पिटलचं बिल भरण्यासाठी मुंतरीन हिचे हिचे आई – वडील आले. याच दरम्यान, नवरा वसीम आणि त्याच्या कुटुंबियांनी मुलगी झाली म्हणून, मुंतरीन हिला टोमना मारला, तेव्हा मुंतरिन हिने काही दिवसांसाठी माहेरी जाते… असं सासरच्या मंडळींना विचारलं… अशात संतापलेल्या वसीम आणि त्याच्या भावांनी महिलेला मारलं आणि चिमुकलीसोबत बाहेर जाण्यास सांगितलं.

संतापलेल्या वसीम आणि त्याच्या कुटुंबियांनी फक्त मुंतरीन हिलाच नाहीतर, तिचा बचाव करण्यासाठी आलेल्या तिच्या आई – वडिलांना देखील मारहाण केली… हॉस्पिटलबाहेर, पीडितेच्या कुटुंबीयांनी न्यायाची मागणी केली आणि बराच वेळ गोंधळ सुरू होता. बघ्यांनी आणि वाटसरूंनी हस्तक्षेप करून परिस्थिती शांत केली. घटनेची माहिती मिळताच, पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि आरोपी वसीम व इतरांना ताब्यात घेतलं.

पीडित मुंतारिनने दिलेल्या माहितीनुसार, तिला मुलगी झाल्यामुळे तिच्या सासू, सासरे, दीर, नणंद आणि मेहुण्याने तिला फटकारले. एवढंच नाही तर, मुलीला तीन लाखात विक असं दीर म्हणाला… पोलिसांनी देखील याप्रकरणी वक्तव्य केलं आहे, ‘सूनेला शिवीगाळ, मारहाण आणि तिच्यावर अत्याचार करण्यात आले आहेत. संपूर्ण चौकशी केल्यानंतर पुढील कारवाई करू…’ असं पोलीस म्हणाले आहे. ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेश येथील बिजनौर जिल्ह्यात घडली आहे.

Follow Us
अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
Lalbagcha Raja 2026 : अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन
सर्व गणेश भक्तांकडून समुद्राचं पाणी उडवत लालबागच्या राजाला सलामी
Lalbugcha Raja Visarjan : सर्व गणेश भक्तांकडून समुद्राचं पाणी उडवत लालबागच्या राजाला सलामी
मुंबई चौपाटीवर गणेश विसर्जनानंतर 'Sea Shore Shine' स्वच्छता मोहिम,
मुंबई चौपाटीवर गणेश विसर्जनानंतर 'Sea Shore Shine' स्वच्छता मोहिम, अमृता फडणवीसांचा निर्धार
कोळी बांधवांचा मान कायम! त्यांच्याच मदतीने होणार लालबागच्या राजाचे...
Lalbaugcha Raja Visarjan video : कोळी बांधवांचा मान कायम! त्यांच्याच मदतीने होणार लालबागच्या राजाचे विसर्जन
राजाची शेवटची आरती संपन्न थोड्याच वेळात राजाचा तराफा खोल समुद्रात...
Lalbaugcha Raja Visarjan : राजाची शेवटची आरती संपन्न थोड्याच वेळात राजाचा तराफा खोल समुद्रात जाणार
थोड्याच वेळात लालबागच्या राजचं विसर्जन होणार, भाविकांचे डोळे पाणावले
Lalbaugcha Raja Visarjan | थोड्याच वेळात लालबागच्या राजचं विसर्जन होणार, भाविकांचे डोळे पाणावले
लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी अनंत अंबानी गिरगाव चौपाटीवर उस्थिती
Anant Ambani : लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी अनंत अंबानी गिरगाव चौपाटीवर उस्थिती
ढोल-ताशांच्या गजरात चिंचपोकळीच्या चिंतामणीला निरोप; गिरगाव चौपाटीवर...
ढोल-ताशांच्या गजरात चिंचपोकळीच्या चिंतामणीला निरोप; गिरगाव चौपाटीवर भाविकांची गर्दी
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या च्या जयघोषात बाप्पाला निरोप
Mumbai Ganpati Visarjan | गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या च्या जयघोषात बाप्पाला निरोप