Rapido Harrasment : ‘ तू क्युट दिसतेस, एकटी राहतेस का..?’ रॅपिडो ड्रायव्हरचा तरूणीला आक्षेपार्ह मेसेज ! पुढे जे घडलं..

रॅपिडो चालकाने महिला प्रवाशाला मेसेज केल्याने ऑनलाइन कॅब सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राईडनंतर ड्रायव्हरने पर्सनल मेसेज पाठवल्याने डेटा गोपनीयतेची चिंता वाढली. सोशल मीडियावर यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. रॅपिडोने तात्काळ चौकशीचे आश्वासन दिले असून, महिलांच्या सुरक्षिततेसाठी कठोर उपाययोजनांची गरज अधोरेखित झाली आहे.

Rapido Harrasment :  तू क्युट दिसतेस, एकटी राहतेस का..? रॅपिडो ड्रायव्हरचा तरूणीला आक्षेपार्ह मेसेज ! पुढे जे घडलं..
Image Credit source: social media
| Updated on: Apr 21, 2026 | 8:53 AM

ऑनलाईन कॅब आणि बाईक टॅक्सी सेवांचा आजकाल सर्रास वापर केला जातो, मात्र त्या वापरणाऱ्या व्यक्तींच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण होताना दिसत आहे. रॅपिडो सेवेचा वापर करून झाल्यानंतर त्या ड्रायव्हरने पर्सनल तसेच आक्षेपार्ह मेसेज केल्याचा एका तरूणीने केला आहे. अनुश्का नावाच्या एका तरूणीने इन्स्टाग्रामवरील तिच्या अकाऊंटवरून हा भयावह अनुभव शेअर केला असून त्यामुळे हा मुद्दा चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर या प्रकरणाबाबात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील गाझियाबदामध्ये संबंधित घटना घडली आहे. अनुष्काने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर केलेल्या पोस्टमध्ये घटनेचा अनुभव कथन केला आहे. तिच्यासोबत जे घडलं, ते तिन स्पष्टपणे तिथे मांडलं. तिच्या राईडचा व्हिडीओ आणि संबंधित चालकाने पाठवलेले मेसेज, त्या चॅट्सचा फोटोही तिने सोबत जोडला आहे.

नेमकं काय घडलं ?

अनुष्काच्या म्हणण्यानुसार, घटनेच्या दरात्री तिची रॅपिडोची राईड पूर्ण झाल्यानंतरही त्या ड्रायव्हरने डायरेक्ट व्हॉट्सॲपवर मेसेज करत तिच्याशी संपर्क साधला. तिला तिच्या ड्रॉप पॉईंटवर सोडल्यावरही त्याने तिला मेसेज केला. ” ओळखलं नाहीस का? आत्ता तर ड्रॉप करून आलो” असं त्याने लिहीलं . त्यावर तरूणीने तू रॅपिडो रायडर आहेस का असा सवाल विचारल्यावर त्याने हो असं उत्तर दिलं. एवढंच नव्हे तर पुढे त्याने आणखीही मेसेज केला. “तू खूप क्युट दिसते. ट्रॅडिनशल कपड्यांत छान दिसत होतीस, तुझं वय काय ?” असे मेसेज त्या ड्रायव्हरने पुढे केले. ती एकटी राहते का असंही त्याने जाणून घेण्याचा प्रयत्न त्याने केला, असा दावा संबंधित तरूणीने केला आहे.

सोशल मीडियावर पोस्ट केले चॅट्स

त्यानंतर अनुकष्काने याचा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट करून याबाबत माहिती दिली. तिचा हा व्हिडीओ, रायडरचे ते चॅट्स बघता बघता व्हायरल झाले असून अनेकांनी यावर चिंता व्यक्त केली आहे. रायडरकडे त्या प्रवाशाचा नंबर कसा आला, असा प्रश्नही अनेकांनी विचारला आहे. त्यावरूनच प्रवाशांच्या डेटाच्या सुरक्षिततेबाबतही चिंता व्यक्त करण्यात आली.

 

दरम्यान अनुष्काच्या या पोस्टनंतर रॅपिडोकडून या प्रकरणावर रिस्पॉन्स देण्यात आला आहे. कंपनीतर्फे अनुष्काच्या कमेंट सेक्शनमध्ये रिप्लाय देण्यात आला. जे घडलं त्याबद्दल खेद व्यक्त करत, असं वागणं अस्वीकारार्ह असल्याचे कंपनीने स्पष्ट केलं. तसेच संबंधित “रायडरचे”चे वर्तन म्हणजे सेवा नियमांचे उल्लंघन असल्याचेही नमूद करण्यात आले. या प्रकरणाची तातडीने चौकशी करण्यात येणार असल्याचेही कंपनीने पुढे सांगितलं. डीऐम (Direct message) द्वारे तुमचा रजिस्टर्ड मोबाईल नंबर आणि राईड ID शेअर करावा, जेणेकरून योग्य ती कठोर कारवाई करता येईल, असंही कंपनीतर्फे सांगण्यात आलं.

Follow Us