AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ashok Kharat: खरातला मोठा दणका! कोट्यवधींच्या संपत्तीची राखरांगोळी, थेट साम्राज्यालाच मोठा सुरूंग, त्या व्यक्ती सुद्धा यंत्रणांच्या रडारवर

Ashok Kharat Case Update: तंत्र-मंत्राचा दावा करणारा भोंदू अशोक खरातचे सर्वच ग्रह फिरले आहे. अनेक महिलांचे लैंगिक शोषण, अनेकांची फसवणूक, धमकी प्रकरणात त्याचा पाय खोलात गेला आहे. कोट्यवधींची जमवलेली माया आता त्याच्या हातातून जाणार आहे.

Ashok Kharat: खरातला मोठा दणका! कोट्यवधींच्या संपत्तीची राखरांगोळी, थेट साम्राज्यालाच मोठा सुरूंग, त्या व्यक्ती सुद्धा यंत्रणांच्या रडारवर
अशोक खरातच्या संपत्तीची राखरांगोळीImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Apr 21, 2026 | 8:35 AM
Share

Ashok Kharat ED : भोंदू अशोक खरातचा पाया आणखी खोलात गेला आहे. तंत्र-मंत्राचा, अघोरी पूजेचा धाक दाखवून त्याने अनेक महिलांची अब्रु लुटली. अनेक महिलांचे लैंगिक शोषण केले. हा लिंगपिसाट आता चांगलाच अडकला आहे. राजकीय प्रभावाचा आणि प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांचा वापर करून त्याने मोठे साम्राज्य उभारले. त्या साम्राज्यालाच आता सुरूंग लागला आहे. एसआयटी नंतर याप्रकरणात इतर यंत्रणी उतरल्या. त्यात सक्तवसुली संचालनालयाने (ED) त्याला चांगलाच दणका दिला आहे. कोट्यवधींची जमावलेली माया आता हातातून जाणार आहे. त्याच्या संपत्तीची राखरांगोळी होणार आहे.

ईडी आणणार संपत्तीवर टाच

भोंदू खरातच्या कोट्यवधींच्या प्रॉपर्टीवर ईडी कडून तात्पुरती टाच येणार असल्याची मोठी अपडेट समोर येत आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ED कडून कारवाईला वेग आला आहे. ईडीकडून संबंधित मालमत्तांची तपशीलवार छाननी सुरू झाली आहे. संशयित व्यवहारांमुळे कोट्यवधींची संपत्ती अडचणीत आली आहे. बोगस गुंतवणूक, फसवणूक आणि मनी लॉड्रिंगबाबत अद्याप तपास सुरूच आहे. विविध ठिकाणी छापे टाकून महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. संबंधित बँक व्यवहार आणि आर्थिक व्यवहारांची चौकशी काही बँक खाती देखील सील करण्यात आली आहेत.

सहकारी रडारवर

भोंदू अशोक खरातशी काही प्रशासकीय अधिकाऱ्यांचे व्यवहार आणि भागीदारी समोर आली आहे. त्यात जिल्हाधिकाऱ्यांपासून तर प्रशासकीय सेवेतील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या अधिकाऱ्यांच्या पत्नी आणि खरात यांची काही व्यावसायिक भागीदारी समोर आली आहे. तर काही राजकारण्यांचे पंटर आणि पीए सुद्धा यंत्रणांच्या रडारवर असल्याचे समजते. त्यांच्या मदतीने खरातने मोठे साम्राज्य तर उभारलेच. पण अनेक ठिकाण त्याने यंत्रणांवर दबावही आणला. त्याचे प्रस्थ असल्याने त्याच्याविरोधात तक्रार देऊनही कारवाई झाली नसल्याचे समोर आले आहे. आता त्याच्या अशा व्यावसायिक भागीदार आणि इतर सहकारी तपास यंत्रणांच्या रडारवर आले आहेत. पुढील काही दिवसांत मोठ्या कारवाईची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.

राजकीय नेत्यांवर कारवाई का नाही?

दरम्यान याप्रकरणात अनेक राजकीय नेत्यांचे अशोक खरातसोबतचे थेट संबंध उघड झाले आहेत. त्यांची व्यावसायिक भागीदारीही समोर आली आहे. इतकेच नाही तर त्यांनी खरातला वाचवण्यासाठी वेळोवेळी दबाव आणल्याचेही समोर आले आहे. तरी सुद्धा या राजकीय नेत्यांना अभय का देण्यात येत आहे असा सवाल सर्वसामान्यांना पडला आहे. सरकार वेळकाढूपणा करत असल्याचे आणि याप्रकरणातील दुवे नष्ट करण्याचे काम करत असल्याचा आरोप विरोधक सातत्याने करत आहेत.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...