Teacher Crime: पाया न पडल्यानं शिक्षिका भडकली, विद्यार्थ्यांना रांगेत उभं केलं अन्… भयंकर प्रकाराने खळबळ!

सकाळच्या प्रार्थनेनंतर पाया न पडल्यामुळे संपातलेल्या महिला शिक्षिकेने 31 मुलांना बेदम मारहाण केली असल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

Teacher Crime: पाया न पडल्यानं शिक्षिका भडकली, विद्यार्थ्यांना रांगेत उभं केलं अन्... भयंकर प्रकाराने खळबळ!
Teacher Crime
Updated on: Sep 17, 2025 | 10:50 PM

विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याची जबाबदारी शिक्षकांची असते. त्यांना योग्य मार्गदर्शन करणे, चुकल्यास समजाऊन सांगणे हे शिक्षकांचे काम असते. मात्र आता ओडिशाच्या मयूरभंज जिल्ह्यातील एका सरकारी शाळेत एका महिला शिक्षिकेने विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. यामागील कारण म्हणजे हे विद्यार्थी सकाळच्या प्रार्थनेनंतर शिक्षिकेच्या पाया पडले नव्हते, त्यामुळे संपातलेल्या शिक्षिकेने 31 मुलांना बेदम मारहाण केली असल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

ओडिशातील मयूरभंज जिल्ह्यातील बैसिंगा पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या खांडदेउला येथील शाळेत ही घटना घडली आहे. प्रार्थनेनंतर पाया न पडल्यामुळे संतापलेल्या सुकांती कर या शिक्षिकेने सहावी ते आठवी या वर्गातील 31 मुलांना एका रांगेत उभे करत बेदम मारहाण केली आहे. त्यानंतर आता शिक्षण विभागाने या महिला शिक्षिकेला तात्काळ निलंबित केले आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार नेहमीप्रमाणे शाळेत सकाळी प्रार्थना झाली. शाळेच्या परंपरेनुसार, प्रार्थनेनंतर मुले शिक्षकांच्या पाया पडून आशीर्वाद घेतात. ज्यावेळी मुले शिक्षकांच्या पाया पडली तेव्हा सुकांती कर या हजर नव्हत्या. ज्यावेळी त्या शाळेत पोहोचल्या तेव्हा मुले वर्गात वर्गात निघून गेली होती. यामुळे संतापलेल्या शिक्षिकेने मुलांना रांगेत उभे केले आणि काठीने बेदम मारहाण केली.

एका विद्यार्थ्याचा हात मोडला

शिक्षिकेने केलेल्या या मारहाणीत एका मुलाचा हात मोडला आहे, तसेच एक विद्यार्थिनी बेशुद्ध पडली होती. बेशुद्ध मुलीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.या घटनेमुळे शाळा आणि परिसरात खळबळ उडाली. शाळा व्यवस्थापन समितीने तातडीने तपास सुरू केला. मुख्याध्यापक पूर्णचंद्र ओझा, गटशिक्षण अधिकारी बिप्लब कर, क्लस्टर रिसोर्स सेंटर समन्वयक देबाशिष साहू आणि इतरांनीमुलांच्या प्रकृतीची पाहणी केली.

आरोपी शिक्षिका निलंबित

या घटनेच्या तपासात शिक्षिका सुकांती कर यांनी मुलांना मारहण केल्याचे स्पष्ट झाले आहे. हा मारहाण बेकायदेशीर आहे. आता शिक्षिका सुकांती कर यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. शिक्षण विभागाने या प्रकरणी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे, त्यामुळे आता या शिक्षिकेवर आणखी कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे. सध्या शाळेने सर्व विद्यार्थ्यांच्या उपचाराची जबाबदारी घेतली आहे. मात्र आता मुलांना एवढ्या क्रुरपणे मारहाण करणे किती योग्य आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.