AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नसबंदी केल्यानंतरही जन्माला आलं पाचवं मुलं, महिलेची न्यायालयात धाव, न्यायाधीशांनी काय दिला आदेश?

एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, नसबंदी केल्यानंतर देखील पाचवं मुलं जन्माला आल्यानं महिलेनं न्यायालयात धाव घेतली होती. तब्बल 9 वर्षांच्या न्यायालयीन लढाईनंतर अखेर या महिलेला न्याय मिळाला आहे.

नसबंदी केल्यानंतरही जन्माला आलं पाचवं मुलं, महिलेची न्यायालयात धाव, न्यायाधीशांनी काय दिला आदेश?
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 21, 2025 | 8:20 PM
Share

बाडमेरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, नसबंदी केल्यानंतर देखील पाचवं मुलं जन्माला आल्यानं महिलेनं न्यायालयात धाव घेतली होती. तब्बल 9 वर्षांच्या न्यायालयीन लढाईनंतर अखेर या महिलेला न्याय मिळाला आहे. मुख्य वैद्यकीय आणि आरोग्य अधिकारी (CMHO) यांची अधिकृत सरकारी गाडी जप्त करून या महिलेला चार लाख रुपये देण्याचे आदेश बाडमेर येथील न्यायालयानं दिले आहेत. पपु देवी असं या महिलेचं नाव आहे.

पपु देवी यांना तब्बल 9 वर्ष प्रशासकीय यंत्रणांविरोधात न्यायालयीन लढाई लढल्यानंतर अखेर यश मिळालं आहे. या प्रकरणावर सुनावणी करताना मुख्य वैद्यकीय आणि आरोग्य अधिकारी यांची अधिकृत गाडी जप्त करून या महिलेला चार लाख रुपयांची भरपाई देण्यात यावी, असे आदेश न्यायालयानं दिले आहेत. त्यामुळे आता पपु देवी यांना चार लाख रुपये मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

हे प्रकरण 2008 सालचं आहे, बाडमेरमधील रहिवासी असलेल्या पपु देवी यांनी नसबंदीचं ऑपरेशन केलं होतं. त्यांना आधीच चार मुलं होती, मात्र नसबंदीचं ऑपरेशन केल्यानंतर देखील त्या गर्भवती राहिल्या, त्यांनी पाचव्या मुलाला जन्म दिला. याविरोधात त्यांनी आरोग्य विभाग आणि जबाबदार डॉक्टरांच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली. आपल्या पाचव्या मुलाच्या पालन पोषणाचा खर्च हा आरोग्य विभागाकडून मिळावा अशी त्यांनी मागणी केली होती.

त्यानंतर 2016 साली या प्रकरणात जिल्हा सत्र न्यायालयानं आदेश दिला होता की, या महिलेला तिच्या मुलाच्या पालनपोषणासाठी खर्च देण्यात यावा, मात्र न्यायालयाच्या निर्णयानंतर देखील या महिलेला एकही रुपयाची मदत मिळाली नाही. त्यानंतर तीने पुन्हा न्यायालयात धाव घेतली, यावेळी मात्र न्यायालयानं या प्रकरणात मुख्य वैद्यकीय आणि आरोग्य अधिकारी यांची अधिकृत गाडी जप्त करण्याचे आदेश दिले आहेत, त्यातून या महिलेला चार लाखांची मदत करावी असं न्यायालयानं म्हटलं आहे. या निर्णयावर पपू देवी यांच्याकडून समाधान व्यक्त करण्यात आलं आहे, त्यांना आता चरा लाखांची मदत मिळणार आहे.

Follow Us
विकसीत महाराष्ट्राच्या दिशेने एक पाऊल पुढे; CM फडणवीसांच्या हस्ते...
विकसीत महाराष्ट्राच्या दिशेने एक पाऊल पुढे; CM फडणवीसांच्या हस्ते नागपूरमध्ये AI लॅबचे भव्य उद्घाटन
मोठी बातमी! महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला प्रकाश आंबेडकरांचं...
मोठी बातमी! महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला प्रकाश आंबेडकरांचं आव्हान, थेट कोर्टात...
अभिजीत दीपके भेटीवरून भाजपच्या बड्या नेत्यांची नाराजी; थेट...
अभिजीत दीपके भेटीवरून भाजपच्या बड्या नेत्यांची नाराजी; थेट म्हणाले, शिंदेंनी त्यांच्या नेत्यांना...
विकास कामांसाठी... देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीला जाणार? भाजपच्या बड्या
विकास कामांसाठी... देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीला जाणार? भाजपच्या बड्या पुढाऱ्याने अखेर सांगितलंच
नाना पटोले यांचे धुतले दुधाने पाय, विरोधकांकडून टीका होताच कार्यकर्ता
नाना पटोले यांचे धुतले दुधाने पाय, विरोधकांकडून टीका होताच कार्यकर्ता म्हणाला..
अखेर तेच घडलं! राष्ट्रवादी गटाला मोठा धक्का? बीडमधील...
अखेर तेच घडलं! राष्ट्रवादी गटाला मोठा धक्का? बीडमधील पवारांच्या नेत्याचा भाजपला पाठिंबा?
संकष्ट चतुर्थीनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी
Pune | संकष्ट चतुर्थीनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी
CJP च्या मोठ्या हालचाली, संभाजीनगरात 15 ते 20 प्रमुख सदस्य... पुन्हा
CJP च्या मोठ्या हालचाली, संभाजीनगरात 15 ते 20 प्रमुख सदस्य... पुन्हा देशभराचं लक्ष वेधणार?
थेट एकनाथ शिंदेंशी पंगा! पुन्हा भाजप नेत्याचं सुचक विधान, महायुतीत...
Eknath Shinde | थेट एकनाथ शिंदेंशी पंगा! पुन्हा भाजप नेत्याचं सुचक विधान, महायुतीत खडाजंगी
बाळासाहेबांसह, आनंद दिघे सुद्धा गायब! शिंदेंच्या बॅनरवर अमित शहांचा...
बाळासाहेबांसह, आनंद दिघे सुद्धा गायब! शिंदेंच्या बॅनरवर अमित शहांचा भलामोठा फोटो पाहून राऊत संतापले