‘फार्म हाऊसमधील खोलीत नेत माझे कपडे काढले अन्…’; प्रज्वल रेवण्णाचा भाऊ सूरजवर पीडित मुलाचे गंभीर आरोप

देशातील कथित सर्वात मोठ्या सेक्स स्कँन्डल प्रकरणात नवीन अपडेट समोर आली आहे. प्रज्ज्वल रेवण्णाचा भाऊ सूरज रेवण्णा याच्यावर पीडित मुलाने गंभीर आणि धक्कदायक आरोप केले आहेत.

फार्म हाऊसमधील खोलीत नेत माझे कपडे काढले अन्...; प्रज्वल रेवण्णाचा भाऊ सूरजवर पीडित मुलाचे गंभीर आरोप
| Updated on: Jun 22, 2024 | 11:31 PM

देशातील लोकसभा निवडणुकीमध्ये माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या नातवाचे धक्कादायक व्हिडीओ समोर आले होते. याच कथित सेक्स स्कँन्डल प्रकरणात नवीन ट्विस्ट आलाय.  माजी खासदार आरोपी प्रज्वल रेवण्णावर लैंगिक शोषणाचे आरोप आहेत. अशातच आता रेवण्णा यांच्या घरातील आणखी एका सदस्याविरोधात पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल झाला आहे. रेवण्णा यांच्या घरातील हा सदस्य दुसरा तिसरा कोणी नसून प्रज्वल रेवण्णाचा भाऊ सूरज रेवण्णा आहे. महत्त्वाचं म्हणजे सूरज रेवण्णाविरूद्ध एक मुलाने एफआयआर दाखल केला आहे.

सूरज रेवण्णांवर गंभीर आरोप

सूरज रेवण्णाने 16 जूनला त्यांच्या फार्म हाऊसवर बोलावलं होतं. तिथे गेल्यावर सुरूवातीला खूप छान बोलले. मात्र काही वेळाने त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि कानाला स्पर्श करू लागले. मी घाबरलो, त्यानंतर किस करत चावू लागला. धक्का देत मी पळण्याचा प्रयत्न केला. पण त्यावेळी तो माझ्यावर चिडलो आणि म्हणाला या फार्म हाऊसवर तु एकटाच आहेस. माझ्या परिवाराबद्दल तुला माहिती नाही. मला मारण्याची धमकी दिली आणि रूममध्ये निघून गेले. आतमध्ये गेल्यावर माझ्यासोबत अश्लील भाषेत बोलू लागले, माझ्या प्रायव्हेट पार्टला हात लावला कपडे काढले आणि जबरदस्तीने माझ्यासोबत अनैसर्गिकरित्या शारीरिक संबंध ठेवल्याचं फिर्यादीने एफआयआरमध्ये म्हटलं आहे.

फिर्यादीने त्याच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. पोलिसांनी सूरजविरुद्ध भादंवि कलम 377, 342, 506 आणि 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. रेवण्णा कुटूंबच्या अडचणी आता आणखी वाढण्याची शक्यता आहे. आधीच प्रज्वल रेवण्णाचे कथित सेक्स व्हिडीओ पेन ड्राईव्हद्वारे घरोघरी पोहोचवले गेले होते. निवडणुकीच्या काळात हे व्हिडीओ व्हायरल केल्याने लोकसभा निवडणुकीमध्ये हासन मतदारसंघात प्रज्वल रेवण्णाचा पराभव झाला.

हासनमध्ये मतदान झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी प्रज्वल रेवण्णा 27 एप्रिलला जर्मनीला गेला होता. 31 मे रोजी रेवण्णा भारतामध्ये परतताच बंगळुरू विमानतळावर येताच त्याला अटक करण्यात आली होती. प्रज्वल रेवण्णा याला 24 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. बलात्कार आणि लैंगिक अत्याचाराचे आरोप असलेल्या प्रज्वल रेवण्णाचा यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाला होता.