मोठी बातमी! इराणकडून भारताच्या जहाजांवर अंदाधुंद फायरिंग, जहाजाच्या कॅप्टनच्या शेवटच्या संदेशानं मोठी खळबळ, थेट…

मोठी बातमी समोर येत आहे, इराणकडून भारतीय जहाजांवर फायरिंग करण्यात आली आहे. त्यानंतर भारतीय जहाजाच्या कॅप्टनकडून देण्यात आलेला शेवटचा संदेश आता समोर आला आहे. या घटनेंन मोठी खळबळ उडाली आहे.

मोठी बातमी! इराणकडून भारताच्या जहाजांवर अंदाधुंद फायरिंग, जहाजाच्या कॅप्टनच्या शेवटच्या संदेशानं मोठी खळबळ, थेट...
US-Iran Conflict
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 18, 2026 | 8:04 PM

मोठी बातमी समोर येत आहे, इराणकडून स्ट्रेट ऑफ होर्मूजमध्ये भारतीय जहाजांवर फायरिंग करण्यात आली आहे. इराणच्या रिवोल्यूशनरी गार्ड (IRGC) कडून भारताच्या दोन जहाजांवर शनिवारी फायरिंग करण्यात आली आहे. यामुळे आता स्ट्रेट ऑफ होर्मूजमध्ये तणाव आणखी वाढला आहे. शुक्रवारी इराणकडून व्यापारी जहाजांसाठी पुन्हा एकदा स्ट्रेट ऑफ होर्मूज सुरू करण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र अमेरिकेकडून घेण्यात आलेल्या भूमिकेमुळे पुन्हा एकदा इराणने स्ट्रेट ऑफ होर्मूज वाहतुकीसाठी बंद केला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार भारताचे दोन जहाज स्ट्रेट ऑफ होर्मूज मार्ग पार करण्याचा प्रयत्न करत होते, याचवेळी इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्डकडून भारताच्या जहाजांवर फायरिंग करण्यात आली. हे दोन्ही जहाजं कच्च तेल घेऊन भारताच्या दिशेनं निघाले होते.

जेव्हा भारतीय जहाजांवर गोळीबार करण्यात आला तेव्हा हे दोन्ही जहाज ओमानपासून 20 नॉटिकल मैल अंतारवर होते. अचानक फायरिंग झाल्यामुळे जहाजावर मोठा गोंधळ उडाला. दरम्यान यावेळी या जहाजाच्या कॅप्टने इर्मजन्सी संदेश पाठवला. त्याचा तो संदेश आता समोर आला आहे. इराणकडून भारताच्या सुपर टँकर सनमार हेराल्ड या जहाजावर गोळीबार करण्यात आला. त्यावेळी जहाजाच्या कॅप्टने इराणला म्हटलं की माझं नावं तुमच्या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकांवर आहे, तुम्हीच आम्हाला रस्ता उपलब्ध करून दिला आणि आता तुम्हीच आमच्यावर गोळीबार करत आहात. मला युटर्न घेऊ द्या.

दरम्यान त्यानंतर या दोन्ही जहाजांनी पुन्हा युटर्न घेतला. या दोन्ही जहांना इराणने स्ट्रेट ऑफ होर्मूज पार करू दिलेलं नाहीये. हे दोन्ही जहाजं कच्च तेल भरून भारताच्या दिशेनं येत होते, यातील एका जहाजामध्ये तब्बल 20 लाख बॅरल एवढं कच्च तेल होतं. इराणकडून सुरुवातील स्ट्रेट ऑफ होर्मूज सुरू करण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र त्यानंतर अमेरिकेनं आपलं ब्लॅकेड हटवण्यास नकार दिल्यानं पुन्हा एकदा इराणकडून हा मार्ग आता बंद करण्यात आला आहे. यामुळे आता पुन्हा एकदा जगावर ऊर्जा संकट निर्माण होण्याची शक्यता आहे.

 

Follow Us