AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तू माझ्यासाठी मेलीस… जिवंत पत्नीचं पिंडदान करून पतीने व्हिडिओ केला पोस्ट, धक्कादायक प्रकाराने हादरलं शहर

फिरोजाबादमध्ये एका पतीने कौटुंबिक वादातून जिवंत पत्नीचे प्रतीकात्मक पिंडदान करून व्हिडिओ WhatsApp स्टेटसवर टाकला. या घटनेने खळबळ उडाली आहे. दहा वर्षांपूर्वी विवाह झालेल्या पीडित महिलेने पती व सासरच्या मंडळींवर मानसिक व शारीरिक छळाचा आरोप करत पोलिसांकडे संरक्षण आणि कठोर कारवाईची मागणी केली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

तू माझ्यासाठी मेलीस... जिवंत पत्नीचं पिंडदान करून पतीने व्हिडिओ केला पोस्ट, धक्कादायक प्रकाराने हादरलं शहर
पत्नी जिवंत असतानाच त्याने केलं पिंडदान, व्हिडीओने खळबळ
| Updated on: Aug 03, 2026 | 2:13 PM
Share

फिरोजाबाद (उत्तर प्रदेश): उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. कौटुंबिक वादातून एका पतीने आपल्या जिवंत पत्नीचे प्रतीकात्मक पिंडदान करून त्याचा व्हिडिओ व्हॉट्सॲप स्टेटसवर पोस्ट केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पीडित महिलेने पतीसह सासरच्या सदस्यांविरोधात गंभीर आरोप करत पोलिसांकडे संरक्षण आणि गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणाचा तपास सध्या सुरू असून पोलिसांकडून सर्व बाजूंनी चौकशी केली जात आहे.

दहा वर्षांपूर्वी झाला होता विवाह

फिरोजाबादच्या लाईनपार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नगला विष्णू परिसरात राहणाऱ्या दीपा स्वर्णकार यांचा विवाह 26 ऑगस्ट 2014 रोजी जितेंद्र प्रकाश यांच्यासोबत झाला होता. विवाहानंतर सुरुवातीपासूनच पती आणि सासरच्या मंडळींकडून मानसिक व शारीरिक छळ सुरू असल्याचा आरोप दीपाने केला आहे. तिच्या तक्रारीनुसार, पती जितेंद्र प्रकाश, सासू मंजू वर्मा, नणंद शालनी आणि दीर नकुल हे सातत्याने तिचा छळ करत होते. किरकोळ कारणांवरून वाद घालणे, मारहाण करणे आणि मानसिक त्रास देणे हे प्रकार वारंवार घडत असल्याचे तिने म्हटलं आहे.

30 जुलैला मारहाण, जीव वाचवण्यासाठी खोलीत लपल्याचा दावा

दीपाच्या म्हणण्यानुसार, 30 जुलै रोजी तिच्यावर पुन्हा एकदा मारहाण करण्यात आली. परिस्थिती इतकी गंभीर झाली होती की, स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तिला घरातील एका खोलीत लपून बसावे लागले. या घटनेनंतरही तिचा छळ थांबला नसल्याचा आरोप तिने केला आहे.

जिवंत पत्नीचे पिंडदान करून व्हिडिओ व्हॉट्सॲप स्टेटसवर

मात्र, या प्रकरणाला अतिशय वेगळं आणि धक्कादायक वळण 2 ऑगस्ट रोजी लागलं. दीपाने केलेल्या आरोपानुसार, दीपाच्या पतीने ती जिवंत असतानाच, तिचं प्रतीकात्मक पिंडदान केल्याचा व्हिडिओ तयार करून तो आपल्या व्हॉट्सॲप स्टेटसवर पोस्ट केला. मात्र दीपाने त्याला या कृत्याचा जाब विचारला असता, पतीने “तू माझ्यासाठी मेलेली आहेस. आता मी तुझ्यासोबत राहणार नाही,” असे सांगितल्याचा दावा तिने केला. या घटनेमुळे तिला मोठा मानसिक धक्का बसल्याचेही तिने नमूद केलं.

जीवे मारण्याच्या धमक्यांच्या ऑडिओ रेकॉर्डिंगचा दावा

दीपाने आणखी गंभीर आरोप केले आहेत. मला अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या. या धमक्यांचे ऑडिओ रेकॉर्डिंग माझ्याकडे पुरावा म्हणून असल्याचा दावा तिने केला असून, चौकशीदरम्यान ते पोलिसांना सादर करण्याची तयारी दर्शवली आहे.

दीपाला दोन लहान मुले असून, या संपूर्ण घटनेचा त्यांच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम झाला आहे. सततचा कौटुंबिक वाद, छळ आणि पतीच्या या कृत्यामुळे ती आणि तिची मुले भीती आणि मानसिक तणावाखाली जीवन जगत असल्याचे तिने तक्रारीत म्हटलं आहे.

पोलिसांकडे संरक्षण आणि कठोर कारवाईची मागणी

दीपाने लाईनपार पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करून आरोपींविरोधात एफआयआर नोंदवण्याची, स्वतःला आणि आपल्या मुलांना पोलिस संरक्षण देण्याची तसेच संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.  या प्रकरणाबाबत फिरोजाबादचे अपर पोलीस अधीक्षक (नगर) रवि शंकर प्रसाद यांनी सांगितलं की, पीडित महिलेची तक्रार प्राप्त झाली असून प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. सर्व आरोपांची पडताळणी केली जात असून, तपासात जे काही निष्पन्न होईल त्यानुसार पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या घटनेने सोशल मीडियावरही मोठी चर्चा सुरू झाली असून, जिवंत व्यक्तीचे पिंडदान करून त्याचा व्हिडिओ सार्वजनिकरित्या असा प्रसारित करण्याच्या प्रकारामुळे अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.

Follow Us
रोहित पवार FDA कार्यालयात; तुकाराम मुंढेंच्या भेटीला; कारण काय?
Rohit Pawar Met Tukaram Mundhe: रोहित पवार FDA कार्यालयात; तुकाराम मुंढेंच्या भेटीला; कारण काय?
KFC च्या म्हाताऱ्याने कोंबड्या वाचवा सांगण्यासारखं! राज ठाकरेंचा टोला
KFC च्या म्हाताऱ्याने कोंबड्या वाचवा सांगण्यासारखं! राज ठाकरेंचा भाजपला जोरदार टोला
जालन्यातील महिलांसाठी पुन्हा रॅम्प वॉक करेन! टीकेला पंकजा मुंडेंचं...
जालन्यातील महिलांसाठी पुन्हा रॅम्प वॉक करेन! टीकेला पंकजा मुंडेंचं सडेतोड उत्तर, म्हणाल्या...
पाच लाखांचा खर्च, अडीच एकरांची मोसंबी बाग वाळली; पाणीटंचाईने शेतकरी सं
Chhatrapati Sambhajianagar: पाच लाखांचा खर्च, अडीच एकरांची मोसंबी बाग वाळली; पाणीटंचाईने शेतकरी संकटात!
सातारा जिल्हा बँक निवडणुकीचे निकाल जाहीर होताच मोठी अपडेट समोर
Satara Bank Election: सातारा जिल्हा बँक निवडणुकीचे निकाल जाहीर होताच मोठी अपडेट समोर
अहिल्यानगर, सांगली, सातारा जिल्हा बँक निवडणुकीत कुठे आणि कोणी बाजी?
अहिल्यानगर, सांगली, सातारा जिल्हा बँक निवडणुकीत कुठे आणि कोणी बाजी मारली? A टू Z माहिती...
कल्याणमध्ये संतापजनक घटना! 'त्या' एका कारणावरून नवऱ्याने उकळतं मटण...
कल्याणमध्ये संतापजनक घटना! 'त्या' एका कारणावरून नवऱ्याने उकळतं मटण बायको आणि लेकावर फेकलं
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत मोठा ट्विस्ट! NCP नेत्यांचा अर्ज बाद; नेमकी
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत मोठा ट्विस्ट! NCP नेत्यांचा अर्ज बाद; नेमकी कोणाला संधी?
पु. ल. देशपांडे यांच्या आठवणींना उजाळा! राज ठाकरेंच्या उपस्थितीत खास..
पु. ल. देशपांडे यांच्या आठवणींना उजाळा! राज ठाकरेंच्या उपस्थितीत खास दिनदर्शिकेचे प्रकाशन
दिया मिर्झाच्या व्हिडिओवर राजकीय टीका भोवली! मुंबई हायकोर्टाने अमित...
दिया मिर्झाच्या व्हिडिओवर राजकीय टीका भोवली! मुंबई हायकोर्टाने अमित साटम यांना फटकारले