देशात एकाच वेळी पाच वंदेभारत एक्सप्रेसचे लॉंचिंग ? महाराष्ट्राला आणखी किती वंदेभारत पाहा

वंदेभारतच्या उद्घाटनाचे सोहळ मोठ्या थाटामाटात करण्यात आले होते. परंतू यंदा ओदिशा रेल्वे अपघाताच्या पार्श्वभूमीवर भव्य समारंभ न करता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन होणार असल्याचे म्हटले जात आहे.

देशात एकाच वेळी पाच वंदेभारत एक्सप्रेसचे लॉंचिंग ? महाराष्ट्राला आणखी किती वंदेभारत पाहा
five Vande Bharat Express lauch at one time 26 june
| Updated on: Jun 17, 2023 | 6:27 PM

नवी दिल्ली : देशाची पहीली सेमी हायस्पीड विना इंजिनाची ट्रेन ( Engine Less Train )  ‘वंदेभारत एक्सप्रेस’ची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. वेग आणि आरामदायीपणा यांचा मिलाफ असलेल्या या गाड्या देशातील विविध राज्यात चालविल्या जात आहेत.  धार्मिक पर्यटनासाठी देखील वंदेभारत ( Vande Bharat Express ) सुरु करण्यात आल्या आहेत. आता येत्या 26 जून रोजी देशातील आणखी पाच मार्गांवर वंदेभारत एक्सप्रेसना पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM MODI ) यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखविला जाण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राला पाचवी वंदेभारत मिळणार आहे. ती कोणती ते पाहा..

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या 26 जूनला पाच नवीन मार्गावर वंदेभारत एक्सप्रेस सुरु होण्याची शक्यता आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान मोदी या पाच नव्या वंदेभारतला हिरवा झेंडा दाखविणार आहेत. या ट्रेनमध्ये कोकण रेल्वे मार्गावर मुंबई ( सीएसएमटी ) ते गोवा ( मडगाव ), बंगळुरू-हुबळी, पाटणा – रांची, भोपाळ – इंदौर आणि भोपाळ – जबलपूर या पाच वंदेभारतचे लॉंचिग होणार असल्याचे म्हटले जात आहे.

देशात प्रथमच पाच वंदेभारत एकाच वेळी उद्घाटन होऊन सेवेत येणार आहेत. यापूर्वीचे वंदेभारतच्या उद्घाटनाचे सोहळ मोठ्या थाटामाटात करण्यात आले होते. परंतू यंदा ओदिशा रेल्वे अपघाताच्या पार्श्वभूमीवर भव्य समारंभ न करता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन होणार असल्याचे म्हटले जात आहे. महाराष्ट्रात आधी मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, नागपूर ते बिलासपूर, मुंबई ते साई नगर शिर्डी, मुंबई ते सोलापूर या वंदेभारत मिळाल्या होत्या. आता मुंबई ते गोवा वंदेभारत मिळणार असल्याने महाराष्ट्राच्या पाच वंदेभारत होणार आहेत.

गोवा वंदेभारतचे उद्घाटन होण्याची शक्यता

2 जून रोजी घडलेल्या ओदिशा येथील बालासोर जिल्ह्याती भीषण ट्रेन अपघातामुळे मुंबई ते गोवा वंदेभारतचे मडगाव येथून दुसऱ्या दिवशीच होणारा उद्घाटनाचा कार्यक्रम दुखवट्यामुळे रद्द करण्यात आला होता. त्यामुळे आता कोकणातील चाकरमान्यांना तसेच गोव्यात जाणाऱ्या पर्यटकांसाठी वंदेभारत सुरु होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.