AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

11 महिने मला कचरा मिळाला… डोनाल्ड ट्रम्प यांचे धक्कादायक विधान, जगात खळबळ..

डोनाल्ड ट्रम्प मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे. आता त्यांनी अमेरिकेत संबोधित करत अत्यंत मोठे विधान केले. डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानाने एकच खळबळ उडाली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी यादरम्यान अमेरिकेतील महागाईवर भाष्य केले नाही.

11 महिने मला कचरा मिळाला... डोनाल्ड ट्रम्प यांचे धक्कादायक विधान, जगात खळबळ..
Donald Trump
| Updated on: Dec 18, 2025 | 12:45 PM
Share

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मागील काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. डोनाल्ड ट्रम्प कधी काय भाष्य करतील याचा अजिबातच नेम नाही. आता नुकताच डोनाल्ड ट्रम्प यांनी धक्कादायक विधान केले. डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, अकरा महिन्यांपूर्वी मला कचरा मिळाला होता. मी तोच साफ करण्याचे काम करत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचे भाष्य ऐकून मोठी खळबळ उडाली आहे. हैराण करणारे म्हणजे त्यांनी हा दावा थेट देशाला संबोधित करताना केला. यादरम्यानच जगातील मोठे सात युद्ध रोखल्याचाही दावा त्यांनी केला. ट्रम्प जरी अर्थव्यवस्था भरभराटीत असल्याचे भासवत असले तरी सरकारी आकडेवारी वेगळीच सांगते. वाढती महागाई आणि नोकऱ्यांच्या निर्मितीतील मंदगती यामुळे लोकांमध्ये त्यांची लोकप्रियता घटली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, अमेरिकेची ताकद त्यांनी पुन्हा प्रस्थापित केली आहे. त्यांच्या मते, इराणकडून असलेला अणुबॉम्बचा धोका संपुष्टात आणला गेला, गाझामधील संघर्ष थांबवण्यात आला आणि तेथे दीर्घ काळानंतर शांतता प्रस्थापित झाली. जगात कुठे कुठे युद्ध थांबवली हेच सांगताना डोनाल्ड ट्रम्प दिसले. मात्र, त्यांनी अमेरिकेतील वाढत्या महागाईवर भाष्य करणे टाळले.

ट्रम्प यांनी आपल्या भाषणात या मुद्द्यांवर फारसा भर दिला नाही. त्यांनी सांगितले की, या शुल्कांमुळे अमेरिकेला अपेक्षेपेक्षा खूप जास्त महसूल मिळाला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी जरी इतर देशांवर टॅरिफ मोठा लावला आणि इतर देशातील वस्तू अमेरिकेत येऊ नये, म्हणून प्रयत्न केला असला तरीही वस्तू स्थिती हीच आहे की, अमेरिकेतील महागाई असूनही गगणाला पोहोचलेली आहे.

ट्रम्प यांनी भविष्यकालीन तंत्रज्ञानाचे महत्त्व अधोरेखित केले आणि सांगितले की, प्रमुख तंत्रज्ञान कंपन्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत आहेत. ज्यामुळे देशाच्या आर्थिक प्रगतीला एक नवीन दिशा मिळू शकते. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांनी H-1B व्हिसाच्या नियमात केलेल्या बदलामुळे कंपन्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागत आहे, ही देखील वस्तूस्थिती आहे.

सनसनाटी निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न! शंभूराज देसाईंचा टोला
सनसनाटी निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न! शंभूराज देसाईंचा टोला.
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.