Viral Video : खचाखच भरलेल्या मेट्रोत मुलाकडून सांडलं कोल्ड-ड्रिंक, त्याने जे केलं ते पाहून नेटकरी भारावले, असं काय घडलं ?
एका लहान मुलाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर समोर आला आहे. मेट्रोमध्ये उभ्या असलेल्या त्या मुलाने समजूदतादारपणा दाखवत असं काही केलं की ते पाहून लोकंही भारावले. इन्स्टावर शेअर झालेला हा व्हिडीओ वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झालाय. असं काय आहे त्या व्हिडीओत ?

सोशल मीडियाच्या जमान्यात रोड शेकडो फोटो, व्हिडीओ हे अपलोड होत असतात , काही व्हिडीओ लोकांना आवडतात, तर काही खूपच व्हायरल होतात. काही व्हिडीओ मनोरंजक असतात, आपल्याला हसवतात तर काही आपल्याला विचार करण्यास भाग पाडतात. असाच एक व्हिडीओ आत्ताही समोर आला आहे, ज्याने लोकांचं लक्ष वेधून घेतलंय आणि त्यातील लहान मुलाच्या निरागसतेने सर्वांचं मन जिंकून घेतलं. जर तुमच्यात चांगले संस्कार असतील तर तुम्हाला तुमची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. तुमचं वर्तन हेच तुमच्या व्यक्तिमत्वाची ओळख बनते, हेच या व्हिडीओतल्या मुलाने त्याच्या वागण्यातून दाखवून दिलं.
या व्हिडीओत स्पष्टपणे दिसतं की एक छोटा मुलगा खचाखच भरलेल्या मेट्रोतून जात होता. पण त्याच प्रवासादरम्यान त्याच्या हातातील कोल्डड्रिंकची बाटली अचानक खाली पडते आणि ते पेय फरशीवर सांडून सगळीकडे ओलं होतं. साधारणपणे असं काही घडलं की लहान मुलं घाबरतात आणि इकडे-तिकडे पाहू लागतात. पण व्हिडीओतल्या या मुलाने जे केलं, त्यामुळे तो अवघ्या काही क्षणांत व्हायरल झाला. लोकांनीही हा व्हिडीओ एकमेकांसोबत मोठ्या प्रमाणात शेअर केला.
चीन की मेट्रो में एक छोटा सा बच्चा गलती से Cold drink गिरा देता है।
फिर चुपचाप बैग से टिशू निकालता है,और खुद ही साफ कर देता है।
कोई डांट नहीं, कोई बहाना नहीं बस जिम्मेदारी का सुंदर एहसास। ये है असली परवरिश की ताकत। ऐसे बच्चे बड़े होकर दुनिया को और बेहतर बनाएंगे। pic.twitter.com/14SWOmOkxy
— TANVEER (@mdtanveer87) December 18, 2025
काय केलं मुलाने ?
ज्या क्षणी त्या मुलाच्या हातून कोल्ड-ड्रिंकची बाटली खालू पडून ते पेय सांडलं, तो पॅनिक झाला नाही. उलट त्याने शांतपणे त्याच्या बॅगेतून एक टिश्यू पेपर काढला, बॅग खांद्यावर पुन्हा लटकवली आणि तो खाली वाकून फरशीवर सांडलेलं कोल्डड्रिंक पुस लागला. हे दृश्य पाहून इतर प्रवासी आश्चर्यचकित झाले, कारण एखादा मुलगा असे कृत्य करेल याची कोणीही कल्पनाही केली नव्हती. बहुतेक लोकांना सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्याची किंवा कचरा पडलेला असेल तर त्याकडे दुर्लक्ष करण्याची सवय असते, परंतु या मुलाने त्याच्या छोट्याशा कृत्याने सर्वांना मोठा धडा दिला.
View this post on Instagram
हा व्हिडिओ ज्याने बनवला, त्या व्यक्तीची ओळख पटलेली नाही आणि ही घटना कोणत्या शहरात घडली हे देखील स्पष्ट झालेले नाही. पण तरीसुद्धा, त्या लहान मुलाने ज्या पद्धतीने मोठ्यांसाठी आदर्श ठेवला आहे त्याने सर्वजण प्रभावित झालेत. हा फक्त एक साधा व्हिडिओ नाही तर त्यातून माणुसकी आणि चांगल्या मूल्यांची झलक दिसते. इंस्टाग्रामवर ही क्लिप @ghantaa नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. त्याला अनेक लाईक्स आले असून अनेक लोकांनी कमेंट्समध्ये त्या मुलाचे कौतुक केलं आहे. योग्य पालकत्वाचा परिणाम मुलांच्या वर्तनावर स्पष्टपणे दिसून येतो, असं काहींनी म्हटलं. तर समजूतदारपणा, जबाबदारी ही वयावर अवलंबून नसते अशी प्रतिक्रिया काहींनी कमेंट्समध्ये दिली.
