Dhurandhar: मला राजकारणातले काही कळत नसतानाही… धुरंधर चित्रपटाबाबत दिग्गज अभिनेत्याची पोस्ट
Dhurandhar: अभिनेता रणवीर सिंगचा 'धुरंधर' हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आहे. आता या चित्रपटाबाबत दिग्गज अभिनेत्याने पोस्ट शेअर केली आहे. तो काय म्हणाला जाणून घ्या...

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड चित्रपट ‘धुरंधर’ चांगलाच चर्चेत आहे. अक्षय खन्ना, रणवीर सिंग आणि संजय दत्त मुख्य भूमिकेत असलेला हा चित्रपट प्रेक्षकांची मने जिंकण्यात यशस्वी ठरला आहे. आदित्य धरच्या दिग्दर्शनात तयार झालेला चित्रपट ‘धुरंधर’ सध्या बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कामगिरी करत आहे. रिलीज झाल्यापासूनच चित्रपटाला प्रेक्षक आणि सेलेब्स दोघांचाही प्रचंड प्रेम मिळत आहे. आता एका दिग्गज अभिनेत्याने चित्रपटाचे तोंड भरुन कौतुक केले आहे. या अभिनेत्याने ‘मला राजकारणातले काही माहिती नाही पण चित्रपटात्र…’ असे म्हणत जी पोस्ट केली आहे त्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
आम्ही ज्या अभिनेत्याच्या पोस्टविषयी बोलत अहोत तो अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून दलीप ताहिल आहेत. दलीप ताहिल यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक लांबलचक नोट शेअर करून चित्रपट पाहण्याचा त्यांचा अनुभव सांगितला. त्यांनी लिहिले की चित्रपटांची खरी मजा सिनेमा हॉलमध्ये येते. म्हणून त्यांनी ‘धुरंधर’ हा चित्रपट पूर्ण ३ तास ३० मिनिटे थिएटरमध्ये बसून पाहिला. त्यांच्या मते, मोठ्या पडद्यावर चित्रपट पाहण्याचा अनुभव पूर्णपणे वेगळा आणि अधिक प्रभावी असतो.
पोस्ट शेअर करून सांगितला अनुभव
अभिनेत्याने त्यांच्या पोस्टमध्ये एक मजेदार किस्सा देखील शेअर केला. त्यांनी लिहिले की ते राजकारणाचे जाणकार नाहीत. पण त्यांना माहिती आहे की भारत आणि पाकिस्तानमधली सध्याचे संबंध हे अतिशय नाजूक आहेत. तरी थिएटरमध्ये जेव्हा कोणीतरी अमेरिकन लहेज्यात भारतीय राष्ट्रगीतासाठी उभे राहण्यास सांगते, तेव्हा तो क्षण खूप रोचक आणि संस्मरणीय वाटतो.
पाहण्यासारखा चित्रपट आहे ‘धुरंधर’
दलीप ताहिल यांनी पुढे लिहिले की ‘धुरंधर’ खरंच पाहण्यासारखा चित्रपट आहे. आदित्य धर यांनी जबरदस्त काम केले आहे आणि संपूर्ण टीम त्यांचे कौतुक झाले पाहिजे. चित्रपट रोमांच आणि थ्रिलने भरलेला आहे, जो प्रेक्षकांना साडेतीन तास थिएटरमध्ये खिळवून ठेवतो. त्यांनी विनोदी अंदाजात हेही सांगितले की इतका वेळ थिएटरमध्ये बसल्यावर आता योगा आणि स्ट्रेचिंगची गरज भासेल, जेणेकरून अखडलेले शरीर सरळ होईल. तसेच त्यांनी सिनेमा हॉलच्या अनुभवाला उत्तम अनुभव म्हटले आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे, ‘धुरंधर’ने बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत ३०० कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे. याआधीही अक्षय कुमार, प्रीती झिंटा, अनुपम खेर, दीप्ती नवल, श्रद्धा कपूर आणि स्मृती इराणी यांसारख्या अनेक दिग्गजांनी चित्रपटाची स्तुती केली होती.
