वाराणसीत पुराने जनजीवन विस्कळीत, पीएम मोदी यांनी मदतकार्याला वेग आणण्याचे आदेश

उत्तर प्रदेशात नैऋत्य मोसमी पावसामुळे सध्या अंदाजे 32 जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. वाराणसी आणि गोरखपूरसह 22 जिल्ह्यांना पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे.

वाराणसीत पुराने जनजीवन विस्कळीत, पीएम मोदी यांनी मदतकार्याला वेग आणण्याचे आदेश
Varanasi Flood situation and PM Narendra modi
| Updated on: Sep 03, 2026 | 6:48 PM

उत्तर प्रदेशातील किमान ३२ शहरात सततच्या पावसाने आणि पुराने जनजीवन विस्कळीत झाले आहे. वाराणसीत पुराने स्थिती बिघडत चालली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीतील आपल्या लोकसभा क्षेत्रातील पुराच्या स्थितीवर लक्ष ठेवून आहेत. पीएम मोदी यांनी गुरुवारी वाराणसीच्या महापौर आणि जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करुन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला आणि मदत- पुनर्वसनाच्या कामांना वेग आणण्याबरोबर लोकांची अडचणी दूर करण्याचा सल्ला दिला आहे.

पीएम मोदी यांनी वाराणसीचे महापौर अशोक कुमार तिवारी आणि जिल्हाधिकारी सत्येंद्र कुमार यांच्याशी चर्चा करु शहरातील पुराच्या परिस्थितीचा आढावा घेतला. पंतप्रधान मोदी यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करुन लोकांचा युद्धपातळीवर दिलासा पोहचवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच प्रभावित लोकांना तात्काळ सर्व गरजेच्या सुविधा उपलब्ध करण्यास सांगितले आहे.

लोकांची खास काळजी घ्या – मोदी

स्थानिक अधिकाऱ्यांशी बोलताना पीएम मोदी यांनी आदेश दिले की लोकांची खास काळजी घ्यावी आणि तसेच लोकांना कमीत कमी त्रास होईल हे पाहावे. जेथे मदत साहित्याची गरज आहे तेथे ते तत्काळ पुरविण्याची व्यवस्था करावी. याशिवाय पंतप्रधान मोदी यांनी शहरातील पुर आणि मदत कार्यांवर सतत नजर ठेवण्यास सांगितले आहे.

पुरामुळे मदत पुनर्वसन शिबिरात राहणाऱ्या मुले, महिलांना आणि जेष्ठ नागरिकांच्या विशेष गरजांकडे लक्ष पुरवावे असे निर्देश पंतप्रधान मोदी यांनी जिल्हाधिकारी आणि महापौरांना दिले. प्रभावित लोकांपर्यंत मदत पोहचवण्याच्या कामाला वेग आणावा असेही त्यांनी सांगितले.

वाराणसी गंगा नदीची पातळी बुधवारी धोक्याच्या पातळीवर गेली आहे. यानंतर जिल्हा प्रशासनाने नदीत सर्व प्रकारच्या नावांच्या संचालनावर रोक लावली आहे. पुरग्रस्त भागात टेहळणी वाढली आहे.
वाराणसीत १३ पुर

वाराणसीमध्ये १३ पूर मदत शिबिरे, २१९ कुटुंबे प्रभावित

नदीच्या वाढत्या पाण्याच्या पातळीला पाहून जिल्हा प्रशासन देखील अलर्ट मोडवर आले आहे. प्रशासनाने श्रद्धाळू आणि स्थानिक लोकांना घाटावर आणि पाण्याच्या प्रवाहात न जाण्याचा सल्ला दिला आहे. स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले की गंगा आणि वरुणा नदीच्या वाढत्या पाणी पातळी सोबत आणि वरुणा नदीच्या तटवर्तीय भागातील स्थितीवर प्रशासनावर सतत नजर ठेवली आहे. १३ जिल्ह्यात मदत शिबिरे तयार केली आहेत, जेथे बुधवारपर्यंत २१९ प्रभावित कुटुंबातील ९३५ लोक राहात आहेत.

गोरखपूरात यूपीत ३२ जिल्ह्यात पूरसंकट

दूसरीकडे , उत्तर प्रदेशात दक्षिण-पश्चिम मान्सून एक्टीव्ह झाल्याने ३२ जिल्ह्यांना पुराचा सामना करावा लागत आहे. राज्य सरकारच्या वतीने बुधवारी जारी केलेल्या वक्तव्याने आतापर्यंत ३२ जिल्हे प्रभावित झाले आहेत. परंतू वाराणसी आणि अयोध्येसह २० जिल्ह्यात आजमगड, बलिया, बाराबंकी, चंदौली, चित्रकूट, फर्रुखाबाद, गोरखपुर, बदायू, गाजीपुर, हापुड, हरदोई, कासगंज, लखीमपुर खीरी, मिर्जापुर, मुरादाबाद, प्रयागराज, संत कबीर नगर, शाहजहांपुर, सीतापुर आणि उन्नाव येथे परिस्थिती बिकट बनली आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us