AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

त्या खास प्रयोगासाठी 1 हजार अंडवेअर जमिनीखाली पुरल्या, 2 महिन्यांनी खोदताच शास्त्रज्ञांना बसला प्रचंड धक्का, जमिनीमधून थेट…

असा एक प्रयोग करण्यात आला आहे, ज्या प्रयोगासाठी शास्त्रज्ञांनी तब्बल एक हजार अंडरवेअर जमिनीखाली पुरल्या होत्या, त्यानंतर त्या दोन महिन्यांनी बाहेर काढण्यात आल्या, या प्रयोगामधून जी माहिती समोर आली, त्यामुळे शास्त्रज्ञ देखील आश्चर्यचकित झाले आहेत.

त्या खास प्रयोगासाठी 1 हजार अंडवेअर जमिनीखाली पुरल्या, 2 महिन्यांनी खोदताच शास्त्रज्ञांना बसला प्रचंड धक्का, जमिनीमधून थेट...
अनोख्या प्रयोगाची चर्चा Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 27, 2026 | 9:46 PM
Share

माती ही आपल्या अन्नसाखळीमधील सर्वात महत्त्वाचा घटक आहे. माती पानी, कार्बनसोबतच पोषणतत्त्वे देखील स्टोअर करते. जगातील अर्ध्यापेक्षा अधिक जैवविविधता ही जमिनीखाली असते. मात्र अलीकडच्या काळात अतिरिक्त खतांच्या मात्रेमुळे जमिनीची गुणवत्ता कमी होत चालली आहे, ज्याचा परिणाम हा अन्न सुरक्षिततेवर पडताना दिसत आहे. हेच लक्षात घेऊन स्विट्जरलँडमध्ये एक आगळा वेगळा प्रयोग करण्यात आला आहे. तेथील काही शास्त्रज्ञांनी जमिनीची सुपिकता मोजण्यासाठी चक्क अंडरवेअरचा अंतर्वस्त्राचा वापर केला आहे. या शास्त्रज्ञांनी जमिनीमध्ये एक नाही दोन नाही तर तब्बल एक हजार अंडरवेअर पुरल्या, या प्रोजेक्टला त्यांनी प्रूफ बाय अंडरवेअर असं नाव दिलं होतं, या प्रयोगाअंती धक्कादायक माहिती समोर आली आहे.

या अंडरवेअरच्या मदतीने जमिनीखालील अनेक रहस्य शोधण्यात वैज्ञानिकांना यश आलं आहे. 2021 मध्ये ज्यूरिख विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी हा प्रयोग केला होता. या शास्त्रज्ञांनी तब्बल 1000 सुती अंडरवेअर जमिनीखाली पुरल्या, त्यानंतर दोन महिन्यांनी त्यांनी या अंडरवेअर बाहेर काढल्या, त्यांनी त्या अंडरवेअरच्या स्थितीचे फोटो काढून तपासणीसाठी लॅबला पाठवले. अंतर्वस्त्रांचे विघटन किती गतीने झालं? त्यावरून तेथील जमीन किती सुपीक आहे, किती सक्रिय आहे? याचा अंदाज वैज्ञानिकांनी लावला.

शास्त्रज्ञांनी या प्रयोगावरून असा निष्कर्ष काढला की, जिथे सुती अंडरवेअरचे लवकर विघटन झाले, तेथील जमिनीचा पोत हा कसदार होता. परंतु ज्या ठिकाणी अंडरवेअरचे विघटन लवकर झाले नाही, ती जमीन कसदार नव्हती. ज्या ठिकाणी विघटन लवकर झाले, त्या जमिनीमध्ये जीवाणूंची संख्या अधिक होती, असा निष्कर्ष शास्त्रज्ञांनी काढला आहे. या प्रयोगाची त्यावेळी चांगलीच चर्चा झाली. सर्वसामान्यपणे ज्या जमिनीमध्ये जिवाणूंची संख्या अधिक असते, त्या ठिकाणी कोणत्याही वस्तूंचं विघटन अधिक जलद पद्धतीने होतं. परंतु जी जमीन सुपिक नसते, तिथे मात्र कोणत्याही वस्तूंचं लवकर विघटन होत नाही. हेच या अंडरवेअरच्या स्थितीवरून दिसून आलं. या प्रयोगासाठी तब्बल एक हजार अंडरवेअर जमिनीखाली पुरण्यात आल्या होत्या.

Follow Us
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाई...
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाईमुळे नातेवाईकांची तीव्र नाराजी
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात अवमान याचिका! सुनावणी सुरु