
राजस्थानच्या उदयपुर येथून मोठी बातमी समोर येत आहे. काँग्रेसच्या नेत्या माजी केंद्रीय मंत्री डॉ. गिरिजा व्यास यांच्या बाबतीत विचित्र अपघात घडला आहे. त्या घरातच पूजा करताना भाजून गंभीर जखमी झाल्या आहेत. त्या नियमितपणे पूजा करत असताना पणतीच्या ज्योतीने त्यांची ओढणीने अचानक पेट घेतल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना आधी उदयपूर येथील अमेरिकन रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी अहमदाबादला घेऊन गेले आहेत.
माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसच्या नेत्या डॉ. गिरिजा व्यास घरातच भाजल्या गेल्या आहेत.त्या नेहमी प्रमाणे पूजा करीत होत्या. त्यावेळी त्यांच्या ओढणीने पेट घेतला आणि त्या गंभीररित्या भाजल्या गेल्या. गणगौरच्या पूजे दरम्यान ही घटना घडली आहे. त्यांना आधी नजिकच्या उदयपूरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. नंतर त्यांना त्यांच्या कुटुंबियांनी अहमदाबादला रवाना केले आहे.
माजी केंद्रीय मंत्री डॉ. गिरिजा व्यास यांचे बंधू भाई गोपाल शर्मा हे फार्म हाऊस येथे गेले होते. घरात पूजा करताना दिव्याच्या ज्योतीने त्यांच्या ओढणीला आग लागल्याने त्या भाजल्याने घरातील नोकराने दवाखान्यात दाखले केले. आपल्या बहिणीला गंभीर जखमी अवस्थेत आता अहमदाबाद येथील रुग्णालयात रवाना केले आहे. गोपाल शर्मा म्हणाले त्यांची बहिण डॉ. गिरिजा व्यास घरामध्ये नियमितपणे पूजा करत होती. देवीची ( गणगौरची पूजा-पाठ ) विशेष पूजा चालू होती. त्यावेळी हा विचित्र अपघात घडल्याचे गोपाल शर्मा यांनी सांगितले.