Richest Temple Of India: तिरुपती बालाजी ते पद्मनाभस्वामी मंदिर, देशाच्या टॉप-10 श्रीमंत मंदिराची संपत्ती किती ?

Richest Temple Of India: अयोध्येच्या राम मंदिरातील दानपेटीतील रकमेचा अपहार झाल्याच्या बातम्यांनी खळबळ उडाली आहे.यात घटनेमुळे देशातील टॉप-10 मंदिरांची संपत्ती किती या प्रश्न विचारला जात आहे.

Richest Temple Of India: तिरुपती बालाजी ते पद्मनाभस्वामी मंदिर, देशाच्या टॉप-10 श्रीमंत मंदिराची संपत्ती किती ?
Padmanabhaswamy Temple
| Updated on: Jun 30, 2026 | 5:08 PM

Richest Temple Of India: अयोध्येतील भव्य राम मंदिरातील दान पेटीतील चोरीने देशात खळबळ उडाली आहे.जगभरातील कोट्यवधीं भक्ताच्या आस्थेचे केंद्र असलेल्या मंदिरात घोटाळ्याच्या बातम्यांनी नाराजी व्यक्त होत आहे. एसआयटीने या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे आणि आतापर्यंत आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या घटनेने देशातील श्रीमंत मदिराच्या आर्थिक साम्राज्याकडे सर्वांचे लक्ष गेले आहे. भारताचे हे मंदिर केवळ आध्यात्मिक केंद्र नाही, तर येथे भक्तांकडून कोट्यवधी रुपयांचे सोने, चांदी, जमीन आणि रोकडचे भांडार आहे.

तिरुपती बालाजी मंदिर

आंध्र प्रदेशातील डोंगराळ भागात वसलेले तिरुपती बालाजी मंदिराला देशाचे सर्वाधिक श्रीमंत मंदिर म्हटले जाते. या मंदिराची संपत्ती सुमारे तीन लाख कोटी रुपयांहून जास्त आहे. मंदिराकडे मोठ्या प्रमाणात जमीन, संपत्तीसह सुमारे १०.३ टन शुद्ध सोने आणि बँकांच्या खात्यात १५,९३८ कोटी रुपयांची रोकड जमा आहे. या मंदिराला दरवर्षी देश-विदेशातून कोट्यवधी भक्त दान करत असतात. प्रसादाची विक्री, व्हीआयपी तिकीट आणि बँकांचे व्याज मिळून मंदिराची वार्षिक कमाई ५,२५८ कोटीहून अधिक आहे.

पद्मनाभस्वामी मंदिर

केरळातील तिरुवनंतपुरम येथील श्री पद्मनाभस्वामी मंदिर आपल्या भव्यता आणि प्राचीनतेसाठी जग प्रसिद्ध आहे.या ऐतिहासिक मंदिराची अंदाजित संपत्ती १.२ लाख कोटीच्या आसपास आहे. या मंदिरातच्या खाली रहस्यमयी आणि सुरक्षित भुयारे असून त्यात मोठ्या खजाना लपवलेला आहे, या खजान्यात प्राचीन सोन्याची नाणी, हिरे, चांदी,माणके आणि सोन्याचे दागिने आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीत या संपत्तीची मोजणी करण्यात आली होती.

जगन्नाथ मंदिर

ओडिशातील भगवान जगन्नाथाचे मंदिराची रथयात्रा जगप्रसिद्ध आहे. या मंदिराची एकूण किंमत १.२ लाख कोटीच्या आसपास आहे. येथे भगवान जगन्नाथ, सुभद्रा आणि बलभद्रला सोन्याचे बहुमुल्य दागिने दान करण्यात येतात. त्या दागिन्यांना विशेष सणांच्या वेळी देवाला घालण्यात येते. या मंदिराच्या नावावर ओडिशा आणि देशाच्या अन्य भागात हजारो एकरची जमीन आहे. दरवर्षी होणाऱ्या जगप्रसिद्ध जगन्नाथ यात्रेत भक्त येथे दान करत असतात.

श्रीराम मंदिर

उत्तर प्रदेशातील अयोध्येच्या नव्याने बांधलेल्या राममंदिराची संपत्ती वेगाने वाढत आहे. या मंदिराची संपत्ती अंदाजे ५००० कोटी रुपयांपर्यंत पोहचली आहे. रामलल्लाच्या दर्शनासाठी येथे दर दिवशी लाखो श्रद्धाळू पोहचत असतात. त्यामुळे येथेही दानधर्म मोठ्या प्रमाणात केला जातो.

काशी विश्वनाथ मंदिर

उत्तर प्रदेशातील वाराणसी येथी गंगा किनारी असलेल्या बाबा काशी विश्वनाथ मंदिर कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धा स्थानाचे प्रतिक आहे.काशी विश्वनाथ कॉरिडॉरच्या भव्य निर्मितीनंतर येथील पर्यटक आणि भाविकांची संख्या वाढली आहे. या ऐतिहासिक मंदिराची संपत्ती अंदाजे ३००० कोटी रुपयांच्या आसपास आहे.मंदिराचे गर्भगृह आणि शिखराला सोन्याने मढवलेले आहे. दरवर्षी येथे रोख रक्कम दान केली जाते. ऑनलाईन डोनेशन आणि भक्तांद्वारे गुप्त रुपाने देखील दान केले जाते.

साईं बाबा मंदिर

महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डीच्या साईंबाबा संस्थान देशातील सर्वात श्रीमंत ट्रस्ट म्हणून ओळखला जातो. या मंदिराची संपत्ती ३००० कोटी रुपये आहे. सोन्याचे सिंहासन, मुकुट आणि दागिने साईबाबांना दान केले जातात. या शिवाय मंदिराचे फिक्स्ड डिपॉझिट आणि संपत्ती देखील जास्त आहे. साई मंदिराच्या देवस्थानामार्फत मोफत वैद्यकीय सेवा, शाळा आणि अनाथाश्रम चालवले जातात.

वैष्णो देवी धाम

जम्मू-काश्मीरच्या त्रिकूट पर्वतावर स्थित माता वैष्णोदेवीचे मंदिर सर्वात प्रतिष्ठीत आणि सुरक्षित धार्मिक स्थळांपैकी एक आहे. श्राइन बोर्डाच्या मार्फत या मंदिराचा कारभार चालतो. या मंदिराचे अंदाजे संपत्ती २५०० कोटी रुपये आहे. दरवर्षी लाखो श्रद्धाळू पायी प्रवास करत माताचे दर्शन करतात.

गुरुवायूर देवस्वोम

केरळातील त्रिशूर जिल्ह्यातील गुरुवायूर श्रीकृष्ण मंदिराला भारताची द्वारका देखील म्हणतात. भगवान गुरुवायूरप्पनच्या या प्राची मंदिराची एकूण संपत्ती २००० कोटी रुपयांच्या आसपास आहे. मंदिराच्या बँकेतील एफडी आहे.तसेच शेकडो एकरची जमीन आणि वनसंपत्ती आहे. या मंदिराची एक आणखीन एक खास बाब म्हणजे देवाच्या सेवेसाठी येथे सर्वाधिक हत्ती पाळले जातात.

सोमनाथ मंदिर

गुजरातच्या वेरावल पोर्ट येथील ज्योतिर्लिंग सोमनाथ मंदिराचा प्राचीन इतिहास आहे, या मंदिराला मोहमद गझनी याने १७ वेळा लुटले होते. आज देखील या मंदिराची संपत्ती ११०० कोटी रुपये आहे. सोमनाथ ट्रस्टच्या नावाने शेकडो एकर जमीन आणि गेस्ट हाऊस आहेत. मंदिराचा गर्भगृहाच्या खांबांना सोन्याचा पत्रा लावण्यात आलेला आहे. येथे येणार श्रद्धाळू दरवर्षी मंदिराच्या विकासासाठी कोट्यवधीचे दान करतात.

सिद्धिविनायक मंदिर

मुंबईतील प्रभादेवी येथील सिद्धिविनायक गणेश मंदिराची संपत्ती ८०० कोटी रुपयांहून जास्त असल्याचे म्हटले जाते. या मंदिराला सोन्याचे दागिने आणि पैसे दान केले जातात. मंदिराच्या ट्रस्टद्वारे रुग्णांना उपचार आणि इतर परोपकारी कामे केली जातात.

Follow Us