दिल्लीतून मोठी बातमी ! गांधी कुटुंब पहिल्यांदाच काँग्रेसला मतदान करणार नाही; नेमकं असं काय घडलं?

यंदाची निवडणूक अनेक अर्थाने वेगळी आहे. खास करून गांधी कुटुंबासाठी तरी. कारण देशाच्या स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच गांधी कुटुंब हाताच्या पंजाला मतदान करणार नाही. काँग्रेसला यंदा आम आदमी पार्टीच्या झाडूचं बटन दाबावं लागणार आहे. तर केजरीवाल यांना झाडू ऐवजी हाताच्या पंजाला मतदान करावं लागणार आहे. यामागे काही राजकीय खेळी नाही. विशेष बाब नाही. आहे ती फक्त राजकीय मजबुरी...

दिल्लीतून मोठी बातमी ! गांधी कुटुंब पहिल्यांदाच काँग्रेसला मतदान करणार नाही; नेमकं असं काय घडलं?
sonia gandhi
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 08, 2024 | 8:33 PM

रायंदाची लोकसभा निवडणूक अत्यंत वेगळी ठरणार आहे. या निवडणुकीते अनेक गोष्टी बदलल्या आहेत. या निवडणुकीत काँग्रेसने अनेक पक्षांसोबत आघाडी केली आहे. त्यामुळे या आघाडीला चांगलं यश मिळणार असल्याचा कयास आहे. काँग्रेस कुटुंबातील कोणीही उत्तर प्रदेशातून निवडणूक लढवत नाहीये. तर दुसरीकडे पहिल्यांदाच गांधी कुटुंबातील एकही व्यक्ती काँग्रेसला मतदान करणार नाहीये. स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडत आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. अनेक तर्कवितर्कही लढवले जात आगहे.

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच यंदाच्या लोकसभा निवडणुकीत गांधी कुटुंबातील एकही व्यक्ती काँग्रेसला मतदान करणार नाहीये. तर आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल हे सुद्धा यंदा त्यांच्याच पक्षाला मतदान करू शकणार नाहीत. यामागे काही खास कारण नाही. पण राजकीय मजबुरी आहे. गांधी कुटुंब मतदान करणार नाही, असं नाही. पण काँग्रेसला करणार नाही. गांधी कुटुंबाला यंदा पहिल्यांदाच दुसऱ्या राजकीय पक्षांना मतदान करून विजयी करावं लागणार आहे.

कुठे करणार मतदान?

दिल्लीत काँग्रेस आणि आम आदमी पार्टीची आघाडी झाली आहे. या आघाडीत नवी दिल्लीचा मतदारसंघ आपला मिळाला आहे. तर नॉर्थ ईस्ट दिल्लीची सीट काँग्रेसच्या खात्यात गेली आहे. नवी दिल्ली मतदारसंघात गांधी कुटुंबातील चार सदस्य सोनिया गांधी, राहुल, प्रियंका आणि रॉबर्ट वाड्रा यांचं मतदान आहे. त्या ठिकाणी काँग्रेस ऐवजी आम आदमी पार्टीचे उमेदवार सोमनाथ भारती इंडिया आघाडीचे उमेदवार आहेत. त्यांच्याविरोधात सुषमा स्वराज यांची मुलगी बांसुरी स्वराज निवडणूक लढत आहे. अशावेळी काँग्रेसला मजबुरीने हाताऐवजी झाडूला मतदान करावं लागणार आहे.

सुप्रिया श्रीनेत काय म्हणाल्या?

गांधी कुटुंबाच्या मतदानावर काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आम्ही इंडिया आघाडीचे सदस्य आहोत. त्यामुळे अडचण असण्याची गरज नाही. आम्ही सोबत मिळून निवडणूक लढवत आहोत. केजरीवाल यांच्या कुटुंबाचं मतदान चांदनी चौकात येतं. आता चांदनी चौक काँग्रेसच्या कोट्यात येतं. त्यामुळे केजरीवाल यांच्या कुटुंबाला झाडू ऐवजी हाताला मतदान करावं लागणार आहे, असं श्रीनेत म्हणाल्या. दरम्यान, काँग्रेसने चांदनी चौकातून अद्याप उमेदवार जाहीर केलेला नाही.

शेवटपर्यंत सीट मागितली

दरम्यान, नवी दिल्ली मतदारसंघात गांधी कुटुंबाचं मतदान असल्याने गांधी कुटुंबाने शेवटपर्यंत नवी दिल्लीची जागा मागितली होती. पण आम आदमी पार्टी तयार झाली नाही. यावर जी अवस्था गांधी कुटुंबाची होणार आहे, तीच अवस्था केजरीवाल यांच्या कुटुंबाचीही होणार आहे, असा तर्क आपने यावेळी दिला. उलट एकमेकांना मतदान केल्याने इंडिया आघाडीला मजबुती मिळेल, असा दावाही आपकडून करण्यात आला होता.