AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारत-मालदीव तणाव आणखी वाढणार, पाहा भारतीय युजर्स का तुटून पडलेत

भारत आणि मालदीव यांच्यात तणावाचे वातावरण असतानाच आता दोन्ही देशांमधील संबंध आणखी ताणले जाणार आहेत. कारण पंतप्रधान मोदींवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर निलंबित करण्यात आलेल्या मालदीवच्या माजी मंत्र्यांनी पुन्हा एकदा आक्षेपार्ह ट्विट केल्याने भारतीय युजर्स संतप्त झाले आहेत.

भारत-मालदीव तणाव आणखी वाढणार, पाहा भारतीय युजर्स का तुटून पडलेत
india maldive row
| Updated on: Apr 08, 2024 | 5:43 PM
Share

India maldive row : भारत आणि मालदीव यांच्यातील वाद पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता आहे. कारण मालदीवच्या बरखास्त केलेल्या मंत्री मरियम शिउना यांनी पुन्हा एकदा भारताचा अपमान केलाय. भारतीय युजर्सने सोशल मीडियावर टीका केल्यानंंतर त्यांनी आपलं हे ट्विट डिलीट केलं आहे. ज्यासाठी त्यांना माफी देखील मागावी लागली आहे. विरोधी पक्ष मालदीव डेमोक्रॅटिक पार्टी (MDP) वर टीका करण्यासाठी त्यांनी अशोक चक्राचा वापर केला होता. पण जेव्हा या पोस्टवरुन वाद झाल्यानंतर मरियमने यांनी ती पोस्ट काढून टाकली आहे.

अशोक चक्राचा वापर

शियुना यांनी एमडीपीला लक्ष्य करण्यासाठी X वर एक फोटो शेअर केला होता. ज्यामध्ये अशोक चक्र आणि भारतातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे (भाजप) निवडणूक चिन्ह एमडीपीच्या प्रचार पोस्टरवर लावण्यात आले होते. पोस्टमध्ये मरियमने लिहिले होते की, “MDP आपला मार्ग गमावत आहे. मालदीवचे लोक त्यांच्यासोबत चुकीच्या मार्गावर जाऊ इच्छित नाहीत.”

याआधी मरियम शिआना यांनी पंतप्रधान मोदी यांच्याबाबत ही आक्षेपार्ह वक्तव्य केले होते.  या वादानंतर त्यांची मंत्रीपदावरून हकालपट्टी करण्यात आली होती.

पण आताच्या प्रकारामुळे त्यांच्यावर पुन्हा एकदा माफी मागण्याची वेळ आली आहे. ‘माझ्या पोस्टमुळे झालेल्या गोंधळाबद्दल मी माफी मागते. एमडीपी पोस्टरमध्ये वापरलेली प्रतिमा भारतीय ध्वजाशी मिळतीजुळती असल्याचे मला समजले. गैरसमजातून हा प्रकार घडला. मला माफ करा. मी जाणूनबुजून काही केले नाही.

पुढे लिहिले की, “मालदीव भारतासोबतच्या संबंधांना खूप महत्त्व देतो. भविष्यात माझ्याकडून अशा चुका होणार नाहीत याची मी काळजी घेईन. पोस्ट करण्यापूर्वी मी सर्व गोष्टींची पडताळणी करेन.”

भारताकडून मदत सुरुच

भारताने काही दिवसांपूर्वीच मालदीवला दिलेली मदत चालू ठेवण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी मालदीवच्या परराष्ट्रमंत्र्यांनी भारतीय परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांचे आभार देखील मानले होते. यानंतर आता सोशल मीडियावर लोक याचा विरोध करत आहेत. एका यूजरने लिहिले- भारत मालदीवला तांदूळ, साखर, कांदा यासारख्या जीवनावश्यक वस्तू पुरवणार आहे. भारतीय तिरंग्याचा अपमान केल्याने भारताने मदत करू नये.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर 7 जानेवारी रोजी BoycottMaldives हा भारतात ट्रेंड होत होता. भारतीय पर्यटकांनी मालदीववर बहिष्कार टाकला होता. ज्याचा मोठा फटका मालदीवला बसला आहे.

मालदीवमध्ये सत्तेत आलेले राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू हे चीन समर्थक मानले जातात. भारताविरोधात भूमिका घेण्यात ते आघाडीवर आहेत. चीनकडून मदतीची अपेक्षा असल्याने ते सतत भारताविरोधात भूमिका घेत आहे. निवडणुकीत देखील त्यांनी इंडिया आऊटचा नारा दिला होता. त्यानंतर त्यांनी भारतीय जवानांना माघारी पाठवण्याचे निर्देश दिले होते. यासोबतच त्यांनी भारतासोबतचा हायड्रोग्राफिक सर्व्हे करार देखील संपुष्टात आणण्याची घोषणा केली होती.

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.