छोटा राजनला संपवण्याची सुपारी घेणाऱ्या गँगस्टरचा गेम ओव्हर, दोन दिवसाआधीच…
छोटा राजनला संपवण्याची सुपारी घेणाऱ्या गँगस्टरचा गेम ओव्हर झाला आहे. दोन दिवसाआधीच एका हत्येचा प्रकरणानंतर पोलीस नसीमच्या मागावर होते.

उत्तर प्रदेशातून मोठी बातमी हाती आली आहे. उत्तर प्रदेशच्या एसटीएफ, दिल्ली क्राइम ब्रँचने स्थानिक पोलिसांच्या मदतीने कुख्यात गुंड नसीम दुर्रानीचा खात्मा केला आहे. नसीम हा पोलिसांच्या चकमकीत मारला गेलाय. दिल्ली पोलिसांनी 50 हजारांचं इनाम ठेवलेल्या नसीमचा अखेर खेळ खल्लास झाला. गँगस्टर नसीम दुर्रानीवर छोटा राजनला संपवण्याच्या कटातही सामील असल्याचा आरोप होता.
नसीमने घेतली होती छोटा राजनाला संपवण्याची सुपारी
काही दिवसांपूर्वी दिल्लीच्या सोनिया विहारमधील कपिल मिश्रा यांच्या कार्यालयाबाहेर 16 नोव्हेंबर रोजी एका समीर नावाच्या व्यक्तीची हत्या झाली. या समीरच्या हत्येचा आरोप देखील नसीमवर होता. नसीम दुर्रानीवर अंडरवर्ल्डच्या डी-कंपनीशी संबंधित असल्याचा आरोप होता. मीडिया रिपोर्टनुसार, बुलंदशहरमध्ये नसीम दुर्रानी आणि पोलिसांमध्ये चकमक झाली. पोलिसांच्या पथकाने केलेल्या गोळीबारात नसीम दुर्रानीचा खेळ खल्लास झाला. या चकमकीत नसीमच्या शरीराला अनेक गोळ्या लागल्या. त्यामुळे पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी उपचारादरम्यान नसीमला मृत घोषित केले. गँगस्टर नसीम दुर्रानीचे नाव अनेक गुन्हेगारी प्रकरणात सामील झाले होते. नसीम हा अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलच्या सतत संपर्कातही होता. छोटा शकीलने छोटा राजनच्या हत्येसाठी त्याला सुपारी दिली होती, असा दावा केला जात आहे.
नसीम दुर्रानीचा एन्काऊंटर कसा झाला?
दोन दिवसाआधी कपिल मिश्रा यांच्या कार्यालयाबाहेर समीर नावाच्या तरुणाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या तरुणाच्या हत्येमध्ये नसीम दुर्रानीचा देखील सहभाग असल्याचा आरोप होता. या घटनेमुळे पोलिसांच्या पथक दुर्रानीच्या हालचालीवर लक्ष ठेवून होते. नसीम हा बुलंदशहरमध्ये असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे, दिल्ली पोलीस आणि नोएडा एसटीएफच्या संयुक्त पथकाने नसीमला पकडण्यासाठी सापळा मोहीम सुरू केली होती. त्यानंतर बुलंदरशहरमध्ये नसीम दुर्रानी आणि पोलिसांमध्ये चकमक झाली. या चकमकीत नसीम दुर्रानी हा जखमी झाला. जखमी झालेल्या नसीमला पोलिसांनी रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतर डॉक्टरांनी नसीम दुर्रानीला मृत घोषित केले.