AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

छोटा राजनला संपवण्याची सुपारी घेणाऱ्या गँगस्टरचा गेम ओव्हर, दोन दिवसाआधीच…

छोटा राजनला संपवण्याची सुपारी घेणाऱ्या गँगस्टरचा गेम ओव्हर झाला आहे. दोन दिवसाआधीच एका हत्येचा प्रकरणानंतर पोलीस नसीमच्या मागावर होते.

छोटा राजनला संपवण्याची सुपारी घेणाऱ्या गँगस्टरचा गेम ओव्हर, दोन दिवसाआधीच...
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Nov 20, 2026 | 8:34 AM
Share

उत्तर प्रदेशातून मोठी बातमी हाती आली आहे. उत्तर प्रदेशच्या एसटीएफ, दिल्ली क्राइम ब्रँचने स्थानिक पोलिसांच्या मदतीने कुख्यात गुंड नसीम दुर्रानीचा खात्मा केला आहे. नसीम हा पोलिसांच्या चकमकीत मारला गेलाय. दिल्ली पोलिसांनी 50 हजारांचं इनाम ठेवलेल्या नसीमचा अखेर खेळ खल्लास झाला. गँगस्टर नसीम दुर्रानीवर छोटा राजनला संपवण्याच्या कटातही सामील असल्याचा आरोप होता.

नसीमने घेतली होती छोटा राजनाला संपवण्याची सुपारी 

काही दिवसांपूर्वी दिल्लीच्या सोनिया विहारमधील कपिल मिश्रा यांच्या कार्यालयाबाहेर 16 नोव्हेंबर रोजी एका समीर नावाच्या व्यक्तीची हत्या झाली. या समीरच्या हत्येचा आरोप देखील नसीमवर होता. नसीम दुर्रानीवर अंडरवर्ल्डच्या डी-कंपनीशी संबंधित असल्याचा आरोप होता. मीडिया रिपोर्टनुसार, बुलंदशहरमध्ये नसीम दुर्रानी आणि पोलिसांमध्ये चकमक झाली. पोलिसांच्या पथकाने केलेल्या गोळीबारात नसीम दुर्रानीचा खेळ खल्लास झाला. या चकमकीत नसीमच्या शरीराला अनेक गोळ्या लागल्या. त्यामुळे पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी उपचारादरम्यान नसीमला मृत घोषित केले.  गँगस्टर नसीम दुर्रानीचे नाव अनेक गुन्हेगारी प्रकरणात सामील झाले होते. नसीम हा अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलच्या सतत संपर्कातही होता. छोटा शकीलने छोटा राजनच्या हत्येसाठी त्याला सुपारी दिली होती, असा दावा केला जात आहे.

नसीम दुर्रानीचा एन्काऊंटर कसा झाला? 

दोन दिवसाआधी कपिल मिश्रा यांच्या कार्यालयाबाहेर समीर नावाच्या तरुणाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.  या तरुणाच्या हत्येमध्ये नसीम दुर्रानीचा देखील सहभाग असल्याचा आरोप होता. या घटनेमुळे पोलिसांच्या पथक दुर्रानीच्या हालचालीवर लक्ष ठेवून होते. नसीम हा बुलंदशहरमध्ये असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे, दिल्ली पोलीस आणि नोएडा एसटीएफच्या संयुक्त पथकाने नसीमला पकडण्यासाठी सापळा मोहीम सुरू केली होती. त्यानंतर बुलंदरशहरमध्ये नसीम दुर्रानी आणि पोलिसांमध्ये चकमक झाली. या चकमकीत नसीम दुर्रानी हा जखमी झाला. जखमी झालेल्या नसीमला पोलिसांनी रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतर डॉक्टरांनी नसीम दुर्रानीला मृत घोषित केले.

Follow Us
केद्र सरकारचा मोठा निर्णय; वाहनाच्या PUC प्रमाणपत्राच्या वैधतेसाठी...
PUC : केद्र सरकारचा मोठा निर्णय; वाहनाच्या PUC प्रमाणपत्राच्या वैधतेसाठी नवे नियम जारी...
तुम्ही कर्मचाऱ्यांचा पगार वाढवला का? पंतप्रधान मोदींचा उद्योगपतींना...
PM Modi : तुम्ही कर्मचाऱ्यांचा पगार वाढवला का? पंतप्रधान मोदींचा उद्योगपतींना थेट सवाल
सोनिया गांधींच्या पुस्तकावर बंदी घाला! बड्या नेत्याची CM देवेंद्र...
सोनिया गांधींच्या पुस्तकावर बंदी घाला! बड्या नेत्याची CM देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मोठी मागणी
दादरच्या नामकरणावरून संभ्रम दूर! रेल्वे स्थानकाला नाही, मेट्रो...
दादरच्या नामकरणावरून संभ्रम दूर! रेल्वे स्थानकाला नाही, मेट्रो स्टेशनला मिळणार चैत्यभूमी नाव
मुंबई बँक निवडणुकीसाठी शिंदेसेनेची मोठी तयारी; स्वबळावर लढणार? आजच्या
मुंबई बँक निवडणुकीसाठी शिंदेसेनेची मोठी तयारी; स्वबळावर लढणार? आजच्या बैठकीत ठरणार रणनीती!
एकाच आठवड्यात गोकुळ दुधाच्या दारात दुसऱ्यांदा उसळी, किती रुपयांनी...
Gokul Milk : एकाच आठवड्यात गोकुळ दुधाच्या दारात दुसऱ्यांदा उसळी, किती रुपयांनी महागलं?
मतदारांची नावे यादीतून गायब? रोहित पवारांकडून थेट ऑडिओ क्लिप पोस्ट...
मतदारांची नावे यादीतून गायब? रोहित पवारांकडून थेट ऑडिओ क्लिप पोस्ट, भाजपवर गंभीर आरोप!
दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत आणखी 6 तालुक्यांची भर; कोणत्या....
Maharashtra Drought : दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत आणखी 6 तालुक्यांची भर; कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यांचा समावेश? व्हिडिओ बघाच 
दाऊद इब्राहिमच्या मुंबईतील घराच्या तोडक कारवाईला हायकोर्टाची स्थगिती..
Dawood Ibrahim : दाऊद इब्राहिमच्या मुंबईतील जुन्या घराच्या तोडक कारवाईला हायकोर्टाची स्थगिती; पुढील सुनावणी कधी?
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरुन मनोज जरागेंचा नवा दावा काय?
Manoj Jarange : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरुन मनोज जरागेंचा नवा दावा काय?