आईसाठी अवघ्या 19 व्या वर्षी 75 टक्के लिव्हर दिलं, 1 फूटापेक्षा जास्त पोट कापल्यावरही आज टॉपची अ‍ॅथिलीट ठरलीय

| Updated on: Apr 22, 2023 | 4:16 PM

लिव्हरचे ट्रान्सप्लांटचे मोठे ऑपरेशन झाल्याने महीनाभर बिछाण्यात पडल्यावर आपल्याला पुन्हा पूर्वी प्रमाणे खेळता येईल का असे प्रश्न मनात यायचे. आईला जरी वाचवू शकले नाही तरी...

आईसाठी अवघ्या 19 व्या वर्षी 75 टक्के लिव्हर दिलं, 1 फूटापेक्षा जास्त पोट कापल्यावरही आज टॉपची अ‍ॅथिलीट ठरलीय
ankita
Image Credit source: TV9 NETWORK
Follow us on

नवी दिल्ली :  मी आजही माझं लिव्हर काढून आईसाठी द्यायला तयार आहे, असे 29 वर्षांची अंकिता श्रीवास्तव म्हणतेय.. अवघ्या 19 व्या वर्षी आपले 74 टक्के यकृत आईला दान करूनही अ‍ॅथिलीट चॅम्पियन बनणाऱ्या अंकिताची कहानी म्हणजेच नेमकी जिद्द कशाला म्हणावे अशीच प्रेरणादायी आहे. अंकिता श्रीवास्तव या अमेरिकेतील पेनिसेल्विनियाच्या व्हार्टन स्कूल ऑफ बिझनेसमधून एमबीए करणाऱ्या विद्यार्थीनीचा आत्मविश्वास आणि कठोर मेहनत हे सर्वांच्या डोळ्यात अंजन घालणारा आहे. यशस्वी उद्योजक, ब्रॅंड मेकर, वर्ल्ड ट्रान्सप्लांट गेम विजेती नेमके काय तिचा उल्लेख करावा असा प्रश्न पडावा इतकी बिरूदे तिच्या नावाला चिकटली आहेत.

मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेरमध्ये तिचा जन्म झाला असला तरी भोपाळमध्ये ती वाढली. 2007 मध्ये अंकिताची आई आजारी पडली. तिला लिव्हर सिरोसिस हा गंभीर आजार झाला. आईला लिव्हर ट्रान्सप्लांटची गरज होती. सुदैवाने आईचा आणि अंकिताचा रक्तगट जुळल्याने अवघ्या 19 वर्षांची असताना अंकिता तिने तिचे 74 टक्के लिव्हर आईला दान करण्याचा निर्णय घेतला. हाच तिला वाचविण्याचा उत्तम मार्ग होता. परंतू चार महिन्यांनी मल्टी ऑर्गन फेल्युअरने तिची आई वारली. ऑपरेशननंतर अंकिताही महिनाभर बेडवर पडून होती. आई गेल्यानंतर वडीलांनी देखील वेगळे होण्याचा निर्णय घेतला आता आजी आणि बहिणीसह घराची संपूर्ण जबाबदारी तिच्या एकटीच्या खांद्यावर आली.

अंकिताने भोपाळच्या प्रिटींग, पब्लिकेशन आणि अ‍ॅनिमेशन कंपनीत कॉलेज शिकत काम करायला सुरूवात केली. हृदयारोपण झालेल्या तिच्या एका फॅमिली फ्रेंडने तिला #WorldTransplantGames बद्दल सांगितले. आणि तिने आपले स्पोर्ट्समध्ये उतरण्याचे स्वप्न पूर्ण करण्याची हीच संधी समजून या गेम्समध्ये उतरण्याचा निर्णय घेतला आणि प्रॅक्टीस करायला सुरूवात केली.

आजही अभिमान आहे

लिव्हरचे ट्रान्सप्लांटचे मोठे ऑपरेशन झाल्याने महीनाभर बिछाण्यात पडल्यावर आपल्याला पुन्हा पूर्वी प्रमाणे खेळता येईल का असे प्रश्न मनात यायचे. आईला जरी वाचवू शकले नाही तरी लिव्हर देण्याचा निर्णयाचा मला आजही अभिमान असल्याचे अंकिता सांगते. सुदैवाने तिला नोकरी देणारे मनिष आणि स्वाती रजोरीया दाम्पत्यच तिचे अप्रत्यक्ष पालकच बनले.

पुन्हा क्रीडा स्पर्धात उतरणे सोपे नव्हते

शाळेत असल्यापासून क्रीडा स्पर्धेत अंकिताने राज्य पातळीवर अनेक स्पर्धात बक्षिसे मिळवली होती. ती राष्ट्रीय पातळीची स्विमर होती. तीन वर्षे प्रॅक्टीस नसताना ट्रान्सप्लांटनंतर पुन्हा क्रीडा स्पर्धात उतरणे सोपे नव्हते.  आपण पहाटे चारला उठायचो, भोपाळच्या स्पोर्ट अथोरीटी ऑफ इंडीयात सकाळी 5 ते 9 प्रॅक्टीस करायचो. सकाळी 10.30 वा. ऑफिस नंतर सायं. 7 नंतर पुन्हा प्रॅक्टीस अशा खडतर ट्रेनिंगने आपण साल 2019 च्या युकेच्या वर्ल्ड ट्रान्सप्लांट गेममध्ये लांब उडी आणि गोळा फेकमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड केल्याचे तिने सांगितले.

डायट एकदम स्ट्रीक्ट

माझे डायट एकदम स्ट्रीक्ट आहे. जंकफूडला संपूर्ण बंदी, ताज्या भाज्या आणि फळे हेच उत्तम आणि शरीराला व्यायामाची लावलेली शिस्त यामुळेच आपण हे यश मिळविल्याचे अंकिता सांगते. माजी नॅशनल क्रिकेटपटू सतिश कुमार मला प्रशिक्षक लाभले. त्यांनी मला सर्जरीतून बाहेर पडायला मदत केलीच शिवाय मानसिक क्षमताही वाढविल्याचे अंकिता हीने म्हटले आहे. युके स्थित वर्ल्ड ट्रान्सप्लांट गेम्स फेडरेशनने 1978 पासून अवयवदानाला जागृती आणण्यासाठी आंतरराष्ट्रीय ऑल्मपिक कमिटीच्या मदतीने ही स्पर्धा भरावयला सुरूवात केली. दर चार वर्षांनी होणाऱ्या या स्पर्धात 60 देश भाग घेतात.