मुस्लिम मुलींचं उघडपणे धर्मांतर करून…’, पहलगाम हल्ल्यानंतर तरुणीने इस्लाम धर्माचा त्याग केला आणि…
Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यानंतर तरुणीने केला इस्लाम धर्माचा त्याग, संतापात नेटकरी म्हणाला, 'मुस्लिम मुलींचं उघडपणे धर्मांतर करून...', पहलगाम हल्ल्यानंतर देशात संतापाचं वातावरण आहे...

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यानंतर देशात संतापाची लाट उसळली आहे. तर दुसरीकडे हिंदू – मुस्लिम वाद टोकाला पोहोचला आहे. पहलगामच्या खोऱ्यात फिरणाऱ्या पर्यटकांना त्यांच्या धर्माबद्दल विचारल्यानंतर दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. या घटनेमुळे केवळ हिंदू धर्माचे लोकच नव्हे तर मुस्लिमांच्या भावना देखील दुखावल्या असून अनेकांनी मुस्लिम धर्माचा त्याग करत हिंदू धर्म स्वीकारला आहे.
हिंदू – मुस्लिम असा वाद सुरु असताना गाझियाबाद येथील एका तरुणीने इस्लाम धर्माच्या त्याग करत हिंदू धर्म स्वीकारला आहे. धर्मांतर कतर नेहा खान आता नेहा शर्मा झाली आहे. हिंदू धर्म स्वीकारल्यानंतर कोणाच्या दबावाखाली येवून धर्मांतराचा निर्णय घेतला नाही… असं देखील नेहा म्हणाली आहे.
हिंदू धर्म स्वीकारल्यानंतर नेहा म्हणाली, ‘दहशतवाद्यांनी हिंदू आहे की मुस्लिम असं विचारत हिंदू पर्यटकांची हत्या केली. असं असेल तर अशा धर्माच्या लोकांसोबत कशी राहू शकते. जे दुसऱ्याच्या धर्माचा आदर करत नाहीत.’ सांगायचं झालं तर, यासाठी तरुणीने हिंदू रक्षा दलाची मदत घेतली. हिंदू रक्षा दलाच्या अध्यक्षा पिंकी चौधरी यांनी नेहाला पाठिंबा दिला.
पहलगाममधील घटनेमुळे नेहाने हा निर्णय घेतल्याचं तिने स्वतः सांगितलं. पिंकी चौधरी यांनीही नेहाचं स्वागत केलं आणि नेहाचं रक्षण करण्यासाठी आमचा हिंदू रक्षा दल नेहमीच आघाडीवर राहील. स्वेच्छेने सनातन धर्म स्वीकारू इच्छिणाऱ्या अशा लोकांचं संघटना स्वागत करत राहील.
दरम्यान सोशल मीडियावर नेहाचा एक व्हिडीओ देखील व्हायरल होत आहे. व्हिडीओ साहील रिझवी नावाच्या नेटकऱ्याने एक्सवर पोस्ट केला आहे. व्हिडीओ पोस्ट करत साहील याने मोठा खुलासा देखील केला आहे. सध्या व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
ग़ाज़ियाबाद में मुस्लिम लड़की ‘ नेहा खान’ का धर्म परिवर्तन करवा कर नेहा शर्मा बनाया गया।
जिस तरह से खुलेआम मुस्लिम लड़कियों का धर्म परिवर्तन कराके हिंदू बनाया जा रहा है, इस पर प्रशासन कोई एक्शन क्यों नहीं ले रहा है?
जबकि इसके उलट अगर कोई हिंदू युवती मुस्लिम बनती है तो प्रशासन… pic.twitter.com/Ld3uKsiAoQ
— Sahil Razvi (@SahilRazvii) April 29, 2025
व्हिडीओ पोस्ट करत साहील याने कॅप्शनमध्ये, ‘गाझियाबादमध्ये ‘नेहा खान’ या मुस्लिम मुलीचं नेहा शर्मामध्ये धर्मांतर करण्यात आलं. ज्या पद्धतीने मुस्लिम मुलींना उघडपणे हिंदू धर्मात रूपांतरित केलं जात आहे त्यावर प्रशासन कोणतीही कारवाई का करत नाही?’
असा प्रश्न उपस्थित करत साहील पुढे म्हणाला, ‘याउलट, जर एखाद्या हिंदू मुलीने इस्लाम धर्म स्वीकारला असता तर प्रशासनाने त्वरित कारवाई केली असती आणि कलमांखाली गुन्हा दाखल केला असता. हा दांभिकपणा कशासाठी?’ सध्या नेहा हिच्या धर्मांतराची चर्चा सुरु आहे.
