
प्रेमात कोण काय करेल काहीही सांगता येत नाही. सिनेमात एखादी लव्हस्टोरी पाहिल्यानंतर त्यावर चर्चा सुरु होते. पण आता तर खऱ्या आयुष्यात असं काही घडलं आहे, ज्यावर तुमचा देखील विश्वास बसणार नाही. उत्तर प्रदेशातील सहारनपूरमध्ये रोमियो-ज्युलिएट, हीर-रांझा आणि सोनी-महिवाल यांच्यासारखीच सारखीच एका प्रेमकथा समोर आली आहे. कुटुंबातील सदस्यांनी प्रेमींना वेगळे करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. पण त्याचे परिणाम फार वाईट झाले. कुटुंबियांनी दोन प्रेम करणाऱ्या व्यक्तींना विभक्त करण्याचे अनेक प्रयत्न केले. एवढंच नाही तर, यामुळे मुलाला तुरुंगवास देखील भोगावा लागला. पण जेव्हा तो जामिनावर बाहेर आला तेव्हा असं काहीतरी घडलं ज्यामुळे दोन घरात शोककळा पसरली. खरं तर, दोघांनीही विष प्राशन करून स्वतःचं आयुष्य संपवलं.
संबंधित धक्कादायक घटना नानौटा येथील हुसेनपूर गावात घडली. येथील जंगलातील उसाच्या शेतात एका तरुणाचे आणि एका तरुणीचे मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळल्याने खळबळ उडाली. दोन्ही मृतदेहांजवळ सल्फाचे पॅकेटही आढळून आले. हुसेनपूर गावातील रहिवासी श्यामचा मुलगा अंकित हा ऊसाच्या शेतात पाणी घालत होता, तेव्हा त्याला शेतात एका तरुणाचा आणि एका तरुणीचा मृतदेह संशयास्पद स्थितीत पडलेले दिसले.
तरुणाची ओळख हुसैनपूर येथील रहिवासी रत्न सिंह अशी झाली असून त्याचं वय जवळपास 26 वर्ष असल्याचं कळत आहे. तर तरुणी हिचं नाव नीलम असं असून तिचं वय 20 वर्ष असल्याचं कळत आहेत. घटनेची माहिती पोलिसांना कळल्यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. पोलिसांसोबत आलेल्या फॉरेन्सिक टीमला घटनास्थळाजवळून विषारी पदार्थाचे रिकामे पॅकेट आणि मोबाईल फोन सापडले. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही मृतदेहांचे पंचनामे भरून पोस्टमॉर्टमसाठी पाठवले.
हुसैनपूर गावात जंगलातील एका शेतात दोघांचे मृतदेह आढळल्याचे पोलिस स्टेशनचे प्रभारी सचिन पुनिया यांनी सांगितल्यानुसार, दोघांनीही विषारी पदार्थ सेवन करून आत्महत्या केली आहे… प्रथमदर्शनी पोलिसांना असं दिसून आलं आहे. त्याचवेळी, दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याचे पोलिसांना आढळून आलं.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याआधी देखील तरुणाने तरुणीला पळवून नेण्याचा प्रयत्न केला होता. दोन वर्षांपूर्वी विनयवर मुलीला फसवून पळवून नेल्याचा आरोप होता. मुलीच्या कुटुंबाच्या तक्रारीवरून रामपूर मणिहरण पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ज्यामुळे मुलाला तुरुंगात बंद देखील करण्यात आलं होतं. काही दिवसांपूर्वी त्याची जामिनावर सुटका झाली. पण त्यानंतर दोघे पुन्हा बेपत्ता झाले आणि अखेर त्यांचे मृतदेह कुटुंबियांच्या हाती लागले.