20-25 हजारात मुली मिळतात अन्… भाजप महिला मंत्र्याच्या पतीचं वादग्रस्त वक्तव्य

Controversial statement : 20-25 हजारात मुली मिळतात अन्... अनेक वादग्रस्त प्रकरणात भाजप महिला मंत्र्याच्या पतीचं नाव... नोकराची किडनी आणि... धक्कादायक आहे प्रकरण...

20-25 हजारात मुली मिळतात अन्... भाजप महिला मंत्र्याच्या पतीचं वादग्रस्त वक्तव्य
फाईल फोटो
| Updated on: Jan 02, 2026 | 10:41 AM

Controversial statement : मुलींची काहीही कमीन नाही… मुलीतर 20 – 25 हजार रुपयांमध्ये मिळतात… असं धक्कादायक वक्तव्य भाजप महिला मंत्र्याच्या पतीने केलं आहे. ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. सांगायचं झालं तर, ही पहिली वेळ नाही जेव्हा भाजप महिला मंत्रीचे पती वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. याआधी देखील त्यांनी धक्कादायक कृत्य केलं आहे. आता मुलींबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. पण यापूर्वी त्यांनी नोकराची किडनी काढली आणि स्वतःच्या पहिल्या पत्नीला ट्रांसप्लांट केली… ज्यामुळे ते वादाच्या भोवऱ्यात देखील अडकले होते…

महिला सक्षमीकरण मंत्री रेखा आर्य यांचे पती गिरधारी लाल साहू यांचं एक विधान आता भाजपसाठी एक नवीन राजकीय डोकेदुखी बनलं आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेस पक्षाला विरोध करण्याची आणखी एक संधी मिळाली आहे… सांगण्यात येत आहे की, सोमेश्वर विधानसभेच्या शीतलखेत मंडळातील भाजप कार्यकर्त्यांच्या बैठकीत, अनेकदा वादात सापडलेले उत्तर प्रदेशातील बरेली येथील रहिवासी गिरधर लाल साहू यांनी असं विधान केलं ज्यामुळे महिलांच्या प्रतिष्ठेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.

सध्या त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. पण त्या व्हिडीओबद्दल कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही… व्हिडीओमध्ये साहू एका अविवाहित कार्यकत्याला सांगतात, ‘मुलींची काहीही कमीन नाही. बिहारमध्ये लग्न करण्यासाठी मुली 20 – 25 हजार रुपयांत मिळतात…’

दरम्यान, हा महिलांचा अपमान आहे… असं सांगत काँग्रेसने थेट महिला सक्षमीकरण मंत्र्यांच्या नैतिक जबाबदारीवर प्रश्न उपस्थित केला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष ज्योती रौतेला यांनी हे विधान लज्जास्पद असल्याचं म्हटलं आणि मंत्री रेखा आर्य आणि त्यांच्या पतीने जाहीर माफी मागावी अशी मागणी केली.

फसवणूक करून नोकराची किडनी काढल्याचा आरोप…

मिळालेल्या माहितीनुसार, गिरधारी लाल साहू यांचं विवादांसोबत फार जुनं नातं आहे.. साहू यांच्या नावावर डबल मर्डर केसचे देखील आरोप आहे. याशिवाय त्यांच्यावर फसवणूक करून नोकराची किडनी काढल्याचा देखील आरोप आहे. नोकराची किडनी काढून दुसरी पत्नी बैजयंतीमाला साहू हिला प्रत्यारोपित केली. नोकर चंद्र गंगवार यांच्यानुसार, 2015 मध्ये काही काम असल्याचं सांगत त्यांना श्रीलंकेत नेण्यात आलं. जिथे कोलंबोतील लंका रुग्णालयात नरेशची किडनी काढून बैजयंती मालाच्या शरीरात प्रत्यारोपित करण्यात आली.

मंत्री रेखा आर्य यांचे शक्तिशाली पती गिरधारी लाल साहू यांच्या दबावामुळे मी गप्प राहिलो असा दावाही नरेश यांनी केला. मात्र, नंतर त्यांनी ही बाब नैनितालमधील वरिष्ठ पोलिस अधीक्षकांना कळवली.