Today Gold Silver Rate: मोदी यांच्या सोनं खरेदी करु नका आव्हानानंतर किमती वाढल्या? सोनं-चांदीचा आजचा भाव किती?
Gold Silver Ptrice: सोनं चांदीच्या किमतीत काही बदल झाले आहेत का? किमती वाढल्या की कमी झाल्या आहेत? याबद्दल आता महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

Gold Silver Price Latest: महागाईमुळे कांदे आणि दूध खरेदी करणे कठीण झाले असताना, सोने आणि चांदीच्या किमती मात्र दिलासा देत आहेत. आज, ३ सप्टेंबर रोजी सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा एकदा कपात झाली आहे. या दोन्हींच्या दरातील हा महत्त्वपूर्ण बदल सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सोनं चांदीच्या किमती स्वस्त झाल्यामुळे आता सणासुदीला लोकांच्या खिशाचा भार कमी होईल. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोन्याबाबत नुकतेच एक विधान केले होते. यानंतर आता सोन्याच्या किमती वाढल्या आहेत की कमी झाल्या आहेत ते पाहा..
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच एक घोषणा केली आहे, पंतप्रधानांनी देशवासियांना सोने खरेदी करण्यासंदर्भात पुन्हा एकदा आवाहन केले आहे. ते म्हणाले, “अत्यावश्यक असल्याशिवाय सोने खरेदी करू नका. आपण स्वदेशी आणि आत्मनिर्भरतेवर जितका अधिक भर देऊ, तितकाच मला विश्वास आहे की, जेव्हा आपण स्वातंत्र्याची १०० वर्षे साजरी करू, तेव्हा आपण आपल्या तरुण पिढीकडे एक विकसित भारत सोपवू.”
सोने किती स्वस्त झाले?
जागतिक बाजारातील मंदीमुळे सोन्याच्या दरात सलग सहाव्या सत्रात घसरण सुरू आहे. आज सोन्याचा भाव २,१०० रुपयांनी घसरून प्रति १० ग्रॅम १.५६ लाख रुपयांवर आला आहे. ९९.९ टक्के शुद्धतेच्या २४-कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,५८,२०० रुपयांच्या बंद पातळीवरून २,१०० रुपयांनी घसरून जवळपास तीन आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर म्हणजेच प्रति १० ग्रॅम १,५६,१०० रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या सहा ट्रेडिंग सत्रांमध्ये सोन्याच्या दरात ₹११,००० रुपयांची घसरण झाली आहे.
चांदीचा भाव किती?
चांदीच्या दरातही सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली आहे. आज चांदीचा भाव ₹5,000 ने घसरून ₹235,500 प्रति किलोग्राम झाला आहे. मागील सत्रात चांदीचा भाव ₹240,500 प्रति किलोग्रामवर बंद झाला होता.
आंतरराष्ट्रीय बाजारात काय परिस्थिती?
सोन्याचा भाव ₹25.24 ने, म्हणजेच 0.58 टक्क्यांनी वाढून ₹4,303.12 प्रति औंस झाला आहे, तर चांदीचा भाव जवळपास 1 टक्क्याने घसरून ₹63.64 प्रति औंस झाला आहे. त्याच वेळी, मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये चांदीचा भाव 1,841 रुपयांनी म्हणजेच 1 टक्क्याने घसरून 2,33,600 रुपये प्रति किलो झाला आहे.