गुगल मॅप ठरला चुकीचा, स्थानिक लोकांनी केला देशी जुगाड

| Updated on: Mar 22, 2024 | 10:33 AM

Google Is Wrong: गुगल चुकीचा आहे, अशी पोस्ट सोशल मीडियावर पडली. 49 हजारांपेक्षा जास्त लोकांनी ही पोस्ट पाहिली आहे. लोक गुगल मॅपमुळे आपणही भरकटले गेलो होतो, असे अनुभव शेअर करत आहे. एका युजरने लिहिले आहे, आम्ही चुकीचे झालेले लिस्टिंग योग्य करण्याचा प्रयत्न करतो. परंतु गुगल टीम ते काढून टाकते.

गुगल मॅप ठरला चुकीचा, स्थानिक लोकांनी केला देशी जुगाड
गुगल मॅप चुकीचा असल्याचे लावलेले बोर्ड
Follow us on

गुगल जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. गुगलचा वापर करुन अनेक कामे सोपी होतात. गुगलमुळे कोणताही माहिती शोधणे सोपे होते. त्याचवेळी गुगल मॅपमुळे रस्ते समजतात. त्यामुळे गुगल मॅपचा वापर करुन अनोळखी ठिकाणी नवीन व्यक्ती सहज जातो. आता यासंदर्भात एक सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल झाली आहे. गुगल मॅप या ठिकाणी जाऊन गोंधळून जातो. लोकांना चुकीचा मार्ग दाखवतो. यामुळे लोकांनी अनोखा मार्ग शोधला आहे. लोकांनी गुगल मॅप संदर्भात बोर्ड लावले आहे. त्या बोर्डचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. त्याची चांगली चर्चाही रंगली आहे.

गुगल मॅपचा वापर रोज लाखो लोक करतात. अनेक वेळा गुगल मॅप चुकीच्या ठिकाणी पोहचवून देत असल्याचा अनुभव अनेकांना येतो. त्यामुळे लोक भरकटून जातात. त्यांना त्याचा मनस्ताप होत असतो. जुना डेटा, जीपीएस आणि कनेक्टिव्हीटीमुळे हा प्रकार होतो. कर्नाटकमधील कोडागु जिल्ह्यात लोकांना अशी अडचणी येत आहेत. त्यावर स्थानिक लोकांनी उपाय काढला आहे. त्या उपायाची चांगली चर्चा होत आहे.

हे सुद्धा वाचा

गुगल चुकीचा आहे

कोडागु जिल्ह्यातील स्थानिक लोकांनी बाहेरुन येणाऱ्या प्रवाशांच्या सुविधांसाठी बोर्ड लावले आहे. स्थानिक लोकांनी गुगलचे नेव्हीगेशन चुकीचे असल्याचा इशारा दिला आहे. लोकांनी बोर्ड लावून त्यावर लिहिले आहे, गुगल चुकीचा आहे. हा रस्ता क्लब महिंद्रकडे जात नाही. X वर हा फोटो ‘@KodaguConnect’ नावाच्या हँडलने शेअर केला आहे. गुगल सॅटेलाइट लोकेशनमधील गोंधळामुळे मॅप वापरणारे लोक ठिकाणी पोहचत आहे. स्थानिक लोक रस्ता भरकटलेला लोकांना उत्तर देऊन देऊन वैतागले आहे. यामुळे हे बोर्ड लावण्यात आले आहे.

युजर्सकडून गुगलवर संताप

इंटरनेटवर ही पोस्ट वेगाने व्हायरल होत आहे. आतापर्यंत 49 हजारांपेक्षा जास्त लोकांनी ही पोस्ट पाहिली आहे. लोक गुगल मॅपमुळे आपणही भरकटले गेलो होतो, असे अनुभव शेअर करत आहे. एका युजरने लिहिले आहे, आम्ही चुकीचे झालेले लिस्टिंग योग्य करण्याचा प्रयत्न करतो. परंतु गुगल टीम ते काढून टाकते. अनेक युजर्सने गुगल मॅपवर आपला संताप व्यक्त केला आहे.