शेतकऱ्यांची दिवाळी होणार दणक्यात…; नरेंद्र मोदींनी दिवाळी गिफ्टही केलं जाहीर…

देशभरातील 8 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 2000-2000 रुपयांचा हफ्ता पाठवला असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले.

शेतकऱ्यांची दिवाळी होणार दणक्यात...; नरेंद्र मोदींनी दिवाळी गिफ्टही केलं जाहीर...
| Updated on: Oct 17, 2022 | 3:50 PM

नवी दिल्लीः गेल्या काही दिवसांपासून पीएम किसान सन्मान निधी योजनेचा (PM Kisan Sanman Nidhi Yojana) पुढील हफ्ता कधी मिळणार असा वारंवार सवाल उपस्थित केला जात होता. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सोमवारी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 12वा हप्ता जाहीर केला आहे. त्याचबरोबर देशभरातील 8 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 2000-2000 रुपयांचा हफ्ता पाठवला असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी केंद्र सरकारने पीएम किसान योजनेच्या 12 व्या हप्त्यासाठी 16,000 कोटी रुपये खर्च केले असल्याचेही सांगण्यात आले आहे.

दिल्लीतील पुसा कॅम्पसमध्ये आयोजित केलेल्या पीएम किसान सन्मान 2022 मेळ्याच्या उद्घाटनप्रसंगी 12 वा हप्ता जमा केल्याचे सांगण्यात आले.

तर त्याचवेळी पंतप्रधानांनी रसायन आणि खते मंत्रालयाच्या अंतर्गत किसान समृद्धी 600 केंद्रांचे उद्घाटनही करण्यात आले. कृषी स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी युवक आणि कृषी शास्त्रज्ञांनाही यावेळी विकासाचा मंत्र दिला गेला.

नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन संस्था येथे ही परिषद दोन दिवस चालणार आहे. यामध्ये शेतकरी, कृषी क्षेत्रात काम करणारे युवक, शास्त्रज्ञ, अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमात देशभरातील 13,500 हून अधिक शेतकरी आणि सुमारे 1500 कृषी स्टार्टअप्स एका व्यासपीठावर एकत्र येणार आहेत.

या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते यांनी भारतीय जनता खत प्रकल्प, वन नेशन वन फर्टिलायझरचाही शुभारंभही करण्यात आला आहे.

या योजनेंतर्गत प्रधानमंत्री भारत योजनेखाली युरियाही लाँच करण्यात आल्या. त्यामुळे आता भारतभर एकाच ब्रँडखाली खतांची विक्री केली जाणार आहे.

कृषी मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंत पात्र शेतकरी कुटुंबांना पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत 12 हप्त्यांमध्ये दोन लाख कोटी रुपयांहून अधिकचे लाभ मिळाले आहेत.

यापैकी 1.6 लाख कोटी रुपये केवळ कोविड महामारीदरम्यान हस्तांतरित करण्यात आले. त्याचबरोबर बाराव्या हप्त्याबाबत शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. लोक त्यांची खाती तपासत आहेत.

तुमच्या खात्यात पैसे पोहोचले आहेत की नाही हे शोधण्यासाठी ही पद्धत फॉलो करा.