Success Story : खरच मणिबेनकडून खूप काही शिकण्यासारखं, फक्त दूध विकून कमावते कोट्यवधी, वाचा तिची सक्सेस स्टोरी

Success Story :हिमालय सुद्धा मजबूत इरादे असलेल्या माणसाला हलवू शकत नाही. ही गोष्ट एक महिलेने सिद्ध करुन दाखवलीय.जर, तुम्ही कठोर मेहनत करण्यासाठी प्रतिबद्ध असाल, तर कुठल्या हाय-प्रोफाईल नोकरीशिवाय सुद्धा चांगली कमाई करु शकता.

Success Story : खरच मणिबेनकडून खूप काही शिकण्यासारखं, फक्त दूध विकून कमावते कोट्यवधी, वाचा तिची सक्सेस स्टोरी
Maniben
| Updated on: Sep 23, 2025 | 2:45 PM

हिमालय सुद्धा मजबूत इरादे असलेल्या माणसाला हलवू शकत नाही. ही गोष्ट गुजरातच्या एक महिलेने सिद्ध करुन दाखवलीय. फक्त शिक्षण किंवा मोठी नोकरी करुन तुम्ही कोट्यवधी रुपये कमवू शकत नाहीत, हे सुद्धा मणिबेनने सिद्ध केलय. जर, तुम्ही कठोर मेहनत करण्यासाठी प्रतिबद्ध असाल, तर कुठल्या हाय-प्रोफाईल नोकरीशिवाय सुद्धा चांगली कमाई करु शकता. तुम्ही मेहनत आणि प्रतिभेच्या जोरावर यश मिळवू शकता.

ही महिला कुठल्या मल्टीनॅशनल कंपनीत काम करत नाही. दूध विकून तिने कोट्यवधी रुपये कमावलेत. महिलेच नाव मणिबेन आहे. मणिबेन बनासकांठा जिल्ह्यात राहते. मणिबेनने वर्ष 2024-25 मध्ये 1.94 कोटी रुपयाच दूध विकलं. आता मणिबेनच लक्ष्य 3 कोटी पर्यंत दूध विक्री करणं आहे. मणिबेन 65 वर्षांची आहे.मणिबेन जेसुंगभाई चौधरी स्थानीय पटेलवास (कसारा), दुग्ध उत्पादक सहकारी समितीला दररोज 1,1100 लीटर दुधाचा पुरवठा करते.

2011 मध्ये किती म्हशी आणि गायी होत्या?

“मणिबेनने 2024-25 मध्ये 3,47,000 लीटरपेक्षा जास्त दूधाची विक्री केली. 100 आणखी नवीन म्हशी विकत घेणं हे मणिबेनच लक्ष्य आहे. तिच्या मुलाने सांगितलं की, “2011 मध्ये आमच्याकडे फक्त 10 म्हशी आणि 12 गायी होत्या. आता ही संख्या वाढून 230 पेक्षा जास्त झाली आहे. आता आम्हाला 100 आणखी म्हशी विकत घेऊन दूध उत्पादन वाढवायच आहे” आज मणिबेनच्या पशुपालन कार्याशी जवळपास 16 कुटुंब संलग्न आहेत.

सहकारी क्षेत्रात एक अग्रणी राज्य

मणिबेन आपल्या गायी आणि म्हशींच दूध काढण्यासाठी आधुनिक मशीन्सचा वापर करतात.कुटुंबातील सर्व सदस्य पशूपालनात सक्रीय आहे. आत्ननिर्भर बनण्यासाठी ते प्रेरणा देतात. राज्याचे गृहमंत्री हर्ष सांघवी यांनी मणिबेनबद्दल पोस्ट केलीय. हर्ष सांघवी यांनी आपल्या एक्सवरील पोस्टमध्ये म्हटलय की, गुजरात संपूर्ण भारतात सहकारी क्षेत्रात एक अग्रणी राज्य बनलं आहे.

1.94 कोटी रुपयाची दूध विक्री

गुजरातमधील पशुपालक शेतकऱ्यांची उल्लेखनीय समृद्धि होत असल्याच राज्याच्या गृह मंत्र्‍यांनी म्हटलं आहे. महिला आत्मनिर्भर होत आहेत. व्यापक समाजाला प्रेरित करत आहेत. बनासकांठाच्या मणिबेन वर्ष 2024-25 मध्ये दूध विक्रीच्या बाबतीत जिल्ह्यात दुसऱ्या स्थानावर राहिल्या. मणिबेन यांनी 1.94 कोटी रुपयाची दूध विक्री केली. आता यावर्षी तीन कोटी पर्यंत दुधाच्या विक्रीच लक्ष्य आहे.