Har Ghar Tiranga : काय आहे हर घर तिरंगा अभियान? जाणून घ्या ध्वजारोहणाचे नियम

येत्या 15 ऑगस्ट रोजी भारताचा 75 वा स्वातंत्र्यदिन असून देशभरात अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने सरकारतर्फे ' हर घर तिरंगा ' अभियान राबवण्यात येत आहे.

Har Ghar Tiranga : काय आहे हर घर तिरंगा अभियान? जाणून घ्या ध्वजारोहणाचे नियम
Har Ghar Tiranga Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Aug 13, 2022 | 1:12 PM

Rules To Hoist National Flag:  येत्या 15 ऑगस्ट रोजी भारताचा 75 वा स्वातंत्र्यदिन (75th Independence Day of India) आहे. यानिमित्ताने देशभरात केंद्र सरकारच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव हा उपक्रम राबावण्यात येत आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत देशभरात वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने सरकारतर्फे ‘ हर घर तिरंगा’ (Har Ghar Tiranga) अभियान राबवण्यात येत आहे. या अभियाना अंतर्गत 13 ते 15 ऑगस्ट असे तीन दिवस सर्वांना आपल्या घरांवर राष्ट्रध्वज (National Flag) फडकवण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला केले आहे. प्रत्येक स्वतंत्र देशाचा एक राष्ट्र ध्वज असतो. भारताच्या राष्ट्रध्वजाला ‘तिरंगा’ असे म्हणतात. जाणून घेऊया तिरंग्याबद्दलची काही रोचक माहिती…

काय आहे हर घर तिरंगा अभियान ?

  • ‘हर घर तिरंगा ‘ अभियानाद्वारे सरकारची योजना आहे की भारतातील प्रत्येक घरावर राष्ट्रध्वज फडकावा. यासाठी सरकारने 20 कोटी घरांचे लक्ष्य निश्चित केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर एक ट्विट करत ‘हर घर तिरंगा’ या मोहीमेबद्दल माहिती दिली होती. 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान प्रत्येकाने आपल्या घरावर तिरंगा फडकवून या मोहिमेला बळकटी द्यावी, असे आवाहन त्यांनी केले होते. 1947 साली 22 जुलै रोजी तिरंग्याचा राष्ट्रध्वज म्हणून स्वीकार करण्यात आला होता, असेही पंतप्रधानांनी नमूद केले होते.
  • आज देशभरात तिरंगा अभियान राबवण्यात येत आहे, मात्र एक काळ असा होता की प्रत्येक घरात ध्वजारोहण करता येणे शक्य नव्हते. बऱ्याच बदलांनंतर सामान्य जनतेचे घर, ऑफीस, कार्यालये आणि शाळांमध्ये ध्वजारोहण करणे शक्य झाले. 2002 मध्ये ध्वजारोहणाच्या नियमांमध्ये बदल झाल्यानंतर सामान्य नागरिकांना हा अधिकार मिळाला. तिरंग्याच्या ध्वजसंहितेतील तरतुदींविषयी जाणून घ्या.
  • फ्लॅग कोड ऑफ इंडिया 2.1 नुसार, प्रत्येक व्यक्तीला सार्वजनिक ठिकाणी, खासगी जागेत किंवा शैक्षणिक संस्थेत ध्वजारोहणाचा अधिकार आहे. मात्र ध्वजारोहणावेळी काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. 1971 च्या Prevention of Insults to National Honour Act अंतर्गत काही नियम असून त्याचे काटेकोरपणे पालन करणे अत्यंत महत्वाचे आहे.

काय आहेत ध्वजारोहणाचे नियम ?

हर घर तिरंगा मोहीमेअंतर्गत आपल्या घरावर तिरंगा लावण्यापूर्वी काही नियम जरूर जाणून घ्या व त्यांचे पालन करा .

  1. ध्वजारोहण करतान हे लक्षात ठेवावे की, तिरंग्याचा सन्मान सर्वात महत्वाचा आहे. कधीही फाटलेला अथवा खराब झालेला ध्वज लावू नये.
  2. तिरंगा कधीही उलटा फडकावू नये. ध्वजारोहण करताना केशरी रंग सर्वात वरती दिसला पाहिजे.
  3. राष्ट्रध्वज कोणासमोरही झुकवू नये. त्यासह तिरंग्याच्या आसपास इतर कोणताही ध्वज त्यापेक्षा उंच अथवा त्याच्याबरोबरीने लावलेला नसावा.
  4. तिरंग्याच्या दांड्यावर इतर कोणतीही गोष्ट अथवा वस्तू नसावी. त्यामध्ये फुलं, माळा यांचाही समावेश आहे.
  5. ध्वजारोहण करताना त्याला कधीही जमीन अथवा पाण्याचा स्पर्श होऊ देऊ नये.
  6. तिरंग्याचा कधीही एखादा पेहराव म्हणून वापर वापर करू नये. आपला रुमाल, उशी किंवा इतर कोणत्याही वस्तूंवर तिरंग्याचा वापर करू नये. तसेच तिरंग्यावर कधीही, काहीही लिहू नये.
Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.