ज्येष्ठ विधिज्ञ हरिश साळवे विवाहबंधानात, 65 व्या वर्षी पुन्हा लग्नाची बेडी

ज्येष्ठ विधिज्ञ हरिश साळवे वयाच्या 65 व्या वर्षी दुसऱ्यांदा लग्न करत आहेत. आपली 56 वर्षीय मैत्रिण कॅरोलिन ब्रॉसर्ड यांच्याशी येत्या 28 ऑक्टोबरला ते विवाहबद्ध होणार आहेत.

ज्येष्ठ विधिज्ञ हरिश साळवे विवाहबंधानात, 65 व्या वर्षी पुन्हा लग्नाची बेडी

नवी दिल्ली : ज्येष्ठ विधिज्ञ हरिश साळवे वयाच्या 65 व्या वर्षी दुसऱ्यांदा लग्न करत आहेत. आपली 56 वर्षीय मैत्रिण कॅरोलिन ब्रॉसर्ड यांच्याशी येत्या 28 ऑक्टोबरला ते विवाहबद्ध होणार आहेत. हरिश साळवे आणि कॅरोलिन ब्रॉसर्ड दोघांचाही हा दुसरा विवाह आहे. (Harish Salve Will Marry Caroline Brosard)

हरिश साळवे यांनी आपल्या पूर्वपत्नी मिनाक्षी साळवे यांच्यासोबत असलेला 38 वर्षांचा संसार मोडत लग्नाचा निर्णय घेतला. मागच्याच महिन्यात ते दोघेही विभक्त झाले. मिनाक्षी आणि हरिश साळवे यांना दोन मुली आहेत आणि कॅरोलिन ब्रॉसर्ड याही एका मुलीची आई आहेत.

हरिश साळवे आणि कॅरोलिन ब्रॉसर्ड यांची एका प्रदर्शनादरम्यान ओळख झाली. या ओळखीचं रूपांतर मैत्रीत आणि नंतर प्रेमात झालं. दिवसेंदिवस त्यांच्यातलं नातं अधिकाधिक घट्ट होत गेलं आणि आता ते विवाहबंधनात अडणार आहेत.

मूळचे महाराष्ट्रातील नागपूरचे असणारे हरिश साळवेंनी धर्मांतर करून ख्रिश्चन धर्म स्वीकारल्याची अफवा आहे. या अफवेत तथ्य नाही. कुटुंबापासून दुरावल्यानंतर कॅरोलिन ब्रॉसर्ड यांनी त्यांना सावरलं. त्यांचा आधार बनल्या.

हरिश साळवे यांचा कायद्याचा अभ्यास दांडगा आहे. ते माजी सॉलिसिटर जनरल राहिले आहेत. वेगवेगळ्या केसमध्ये हरिश साळवे यांनीच आपली बाजू मांडावी, अशी अनेकांची इच्छा असते. कुलभूषण जाधव केसमध्ये हरिश साळवेंनी भक्कम बाजू मांडली. ही केस लढवण्यासाठी त्यांनी घेतलेली 1 रुपया फी चर्चेत राहिली.

हरिश साळवे यांचं शालेय शिक्षण नागपूरमध्ये झालं. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश शरद बोबडे आणि साळवे यांचं शालेय शिक्षण एकाच शाळेतून झालं आहे. त्यानंतर ते दिल्लीला आले आणि सॉलिसिटर जनरल झाले. हरिश साळवे येत्या 28 ऑक्टोबरला दुसऱ्यांदा विवाहबद्ध होत आहेत. कलाकार असणाऱ्या कॅरोलिन ब्रॉसर्ड यांच्यासोबत ते वयाच्या 65 व्या वर्षी ते लग्नगाठ बांधत आहेत. (Harish Salve Will Marry Caroline Brosard)

हरिश साळवेंची कारकीर्द

बॅरिस्टर हरिश साळवे हे नाव देशातल्या सर्वात प्रभावशाली व्यक्तिमत्वांमध्ये 43 व्या क्रमांकावर आहे. हरिश साळवे यांचा जन्म धुळे जिल्ह्यातल्या वरुड या गावात झाला. घरातूनच वकिलीचं बाळकडू मिळालं. साळवे यांचे आजोबा पी. के. साळवे हे प्रख्यात क्रीमिनिल लॉयर होते. तर त्यांचे पणजोबा हे न्यायाधीश होते. साळवे यांचे वडील एन. के. पी. साळवे हे काँग्रेसचे दिग्गज नेते होते. हरिश साळवे हे वकिली करण्याआधी सीए झाले. पण प्रख्यात वकील नानी पालखीवाला यांच्यामुळे प्रभावित झालेल्या साळवे यांनी सीए झाल्यानंतर वकिलीची डिग्री मिळवली. 1992 मध्ये हरिश साळवे सुप्रीम कोर्टाचे वरिष्ठ वकील बनले आणि 1999 मध्ये त्यांना सॉलिसिटर म्हणून काम करण्याची संधी मिळाली.

(Harish Salve Will Marry Caroline Brosard)

संबंधित बातम्या

अजून 1 रुपया मिळाला नाही, दिल्लीत जाऊन घेणार : हरिश साळवे

देशातले सर्वात महागडे वकील हरिश साळवे कोण आहेत?

खटला कुठेही चालू द्या, पाकिस्तानला कुलभूषण यांना न्याय द्यावाच लागेल : हरिश साळवे

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *