Monsoon : आता दोन दिवसाची प्रतीक्षा, सक्रीय झालेला मान्सून मुसळधार बरसणार..!

| Updated on: Jun 16, 2022 | 5:24 PM

ज्या विभागातून मान्सूनचे राज्यात आगमन झाले आहे त्या कोकणात देखील गेल्या काही दिवसांपासून पावसाने उसंत घेतलीय. त्यामुळे पाऊस बरसणार कधी असा सवाल उपस्थित होत असतानाच आता हवामान विभागाने 20 जून रोजी कोकणात तर अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे गायब झालेला पाऊस पुन्हा मोठ्या जोमाने परतेल अशी आशा बाळगली जात आहे.

Monsoon : आता दोन दिवसाची प्रतीक्षा, सक्रीय झालेला मान्सून मुसळधार बरसणार..!
राजीवली वाघरालपडा दुर्घटनेनंतर वसई तालुक्यात पर्यटन स्थळांवर बंदी
Follow us on

मुंबई : 10 जून रोजी राज्यात आगमन झालेल्या (Monsoon) मान्सूनने हळूहळू का होईना राज्य व्यापले आहे. मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये आगमनाची प्रतिक्षा असली तरी आगामी दोन दिवसांमध्ये ती चिंता देखील मिटणार आहे. कारण 18 जून पासून राज्यात (Heavy Rain) जोरदार पावसाला सुरवात होणार असल्याचे संकेत (Meteorological Department) हवामान विभागाने दिले आहेत. विदर्भात तर पावसाला सुरवात झाली असून शनिवारपासून कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मान्सून आगेकूच करणार आहे. शिवाय ज्या भागामध्ये अजून मान्सूनने हजेरीही लावलेली नाही तो भागही व्यापला जाणार आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून मान्सूनच्या वाटचालीबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. आगामी दोन दिवसांमध्ये हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे वरुणराजाचे आगमन झाले तर शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न मार्गी लागणार आहेत.

कोकणात अलर्ट जारी

ज्या विभागातून मान्सूनचे राज्यात आगमन झाले आहे त्या कोकणात देखील गेल्या काही दिवसांपासून पावसाने उसंत घेतलीय. त्यामुळे पाऊस बरसणार कधी असा सवाल उपस्थित होत असतानाच आता हवामान विभागाने 20 जून रोजी कोकणात तर अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे गायब झालेला पाऊस पुन्हा मोठ्या जोमाने परतेल अशी आशा बाळगली जात आहे. 18 जूनपासून राज्यात जोराचा पाऊस तर होणार आहेच पण कोकणासाठी अलर्ट असल्याचे हवामान विभागाचे प्रमुख डॉ. अनुपम कश्यपी यांनी सांगितले आहे.

विदर्भ मराठवाड्यालाही मिळणार दिलासा

राज्यात सर्वत्र पाऊस सक्रीय झाला असला तरी विदर्भ आणि मराठवाड्याकडे पावसाने पाठ फिरवलेली होती. मराठवाड्यातील शेतकऱ्यांना तर खरिपाबद्दल चिंतेचे ढग दाटून आले आहेत. पण आता दोन दिवसांमध्ये मराठावाड्यातील 8 ही जिल्ह्यामध्ये पाऊस हजेरी लावरणार आहे तर विदर्भात मान्सून दाखल झाला असून गुरुवारी गोंदिया जिल्ह्यात सरी बरसल्या आहेत. मान्सून आपले रुप बदलणार असून पुढील दोन दिवसांमध्ये राज्यभरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

हे सुद्धा वाचा

रखडलेल्या पेरण्या लागणार मार्गी

आगमन झालेला मान्सून राज्यात सक्रीय न झाल्यामुळे खरीप हंगामातील पेरण्या रखडल्या आहेत. गतवर्षी 15 जून पर्यंत पेरण्या अंतिम टप्प्यात होत्या. यंदाही शेतकऱ्यांनी सर्वतोपरी तयारी केली होती पण वेळेपूर्वी दाखल होणारा मान्सूनचे मार्गक्रमणच हुकले. त्यामुळे राज्यातील अनेक विभागात अजूनही खरिपाच्या पेरण्या झालेल्या नाहीत. आता दोन दिवसांमध्ये पावसाने हजेरी लावली तर चित्र बदलेन असा आशावाद आहे.