Latur Market : सोयाबीन दरात चढ-उतार सुरुच, खरेदी केंद्र बंद नंतर हरभऱ्याचे काय मार्केट? वाचा सविस्तर शेतीमालाचे दर

जूनच्या पहिल्या आठवड्यापासून सोयाबीनच्या दरात सुधारणा झाली होती. 6 हजार 400 आलेले दर पुन्हा 6 हजार 600 पर्यंत येऊन ठेपले होते. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी साठवणूक केली आहे. त्यांना सोयाबीन विक्रीची संधी मिळाली होती. पण हे वाढलेले दर चार दिवसही टिकून राहिलेले नाहीत.

Latur Market : सोयाबीन दरात चढ-उतार सुरुच, खरेदी केंद्र बंद नंतर हरभऱ्याचे काय मार्केट? वाचा सविस्तर शेतीमालाचे दर
वाशिम जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये सोयाबीनच्या दरात तफावत आढळून येत आहे.
Follow us
| Updated on: Jun 16, 2022 | 4:34 PM

लातूर : एकीकडे (Kharif Sowing) पेरण्या रखडल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे ढग दाटले आहेत. अशातच (Agricultural Prices) शेतीमालाच्या दरातही घसरण ही सुरुच आहे. गतवर्षी 15 जूनपर्यंत निम्म्या पेक्षा अधिकच्या क्षेत्रावर खरीप हंगामातील पेरण्या पार पडल्या होत्या. तर दुसरीकडे शेतीमालाच्या दरातही घसरण ही सुरुच आहे. गतआठवड्यात (Soybean Rate) सोयाबीनच्या दरात चांगली सुधारणा झाली होती. 6 हजार 600 रुपेय क्विंटल असा दर मिळत होता. तर आता पुन्हा दरात घट सुरु झाली आहे. केवळ सोयाबीनच नाही तर तूर आणि हरभऱ्याचीही तीच अवस्था आहे. त्यामुळे एकंदरीत शेती व्यवसयावर आता चिंतेचे ढग असून वरुणराजाने हजेरी लावून शेतकऱ्यांवरील संकट दूर करावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. बाजारपेठेतील शेतीमालाच्या आवकवरही मोठा परिणाम झाला आहे.

सोयाबीनच्या दरात अशी झाली घट

जूनच्या पहिल्या आठवड्यापासून सोयाबीनच्या दरात सुधारणा झाली होती. 6 हजार 400 आलेले दर पुन्हा 6 हजार 600 पर्यंत येऊन ठेपले होते. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी साठवणूक केली आहे. त्यांना सोयाबीन विक्रीची संधी मिळाली होती. पण हे वाढलेले दर चार दिवसही टिकून राहिलेले नाहीत. कारण पुन्हा लातूर बाजार समितीमध्ये सोयाबीन हे 6 हजार 450 वर येऊन ठेपले आहे. सोयाबीनच्या दरात असाच चढ-उतार राहिला तर मात्र, उन्हाळी सोयाबीनच्या दराबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे.

हरभरा खरेदी केंद्र बंद, दरावर परिणाम

राज्यातील अनेक जिल्ह्यातील अनेक जिल्ह्यातील हरभरा खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्यामुळे खरेदी केंद्र ही बंद झाली आहेत. खरेदी केंद्रावर 5 हजार 230 हा हमीभाव तर खुल्या बाजारपेठेत 4 हजार 500 असा दर हरभऱ्याला होता. मात्र, अचानक खरेदी केंद्र बंद झाल्याने त्याचा परिणाम आता खुल्या बाजारपेठेतील दरावरही झाला आहे. कारण सध्या हरभऱ्याला 4 हजार 300 असा दर मिळत आहे. तर दुसरीकडे तुरीला देखील हमीभावापेक्षा कमीच दर बाजारपेठेत आहे. तुरीला हमीभाव 6 हजार 300 रुपये असताना सध्या दर हे 6 हजार 100 एवढा आहे.

हे सुद्धा वाचा

पेरण्या लांबल्याने आवकही घटली

मध्यंतरी ढगाळ वातावरण आणि तुरळक ठिकाणी झालेल्य पावसामुळे बी-बियाणे, खत खरेदीची लगबग सुरु झाली होती. शिवाय शेतीमालाची विक्री करुन शेतकरी आपली गरज भागवित होता. पण पावसाने चक्क उघडीप दिल्याने बाजारपेठेत कमालीचा शुकशुकाट निर्माण झाला आहे. शेतीमालाची आवक ठप्प झाल्याने उलाढालीवरही त्याचा परिणाम झाला आहे.

असे आहेत दर

लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतीमालाची आवक घटली आहे. असे असताना शेतीमालाचे दर असे. लाल तूर 6050, पांढरी तूर 6199, हरभरा- 4300, सोयाबीन 6400, मुग मिल-5790,उडीद-6250 असे दर आहेत.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.