Chickpea Crop : शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता, हरभऱ्याच्या आयातीमध्ये घट, आता मिळणार का अधिकचा दर..!

देशातील डाळीची मागणी पुरवण्यासाठी सरकारला हरभऱ्याची आयात करावी लागते. असे असले तरी दिवसेंदिवस आयात घटत असून ही दिलासादायक बाब आहे. एप्रिल ते फेब्रुवारी या कालावधीत हरभरा आयातीमध्ये 60 टक्क्यांहून अधिकची घट झाली आहे. आता आयात ही 0.61 लाख मेट्रीक टनावर आली आहे.

Chickpea Crop : शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता, हरभऱ्याच्या आयातीमध्ये घट, आता मिळणार का अधिकचा दर..!
हरभऱ्याच्या आयातीमध्ये मोठी घट झाली आहे.
Follow us
| Updated on: Jun 16, 2022 | 3:54 PM

मुंबई : यंदा (Chickpea Production) हरभऱ्याच्या विक्रमी उत्पादनाचा परिणाम थेट राष्ट्रीय पातळीवर झाल्याचे पाहवयास मिळत आहे. कारण ज्या तुलनेत दरवर्षी हरभऱ्याच्या आयात होत असते त्यामध्ये यंदा कमालीची घट झाली आहे. देशांतर्गत (Production) उत्पादन वाढल्याने ही वेळ आली आहे. डाळींमध्ये हरभऱ्याचे मोठे योगदान आहे. 45 टक्के परिणाम हरभरा डाळीचा आहे. असे असतानाच हरभऱ्याच्या उत्पादनात वाढ झाली असून ही खूप मोठी महत्वाची बाब आहे. गतवर्षी हरभऱ्याचे उत्पादन हे 11.91 दशलक्ष टन होते तर यंदा 13.98 दशलक्ष टन होण्याचा अंदाज आहे. वाढत्या उत्पादनामुळे तब्बल 31 टक्के आयात घटली आहे. त्यामुळे दिवसेंदिवस आयात घटत असून 2021-22 मध्ये केवळ 2.02 लाख मेट्रीक टनाची आयात करावी लागली आहे. अशीच (Import) आयात घट झाली तर देशातील शेतकऱ्यांनाही अधिकचा दर मिळणार आहे. डाळ उत्पादनात स्वावलंबी होण्यासाठी सर्वकश प्रय़त्न केले जात आहेत. असे असले तरी दरवर्षी ही 8 ते 10 हजार कोटी रुपयांची डाळ ही आयात करण्याची नामुष्की ओढावत आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांनी अधिक प्रमाणात डाळीचे उत्पादन घेण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे.

अशी घटत गेली हरभऱ्याची आयात

देशातील डाळीची मागणी पुरवण्यासाठी सरकारला हरभऱ्याची आयात करावी लागते. असे असले तरी दिवसेंदिवस आयात घटत असून ही दिलासादायक बाब आहे. एप्रिल ते फेब्रुवारी या कालावधीत हरभरा आयातीमध्ये 60 टक्क्यांहून अधिकची घट झाली आहे. आता आयात ही 0.61 लाख मेट्रीक टनावर आली आहे. गेल्या वर्षी हा आकडा 1.53 लाख मेट्रीक टन एवढा होता. तर दुसरीकडे देशी हरभऱ्याची आयात ही 1.40 लाख मेट्रीक टन इतकी आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा हरभऱ्याची आयात ही घटली आहे.

कोणत्या डाळीची किती होतेय आयात?

हरभरा डाळीच्या उत्पादनामध्ये वाढ होत असली तरी इतर डाळींबाबत शंका उपस्थित होत आहे. इतर डाळींकरिता आय़ातीवर अवलंबून हे रहावेच लागत आहे. यामध्ये मूग, तूर आणि उडिद डाळीचा समावेश आहे. उलट या डाळींच्या आयातमध्ये वाढ होत आहे.2021-22 मध्ये या डाळींची आयात 27.72 लाख मेट्रीक टन होती. यामध्ये मूग आयातीमध्ये 139 टक्के, तूर आयातीमध्ये 90 टक्के तर उडिद आयातीमध्ये 90 टक्के वाढ झाली आहे.

हे सुद्धा वाचा

हरभऱ्याची आवक किती आहे.

हरभऱ्याच्या वाढीव उत्पादनाचा परिणाम आयातीवर झाला आहे. 1 मार्च ते 15 जूनपर्यंत बाजार समित्यांमधील आवक ही 15.70 लाख टन एवढी होती. तर गेल्या वर्षी याच दिवसांमध्ये 17.4 टक्क्यांनी वाढ झाली होती. यंदा मार्च महिन्यात हरभऱ्याची आवक ही 21 टक्के एवढी घटली होती तर आता एप्रिलपासून पुन्हा यामध्ये वाढ होण्याास सुरवात झाली आहे. रब्बी हंगामात हरभऱ्याचे विक्रमी उत्पादन घेतले गेले .

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.