नॉर्थ ईस्टमध्ये आभाळ फाटलं, भूस्खलनचा कहर… मोदींकडून आसाम, सिक्कीम आणि मणिपूरचा आढावा

नॉर्थ ईस्टमध्ये पावसाने मोठे तांडव केले आहे. या पावसाने अनेक नदी नाल्यांना मोठा पूर आला असून तीन राज्यातील अनेक भागाचा उर्वरित जगाशी संपर्क तुटला आहे.

नॉर्थ ईस्टमध्ये आभाळ फाटलं, भूस्खलनचा कहर... मोदींकडून आसाम, सिक्कीम आणि मणिपूरचा आढावा
| Updated on: Jun 03, 2025 | 7:02 PM

उत्तर पूर्वेत आभाळ फाटल्यागत पाऊस कोसळत असून त्यानंतर नदी नाल्यांना आलेला पुर आणि लँडस्लाईडच्या घटनांनी हाहाकार माजला आहे. या नैसर्गिक कोपानंतर अनेक नागरिकांना युद्धपातळीवर मदत पोहचवण्याचे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत. पीएम मोदी यांनी आसाम-सिक्कीम आणि मणिपूर, त्रिपुरा, मिझोरम येथील नागरिकांना आश्वस्त करीत मदत पोहचविण्याचे आदेश संबंधित यंत्रणांना दिले आहेत.आसाम-सिक्कीम आणि मणिपूर या तिन्ही राज्यातील जनतेला धीर धरण्यास सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: मदतकार्यावर लक्ष ठेवून आहेत.

गेले तीन ते चार दिवस अतिवृष्टीने आसामपासून ते सिक्किम, मणिपुर, त्रिपुरा, मिझोरम, नागालँड सह संपूर्ण पूर्वोत्तर या वेळी अस्मानी संकटात सापडला आहे. या संकटाच्या समयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधत परिस्थितीचा आढवा घेतला आहे. पंतप्रधानांनी सर्वतोपरी मदत कार्य आणि अन्नधान्य सामग्री पाठविण्याचे आदेश यंत्रणांना दिले आहेत.

नॉर्थ ईस्टमध्ये झालेल्या अतिवृष्टीची दखल उच्च पातळीवर घेतली आहे. पूर्वोत्तर राज्यांना शक्य तितकी मदत पोहचविण्यात येईल असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आश्वस्त केले आहे. पीएम मोदी यांनी आसाम आणि सिक्कीमचे मुख्यमंत्री अनुक्रमे हिमंत बिस्वा सरमा आणि प्रेम सिंह तंमाग, मणिपूरचे राज्यपाल अजय भल्ला यांच्याशी बातचीत करुन परिस्थितीचा आढावा घेतला आहे.

 मोदी यांनी घेतला पूरस्थितीचा आढावा

पंतप्रधानांनी या राज्यांना केंद्राकडून सर्वोतोपरी केंद्राला मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. हरप्रकारची मदती केली जाणार आहे. त्यांना केंद्राकडून शक्य तितकी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. पूर्वोत्तर पुराची स्थिति इतकी गंभीर बनली आहे की या लँडस्लाईडमुळे बळींची संख्या आता सोमवारपर्यंत ३६ इतकी झाली आहे. तर अनेक राज्यात 5.5 लाख लोक प्रभावित झाली आहे.

सीएम सरमा यांनी केली पोस्ट

असामचे मुख्यमंत्री ने फोन हिमंता बिस्वा सरमा यांनी दूरध्वनीवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बातचीत केली आहे. त्यांनी आसम आणि आजूबाजूच्या राज्यातील सातत्यपूर्ण अतिवृष्टीने आलेला पूर आणि त्यामुळे प्रभावित झालेल्या जनजीवनाबद्दल माहीती दिली आहे.

सीएम हिमंता बिस्वा सरमा यांनी सोशल मीडिया हँडल एक्सवर पोस्ट केली आहे. त्यात ते म्हणतात की,’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला आसामच्या पुर परिस्थितीबद्दल माहीती घेण्यासाठी फोन केला होता. मी त्यांना  आसम आणि आजूबाजूच्या राज्यातील अतिवृष्टीने आलेला पुर आणि त्यामुळे विस्कळीत झालेले जनजीवन याबद्दल सर्व माहीती दिली. राज्य सरकारमार्फत उचलेल्या पावलांची आणि मदत कार्याची माहीती देखील आपण त्यांना दिल्याचे ते म्हणाले. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चिंता व्यक्त करीत राज्यांना केंद्राकडून हवी ती मदत पुरविली जाईल असे आश्वस्त केले आहे. आसमच्या लोकांबद्दल त्यांनी केलेली मदत आणि मार्गदर्शन याबद्दल मी त्यांचा आभारी आहे’

सोमवारी तर परिस्थिती बिघडली

आसाम राज्यात पूर आणि भूस्खलनाने आतापर्यंत 11 लोक ठार झाले आहेत. 20 हून अधिक जिल्ह्यात 5.35 लाखाहून अधिक लोकसंख्या पुराने त्रस्त झाली आहे. आसामात पुरस्थिती सोमवारी आणखीच चिंताजनक बनली. भारतीय हवामान खात्याने येत्या दिवसात राज्यात आणखी पाऊस पडण्याची अंदाज वर्तवला आहे. या दरम्यान सीएम हिमंता बिस्वा सरमा यांनी एक्सवर पोस्ट करुन या पुरस्थितीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बातचीत झाल्याची माहीती दिली आहे.

नॉर्थ इंडियात काय परिस्थिती?

द न्यू इंडियन एक्सप्रेसच्या बातमीनुसार, सोमवारी आसामात आणखी एकाचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. त्यामुळे पूर्वोत्तर पुराने मृत्यूमुखी झालेल्यांची एकूण संख्या आता वाढून 38 झाली आहे. यात आसामात 11, अरुणाचल प्रदेशात 9, मेघालय आणि मिझोरममध्ये प्रत्येकी 6, 3 सिक्किममध्ये 3, 2 त्रिपुरा आणि नागालँड 1 असे मृत्यू झाले आहेत.