Hijab : कर्नाटक हायकोर्टाचा हिजाबवाल्यांना पहिला झटका, कोर्ट म्हणालं, निकाल येईपर्यंत ‘नो’ धार्मिक पोषक

| Updated on: Feb 10, 2022 | 7:22 PM

या प्रकरणाचा निकाल येईपर्यंत शिक्षण संस्थांमध्ये धार्मिक पोशाखावर कर्नाटक उच्च न्यायालयाकडून बंदी घालण्यात आली आहे. तसंच सर्व शिक्षण संस्था सुरु करा असे निर्देशही उच्च न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता सोमवारी दुपारी अडीच वाजता होणार आहे.

Hijab : कर्नाटक हायकोर्टाचा हिजाबवाल्यांना पहिला झटका, कोर्ट म्हणालं, निकाल येईपर्यंत नो धार्मिक पोषक
कर्नाटक उच्च न्यायालयाचा हिजाबबाबत महत्वाचा आदेश
Follow us on

बंगळुरू : शिक्षण संस्थांमध्ये हिजाबला (Hijab) परवानगी देण्याची मागणी करणाऱ्यांना कर्नाटक उच्च न्यायालयानं (Karnataka High Court) मोठा झटका दिलाय. या प्रकरणाचा निकाल येईपर्यंत शिक्षण संस्थांमध्ये धार्मिक पोशाखावर (Religious dress) कर्नाटक उच्च न्यायालयाकडून बंदी घालण्यात आली आहे. तसंच सर्व शिक्षण संस्था सुरु करा असे निर्देशही उच्च न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता सोमवारी दुपारी अडीच वाजता होणार आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाने चीफ जस्टीस ऋतुराज अवस्थी यांच्या अध्यक्षतेखाली जस्टिस कृष्ण एस दीक्षित आणि जस्टिस जेएम खाजी यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी पार पडली.

महत्वाची बाब म्हणजे सुनावणी वेळी कर्नाटक उच्च न्यायालयाचे चीफ जस्टिस यांनी माध्यमांनाही अपील केलं आहे की कोर्टाचे आदेश पाहिल्याशिवाय कुठल्याही चर्चेत न्यायालयाकडून करण्यात आलेल्या टिप्पणीवर भाष्य करु नका. तसंच सोशल मीडिया, वृत्तपत्र किंवा अन्य कुठेही पूर्ण आदेश आल्याशिवाय रिपोर्टिंग करु नका असंही उच्च न्यायालयाने म्हटलंय. यापूर्वी बुधवारी हायकोर्टात सुनावणी पार पडली होती. त्यावेळी या प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या जस्टिस कृष्ण दीक्षित यांनी हे प्रकरण वरच्या बेंचकडे पाठवण्याचा निर्णय घेतला होता.

हेमा मालिनी यांचं हिजाब प्रकरणी प्रतिक्रिया

हेमा मालिनी यांनी कर्नाटकात सुरू असलेल्या हिजाब प्रकरणावर प्रतिक्रिया आहे. “शाळा आणि महाविद्यालयं ही शिक्षणासाठी असतात. त्यामुळे धर्मिक गोष्टी शाळेत घेऊन जाणं योग्य नाही. प्रत्येक शाळेचा एक गणवेश असतो आणि त्याचा सन्मान सर्वांनी करायला हवा. शाळेच्या बाहेर तुम्हाला जे काही घालायचं आहे ते घालण्याचा तुम्हाला स्वातंत्र्य आहे. पण शाळेत तुम्ही गणवेशच घालायला हवा”, असं हेमा मालिनी म्हणाल्यात.

हिजाब प्रकरणाचे महाराष्ट्रात पडसाद

मालेगावात हिजाबसाठी हजारो मुस्लिम महिला एकवटल्याचे पहायला मिळाले. पोलिसांचा विरोध झुगारून कल्लू स्टेडियम वर हजारोच्या संख्येने महिलांची उपस्थिती दिसून आली. हे आंदोलन करताना या महिलांच्या हातातील फलकांनीही सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. कारण हे फलक उर्दूत होते. अहमदनगरला हिजाब प्रकरणी राष्ट्रवादीकडून निषेध करण्यात आलाय. तर दुसरीकडे नगरमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत हिजाबला विरोध करणाऱ्यांचा निषेध केला आहे.

हिजाब प्रकरणाचे पडसाद सोलापुरात उमटत आहेत. आज दुसऱ्या दिवशीही हिजाब बंदीविरोधात राजकीय पक्षानी आंदोलन केलंय. मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्यावतीने कामगार नेते नरसय्या आडम यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. हिजाबच्या नावे मुस्लिम विद्यार्थिनींवर अन्याय करणाऱ्या कर्नाटक सरकारचा जळजळीत निषेध करण्यात आला. पुण्यातही कर्नाटकमध्ये मुस्लिम समुदायाच्या मुलींना हिजाब वापरण्यास बंदी घालनाऱ्या कर्नाटक भाजप सरकारचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने निषेध आंदोलन केलं.

इतर बातम्या :

Hijab : खान सिस्टर्सचा जलवा, एका बुलेटवर Hijab घालून चौघीजणी करतायत flying kiss; हा Video पाहिलात का?

Hijab controversy: आमच्या घरचा ‘मामला’, पाय नका घालू, ओवेसींनी पाकिस्तानला झाप झाप झापले

हिजाब आणि बुरखा यांच्यात काय फरक आहे? मराठी मुली पण हिजाब घालतात? खरंच?