ज्याला हिजाब घालायचाय त्याने पाकिस्तानात… भाजप नेत्याचं धक्कादायक वक्तव्य

Hijab Controversy : हिजाबच्या नावाखाली फक्त... ज्याला हिजाब घालायचाय त्याने पाकिस्तानात जा..., भाजप नेत्यांने का केलं असं वक्तव्य? धक्कादायक आहे कारण...

ज्याला हिजाब घालायचाय त्याने पाकिस्तानात... भाजप नेत्याचं धक्कादायक वक्तव्य
Hijab Controversy
| Updated on: Dec 19, 2025 | 10:09 AM

Hijab Controversy : पाटण्यामध्ये नियुक्ती पत्र वाटप करताना एका महिला डॉक्टरचा हिजाब काढण्याचा प्रयत्न केल्याबद्दल विरोधी पक्ष बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर निशाणा साधत असताना, भाजपने मुख्यमंत्र्यांना पाठिंबा दिला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते हरिभूषण ठाकूर बचौल यांनी नितीश कुमार यांचं समर्थन करत हिजाब पूर्ण भारतात बॅन झाला पाहिजे… असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. सार्वजनिक ठिकाणी आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये हिजाबवर बंदी घालावी… अशी मागणी हरिभूषण यांनी केली आहे.

हरिभूषण म्हणाले, ‘हिजाबच्या नावाखाली फक्त दहशतवाद फोफावत आहे. दहशतवादी हल्ले करून दहशतवादी हिजाब घालून पळून जातात. ज्याला हिजाब घालायचा आहे, त्यांनी पाकिस्तानात जावं. मुख्यमंत्री नितीश कुमार माफी मागणार नाहीत, असं ते म्हणाले. महिला डॉक्टरचा हिजाब ओढून त्यांनी बरोबरच केलं आहे…

 

 

हिजाब घालून नियुक्तीपत्र घेण्यासाठी आलेल्या महिला डॉक्टरने बिहार सोडलं पाहिजे. ती चेहरा लपवून नियुक्तीपत्र घेण्यासाठी गेली होती… असं देखील हरिभूषण ठाकूर बचौल म्हणाले… भाजप नेत्याच्या वक्तव्यानंतर वातावरण तापलं आहे… आरजेडी नेते मुकेश कुमार रोशन यांनी बचौल यांच्यावर निशाणा साधला आणि म्हणाले, हिंदू आणि मुस्लिमांमध्ये वाद भडकवण्याचा प्रयत्न सुरु आहे… त्यांना तात्काळ अटक करा… असं देखील कुमार रोशन म्हणाले.

प्रकरणाबद्दल सांगायचं झालं तर, नितीश कुमार यांनी ज्या प्रकारे डॉक्टर महिलेचा हिजाब ओढला त्यावर विरोधी पक्ष राजकारण करत आहे. तर एनडीएमधील मित्रपक्ष भाजप पक्षाने नितीश कुमार यांचं समर्थन केलं. केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी म्हटलं की, मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी कोणतीही चूक केली नाही. हा इस्लामिक देश नाही. भारतात कायद्याचे राज्य चालेल. नितीश कुमार यांनी योग्यच केलं.. असं देखील गिरिराज सिंह म्हणाले.