Economy Fake Currency : येथे छापल्या जातात सर्वाधिक नकली नोटा! अर्थव्यवस्थेला उत्पन्न होतो मोठा धोका

Economy Fake Currency : देशातील बाजारपेठेत नकली नोटा चलनात आहे. देशात सहा वर्षांपूर्वी नकली नोटांवर नोटाबंदीची सर्जिकल स्ट्राईक करण्यात आली. पण तुम्हाला माहिती आहे का, सर्वाधिक नकली भारतीय नोटा कुठे छापण्यात येतात ते? त्याचा भारतीय अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतो?

Economy Fake Currency : येथे छापल्या जातात सर्वाधिक नकली नोटा! अर्थव्यवस्थेला उत्पन्न होतो मोठा धोका
Follow us
| Updated on: Mar 11, 2023 | 6:38 PM

नवी दिल्ली : देशातील बाजारपेठेत अजूनही नकली नोटा (Fake Currency) सापडतात. अनेक जण नकली नोटा छापून त्या हळूच बाजारात आणतात. पण या नोटा बँकेत पोहचल्या की, त्याची पोलखोल होते. काही सूज्ञ नागरीक त्यांना ओळखतात. नकील नोटा ओळखण्यास कठिण नसतात. पण नोटांच्या बंडलामध्ये या नोटा दडवून त्यांचा वापर करण्यात येतो. केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) परवानगीशिवाय नोटा कोणालाच छापता येत नाही. खासगी व्यक्ती, संस्थेला नोटा छापता येत नाही. असे कृत्य करणे गुन्हा आहे. नकली नोटा छापण्यावर बंदी आहे. देशात सहा वर्षांपूर्वी नकली नोटांवर नोटाबंदीची (Demonetization) सर्जिकल स्ट्राईक करण्यात आली. पण तुम्हाला माहिती आहे का, सर्वाधिक नकली भारतीय नोटा कुठे छापण्यात येतात ते? त्याचा भारतीय अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतो?

भारतीय नोटांना FICN, फेक इंडियन करन्सी नोट असे म्हणतात. आता तुम्हाला वाटत असेल की, या नोटा तर भारतातील कानाकोपऱ्यात कुठे तरी तयार होत असतील. अनेक शहरात, गावात, प्रिटिंग प्रेसमध्ये यापूर्वीही फेक नोटा छापण्याचे प्रकार उघड झाले आहेत. त्यामुळे तुम्ही म्हणाल दूरवर कुठेतरी या नोटा छापण्याचे कारखाने असतील. किंवा सीमारेषेवर असे काही कृत्य करण्यात येत असेल. पण थांबा, तुमचा हा अंदाज केवळ वरवरचा आहे.

तर भारतात फेक नोटांचा पुरवठा पाकिस्तानमधून करण्यात येतो. पाकिस्तानमध्ये सर्वाधिक भारतीय नकली नोटा छापण्यात येतात. भारतात या नोटा पाकिस्तानमधून थेट पोहचत नाही. तर या नकली नोटा शेजारील राष्ट्रातून भारतात पाठविण्यात येतात. बांग्लादेश आणि नेपाळमधून या बोगस नोटा भारतात पाठविण्यात येतात. या नकली नोटांचा फायदा दहशतवादी कार्यवायांसाठी करण्यात येतो. तसेच त्यातून अर्थव्यवस्थेला धोका निर्माण होतो.

हे सुद्धा वाचा

आरबीआय, बाजारात चलनाचा प्रवाह संतुलीत ठेवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करते. त्यासाठी एका निश्चित काळात नोटांची छपाई करण्यात येते. गरजेपेक्षा अधिक नोटा छापल्या तर लोकांच्या हातात अधिकचा पैसा खुळखुळतो. त्यामुळे वस्तूंची मागणी वाढते. उत्पादनावर परिणाम होतो. बाजारातून सामान गायब होतात. कारखान्यांवर त्याच्या उत्पन्नाचा ताण वाढतो. मागणी वाढल्याने वस्तूंच्या, सेवांच्या किंमती वाढतात. तर काहीवेळा पैशाचे अवमूल्यन होते. अर्थव्यवस्थेला मोठा धोका निर्माण होतो. अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होतो. त्याचा फायदा दहशतवादी संघटना घेतात. बेरोजगार तरुणांना जाळ्यात ओढतात. बोगस नोटा चलनात आणून अर्थव्यवस्था खिळखिळी करण्याचा प्रयत्न करण्यात येतो.

2016 मध्ये यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नोटबंदी करण्यात आली होती. भारताने NIA ची स्थापना केली. तसेच दहशतवाद्यांना वित्त पुरवठा आणि चलन शाखाही सुरु केली. पत्रसूचना कार्यालयानुसार, देशातील प्रत्येक राज्यातील पोलिसांना या बोगस नोटांचे जाळे ओळखण्यासाठी आणि त्यावर कारवाई करण्यासाठी संयुक्तरित्या प्रशिक्षण देण्यात येते. या एजन्सी एकमेकांसोबत सहकार्य करतात आणि कारवाई करुन त्यांचा डाव उधळून लावतात. भारताने बांग्लादेश आणि नेपाळसोबत या नकली नोटांना आळा घालण्यासाठी करारही केला आहे.

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.