
पंतप्रधानांचा पर्सनल सेक्रेटरी या पदाविषयी सर्वांना औत्सुक्य असते.परंतू ही सर्वसाधारण नोकरी नाही. देशातील सर्वात मोठ्या कार्यालय म्हणजे पंतप्रधान कार्यालयात (PMO) पर्सनल सेक्रेटरी याचा जॉब असतो. सध्या 2014 बॅचचे IFS अधिकारी निधी तिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पर्सनल सेक्रेटरी आहेत. पर्सनल सेक्रेटरी पद कसे भरले जाते ? ते काय काय काम करतात आणि त्यांना किती पगार मिळतो हे पाहूयात…
पंतप्रधानांचा पर्सनल सेक्रेटरी पंतप्रधानांचे दैनंदिन कामकाज सुरळीत चालविण्यास मदत करतो.ही व्यक्ती पीएमचे शेड्युल, मिटींग्स, दौरे, फाईल्स, सरकारी विभागातून येणारी माहिती आणि मोठ्या निर्णयांची तयारी आणि संपूर्ण समन्वयाचे काम करत असतो. हे काम क्लार्क किंवा सहायकाचे नसते तर टॉप लेव्हलचे एडमिनिस्ट्रीव्ह जबाबदारी आहे.
1. पंतप्रधानांचे प्रत्येक मिनिटांचे शेड्युल, प्रत्येक फाईल, प्रत्येक मिटींगला सांभाळणे
2. कोण भेटणार आहे , केव्हा बैठक आहे , कोणत्या विषयावर बोलणी होणार, सर्व काही हे निश्चित करतात.
3.प्रत्येक मंत्रालयातून येणारा अहवाल आणि डॉक्युमेंट पीएमपर्यंत पोहचवण्याची जबाबदारी
4. देश-विदेशाची बैठका आणि दौऱ्यांचा प्लान तयार करणे
5. पीएमपर्यंत योग्य माहिती पोहचवणे आणि त्यांच्या निर्णयांना पुढे नेणे या पदाची मोठी जबाबदारी आहे.
6. गोपनीय प्रकरणे सुरक्षित ठेवणे
7. आपत्ती, राष्ट्रीय संकट वा आपात्कालीन परिस्थितीत योग्य भूमिका निभावणे
ही जबाबदारी त्याच ऑफीसरना दिली जाते ज्यांच्याकडे प्रदीर्घ प्रशासकीय अनुभव, सरकारच्या कामकाजाची चांगली समज आणि हाय लेव्हलची जबाबदारी पार पाडण्याची क्षमता असायला हवी. या पदासाठी सर्वसाधारण पणे IAS, IFS वा IRS सारख्या प्रशासकीय सेवेतील अधिकारी निवडले जातात. ज्यांच्याकडे 15-20 वर्षांचा अनुभव असेल ज्यांना मोठे प्रशासकीय निर्णय, धोरणे आणि सरकारी सिस्टीमध्ये मोठी भूमिका निभावली असेल, जे गुप्त आणि संवेदनशील प्रकरणे संपूर्ण सर्तकपणे सांभाळू शकतील. म्हणजे सर्वात विश्वासार्ह आणि टॉप क्लासचे अधिकाऱ्यांना हे पद मिळते.
या पदावर सर्वसाधारणपणे वरिष्ठ IAS-IFS अधिकारी असतात. त्यासाठी त्यांचे वेतनही त्यांच्या रँक नुसार असते. त्यांची सरासरी सॅलरी 1.5 लाख ते 2.5 लाख महिना असते. याशिवाय त्यांना सरकारी घर, कार, सिक्युरिटी, मेडिकल सुविधा आणि अधिकृत परदेश प्रवासाचे फायदे आणि विशेष फायदे मिळतात.