
ट्रेनने प्रवास करताना जनरल तिकीट घेणं आता सोपं झालंय, कारण तुम्ही UTS एपवरून ऑनलाइन तिकीट बुक करू शकता. पण तुम्हाला माहीत आहे का, हे तिकीट किती वेळात अवैध होतं? जर तुम्ही वेळेत प्रवास केला नाही, तर काय होऊ शकतं? चला, या सगळ्याची सविस्तर माहिती घेऊया आणि जाणून घेऊया ऑनलाईन जनरल तिकीट बुक करताना कोणती काळजी घ्यावी!
UTS अॅपवरून तिकीट बुक केल्यावर ते बुकिंगच्या वेळेपासून केवळ 3 तासांपर्यंत वैध असतं. या कालावधीतच प्रवास सुरू करणं अनिवार्य आहे. जर या तीन तासांच्या आत प्रवास सुरू केला नाही, तर तिकीट कालबाह्य ठरतं आणि प्रवासी बिनतिकीट समजला जातो.
रेल्वेच्या नियमानुसार, जर एखादा प्रवासी वैध तिकीट नसताना पकडला गेला, तर त्याच्याकडून 250 रुपयांचा दंड वसूल केला जातो, तसेच सुरुवातीच्या स्थानकापासून गंतव्य स्थानकापर्यंतचं भाडंही आकारलं जातं. त्यामुळे UTS अॅपवरून तिकीट बुक करताना वेळेचं भान ठेवणं अत्यंत आवश्यक आहे.
1. तुमच्या स्मार्टफोनवर Google Play Store किंवा App Store वरून UTS एप डाउनलोड करा.
2. अॅपवर नोंदणी करा. यासाठी तुमचा मोबाइल नंबर, नाव आणि पासवर्ड टाकावा लागेल.
3. लॉगिन केल्यानंतर “Normal Booking” किंवा “Platform Ticket” पर्याय निवडा.
4. तुमचं प्रारंभिक स्थानक आणि गंतव्य स्थानक टाका.
5. प्रवाशांची संख्या आणि ट्रेनचा प्रकार ( एक्सप्रेस, पॅसेंजर किंवा मेल) निवडा.
6. UTS वॉलेट, डेबिट/क्रेडिट कार्ड, UPI ( Google Pay, PhonePe, Paytm) किंवा नेट बँकिंगद्वारे पेमेंट करा.
7. तिकीट बुक झाल्यानंतर तुम्हाला SMS आणि एपवर तिकीट मिळेल. “Show Ticket” पर्यायावरून तुम्ही तिकीट पाहू शकता.
1. रेल्वे स्थानकावर लांब रांगा लावण्याची गरज नाही.
2. घरबसल्या किंवा प्रवासादरम्यान तिकीट बुक करा.
3. तिकीट एपवरच उपलब्ध असतं, त्यामुळे प्रिंट काढण्याची गरज नाही.
4. जनरल तिकीट, प्लॅटफॉर्म तिकीट आणि मासिक पास एकाच एपवर बुक करता येतात.