Pahalgam Terror Attack : पहलगामला दरवर्षी किती पर्यटक देतात भेट ? लाखोंच्या पोटावर पाय, हजारो कोटींच्या व्यवसायावर संकट ?

दरवर्षी कोट्यवधी पर्यटक फिरण्यासाठी श्रीनगरला भेट देतात. श्रीनगर आणि काश्मीर या पर्यटकांद्वारे पैसे कमवतात कारण पर्यटन हे त्यांच्या उत्पन्नाचे साधन आहे. काश्मीरमध्ये हॉटेल्स, हाऊस बोट्स, टॅक्सी सेवा, गाईड, हस्तकला यासारखे पर्यटनाशी संबंधित उपक्रम हे सुमारे अडीच लाख लोकांच्या उपजीविकेचे साधन आहेत.

Pahalgam Terror Attack : पहलगामला दरवर्षी किती पर्यटक देतात भेट ? लाखोंच्या पोटावर पाय, हजारो कोटींच्या व्यवसायावर संकट ?
पहलगामला दरवर्षी किती पर्यटक देतात भेट ?
Image Credit source: TV9 bharatvasrh
| Updated on: Apr 23, 2025 | 2:39 PM

पृथ्वीवरचा स्वर्ग अशी ओळख असलेली काश्मीरची भूमी पुन्हा एकदा रक्ताने माखली आहे. पहलगाममधील पर्यटकांवर झालेला क्रूर दहशतवादी हल्ला हा केवळ निष्पाप पर्यटकांवर हल्ला नाही तर काश्मीरच्या सांस्कृतिक वारशावर, त्याच्या आत्म्यावर आणि लाखो काश्मिरींच्या उपजीविकेवर थेट हल्ला आहे. दरवर्षी कोट्यवधी पर्यटक फिरण्यासाठी श्रीनगरला भेट देतात. श्रीनगर आणि काश्मीर या पर्यटकांद्वारे पैसे कमवतात कारण पर्यटन हे त्यांच्या उत्पन्नाचे साधन आहे. दरवर्षी एकूण किती पर्यटक श्रीनगरला भेट देतात आणि तिथल्या अर्थव्यवस्थेत त्यांचा किती वाटा आहे ते जाणून घेऊया.

काश्मीरच्या अर्थव्यवस्थेवर थेट परिणाम

नंदनवन अशी ओळख असणाऱ्या काश्मीरमध्ये सुमारे 12,000 कोटी रुपयांचा पर्यटन उद्योग आहे, जो राज्याच्या जीडीपीमध्ये 7 ते 8 टक्के वाटा देतो. 2030 सालापर्यंत तो 25,000 ते 30, 000 कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा होती. पण या हल्ल्यामुळे त्या विकास प्रवासाला एक मोठा ब्रेक लागला आहे.

2.5 लाख लोकांचा रोजगार धोक्यात

काश्मीरमध्ये हॉटेल्स, हाऊस बोट्स, टॅक्सी सेवा, गाईड, हस्तकला यासारखे पर्यटनाशी संबंधित उपक्रम हे सुमारे अडीच लाख लोकांच्या उपजीविकेचे साधन आहेत. दल सरोवरात चालणाऱ्या 1,500 हून अधिक हाऊसबोट्स, 3,000 हून अधिक हॉटेल रूम आणि कॅब सेवा आता निर्जन होऊ शकतात. कालच्या हल्ल्यानंतर बुकिंग कॅन्सलेशनमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. फ्लाईट तिकीट्स ते हॉटेलस, टॅक्सी बुकिंग सगळंच रद्द होतंय.

गुलमर्ग ते दल सरोवर, सगळीकडे भयाण शांतता

गुलमर्ग, सोनमर्ग, पहलगाम आणि दल सरोवर यासारख्या पर्यटन स्थळांना दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात. 2024 साली 2.36 कोटी पर्यटकांनी काश्मीरला भेट दिली, त्यापैकी 65,000 हून अधिक परदेशी होते. एकट्या गुलमर्गने 103 कोटी रुपयांचा महसूल दिला. पण आता ही सर्व पर्यटन केंद्र अनिश्चिततेच्या सावटाखाली आहेत.

काश्मीर हे केवळ पर्यटकांचे आवडते ठिकाण नाही तर बॉलिवूड आणि ओटीटी निर्मात्यांचे आवडते शूटिंग डेस्टिनेशन देखील आहे. याशिवाय, डेस्टिनेशन वेडिंगच्या वाढत्या मागणीमुळे पर्यटनालाही चालना मिळाली. पण आता हल्ल्यामुळे चित्रपट युनिट्स आणि लग्नाचे नियोजन करणारे मागे हटू लागले आहेत.

विकासाला ब्रेक ?

केंद्र सरकारने काश्मीरच्या विकासासाठी 1000 कोटी रुपयांची योजना आखली होती. हवाई संपर्क सुधारला जात होता, वंदे भारत ट्रेन सुरू होणार होती आणि परदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी ऑन-अरायव्हल व्हिसासारख्या योजना सुरू केल्या जात होत्या. 75 नवी टूरिस्ट डेस्टिनेशन्स, हेरिटेज आणि धार्मिक स्थळांचाही विकास केला जात होता. पण एका दहशतवादी हल्ल्याने आता हे सर्व प्रयत्न फोल ठरवले आहेत.