Alcohol Storage Limit : सरकारी नियमानुसार तुम्ही घरात दारूचा किती साठा ठेवू शकता? 99 टक्के लोकांना माहीत नाही उत्तर

घरात दारूचा साठा किती असावा याचे काही सरकारी नियम आहेत, या नियमांचं उल्लंघन झाल्यास तुम्हाला तुरुंगात देखील जावं लागतं, तसेच मोठी कारवाई होऊश शकते. आज आपण दारू साठ्याची मर्यादा जाणून घेणार आहोत.

Alcohol Storage Limit : सरकारी नियमानुसार तुम्ही घरात दारूचा किती साठा ठेवू शकता? 99 टक्के लोकांना माहीत नाही उत्तर
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 20, 2025 | 4:51 PM

भारतामध्ये मोठ्या प्रमाणात दारूचं सेवन केलं जातं, देशात मद्यप्रेमींची संख्या देखील मोठी आहे, मद्यप्रेमींसाठी महत्त्वाची बातमी आहे, ती म्हणजे तुम्ही तुमच्या घरात एकावेळी जास्तीत जास्त किती लिटरपर्यंत दारूचा साठा करून ठेवू शकता? सरकारी नियम काय सांगतो? याबाबत आज आपण माहिती घेणार आहोत.

भातरामध्ये प्रत्येक राज्यात दारू संबंधीचे नियम आणि कायदे वेगवेगळे आहेत. दारू आणि दारूपासून मिळणारा महसूल हा भारतीय संविधानाच्या सातव्या अनुसूची अंतर्गत राज्याच्या अखत्यारीतला विषय आहे, त्यामुळे प्रत्येक राज्यानं दारू संबंधीचे आपले नियम बनवले आहेत. बिहार, गुजरात, नागालँड आणि मिझोरम सारख्या काही राज्यांमध्ये संपूर्णपणे दारू बंदी आहे, त्यामुळे अशा राज्यांमध्ये घरात दारूचा साठा करण्याचा प्रश्नच येत नाही. तर मणिपूर राज्यात देखील काही जिल्ह्यांमध्ये पूर्णपणे दारू बंदी करण्यात आली आहे.

एक व्यक्ती आपल्या घरात दारूचा किती साठा करू ठेवू शकतो, याची मर्यादा त्या-त्या राज्यातील सरकार ठरवतं. जर तुम्हाला ही मर्यादा माहिती नसेल आणि त्यापेक्षा जर जास्त साठा तुमच्या घरात आढळून आला तर तुमच्यावर मोठी कारवाई होते, तुम्हाला थेट तुरुंगातही जावं लागेल. ज्याप्रमाणे घरात किती दारू ठेवायची याचं जसं लिमिट आहे, तसेच दारू पिण्यासाठीचं वय देखील प्रत्येक राज्यात वेगवेगळं आहे, चला तर मग जाणून घेऊयात.

 काय आहे मर्यादा?

दिल्लीमध्ये ही मर्यादा आठरा लिटरपर्यंत आहे. याचाच अर्थ दिल्लीमध्ये कोणताही व्यक्ती कोणत्याही एका ब्रँन्डची किंवा वेगवेगळ्या ब्रँन्डची 18 लिटर दारू एकाचवेळी आपल्या घरात ठेवू शकतो. ही मर्यादा प्रती व्यक्तीमागे आहे. त्यापेक्षा जास्त दारू आढळल्यास त्या व्यक्तीला जेल देखील होऊ शकतं. तर उत्तर प्रदेशमध्ये तुम्ही एकावेळी दीड लिटरपर्यंत दारू घरात ठेवू शकता. राजस्थानमध्ये ही मर्यादा 12 बॉटल एवढी आहे, म्हणजेच राजस्थानमध्ये तुम्ही आयएमएफएल प्रकारातील 9 लिटर दारू स्टोर करू शकता. पंजाबमध्ये तुम्ही दारूच्या प्रत्येक प्रकारातील दोन बाटल्या एकाचवेळी घरात ठेवू शकता. तर हरियाणामध्ये एकाचवेळी दारूच्या 12 बाटल्या ठेवण्याची परवानगी आहे.