भारताचे 10 हजार रुपये नॉर्वेमध्ये किती होतात? किंमत ऐकून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल

नॉर्वेचा समावेश हा जगातील महागड्या देशांमध्ये होतो. नॉर्वेच्या लोकांची लाइफस्टाइल ही भारताच्या तुलनेत खूप महागडी आणि हाय -फाय आहे. नॉर्वेमधील सरकार टॅक्सची देखील मोठ्या प्रमाणात वसुली करते.

भारताचे 10 हजार रुपये नॉर्वेमध्ये किती होतात? किंमत ऐकून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल
भारताचे 10 हजार नॉर्वेमध्ये किती होतात?
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 18, 2026 | 8:46 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 18 आणि 19 मे रोजी नॉर्वेच्या दौऱ्यावर आहेत . नरेंद्र मोदी आपल्या या दौऱ्यामध्ये नार्डिक -इंडिया समिटमध्ये देखील सहभागी होणार आहेत. याचसोबत भारत आणि नॉर्वोमध्ये अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होण्याची देखील शक्यता आहे. पंतप्रधान मोदी हे नॉर्वेच्या दौऱ्यावर आहेत. त्यामुळे अनेकांना आता असा प्रश्न देखील पडला आहे, की समजा सामान्य भारतीय माणूस जर नॉर्वेला गेला तर त्याला तिथे राहण्यासाठी, खाण्यासाठी किती खर्च येऊ शकतो, तसेच भारताचे दहा हजार रुपये नॉर्वेमध्ये किती होतात? आपण दहा हजार रुपयांमध्ये नॉर्वेमध्ये काय -काय खरेदी करू शकतो? नॉर्वेमध्ये नॉर्वेजियन क्रोन नावाचं चलन वापरलं जातं. भारताचा एक रुपया 0.097 ते 0.10 नॉर्वेजियन क्रोनच्या बरोबर मानला जातो. याचाच अर्थ असा आहे की, नॉर्वेमध्ये भारताचे 10 हजार रुपये जवळपास 950 ते 1050 NOK नॉर्वेजियन क्रोन इतके होतात.

प्रचंड महागाई

नॉर्वेचा समावेश हा जगातील महागड्या देशांमध्ये होतो. नॉर्वेच्या लोकांची लाइफस्टाइल ही खूप महागडी आणि हाय -फाय आहे. नॉर्वेमधील सरकार टॅक्सची देखील मोठ्या प्रमाणात वसुली करते. रिपोर्टनुसार या देशात महागाई वाढण्याचं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे नॉर्वेमध्ये शेती ही खूपच कमी आहे. त्यामुळे येथील सरकार अन्न-धान्य तसेच बऱ्याच गोष्टींसाठी इतर देशांवर अवलंबून आहे. नॉर्वे आपल्या गरजेच्या अनेक गोष्टी हे दुसऱ्या देशांमधून आयात करतो, त्यामुळे या देशात महागाई मोठ्या प्रमाणात आहे.

भारतामध्ये दहा हजार भारतीय रुपये हे आपल्याला खूप जास्त वाटतात. परंतु नॉर्वेमध्ये तुम्ही एवढ्या पैशांमध्ये केवळ फक्त दोन ते तीन वेळाच बाहेर एखाद्या हॉटेलमध्ये जेऊ शकतात. तसेच एवढ्या पैशांमध्ये तुम्ही केवळ नॉर्वेतील एखाद्या साधारण हॉटेलमध्ये किंवा होम स्टेमध्ये 2 ते 3 दिवसच मुक्काम करू शकतात. तुम्ही जर नॉर्वेमधील एखाद्या चांगल्या रेस्टॉरंटमध्ये जेवणासाठी गेलात तर तुम्हाला एकावेळी 200 ते 400 NOK एवढा खर्च येऊ शकतो. नॉर्वे हा प्रचंड महागडा देश असल्यामुळे हा तसा खिशाला परवडणारा देश नाहीये.

 

Follow Us