अमेरिकेत टेलरला किती पगार मिळतो? आकडा ऐकून म्हणाल आता सगळं सोडतो अन् आधी टेलरिंगचं काम शिकतो

अमेरिकेमध्ये एका टेलरला जास्तीत जास्त किती पगार असू शकतो? याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? अमेरिकेमधील एक साधा टेलर एवढे पैसे कमावतो की तो आकडा ऐकून तुम्हाला धक्का बसेल.

अमेरिकेत टेलरला किती पगार मिळतो? आकडा ऐकून म्हणाल आता सगळं सोडतो अन् आधी टेलरिंगचं काम शिकतो
प्रातिनिधिक छायाचित्र
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 29, 2026 | 8:23 PM

तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का? अमेरिकेमध्ये टेलरला किती पगार असू शकतो? तुम्ही सामान्यपणे जेवढा विचार करत आहात, त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने एक टेलर काम करणारा व्यक्ती अमेरिकेत पैसे कमावतो. जर टेलर हे डेली बेसेसवर काम करत असतील तर त्यांना प्रति तास 18 ते 25 डॉलर एवढे पैसे मिळतात. म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये त्याचा हिशोब लावायचा झाल्यास त्यांना तिथे प्रति तास 1700 ते 2200 रुपये एवढे पैसे मिळतात. त्यांच्या सरासरी वार्षिक पॅकेजचा विचार केल्यास त्यांची दर वर्षी सरासरी 40 ते 48 हजार डॉलर एवढी कमाई होते. म्हणजेच आपल्या भारतीय रुपयांमध्ये त्याचा हिशोब केल्यास ते 40 ते 45 लाख रुपये होतात. याचाच अर्थ अमेरिकेतल्या साध्या टेलरचं पॅकेज हे 40 ते 45 लाखांचं असतं.

समजा जर एखादा नव्याने टेलरिंगचं काम शिकणारा व्यक्ती असेल किंवा फ्रेशर असेल तर त्याला प्रति तास 14 ते 18 डॉलर एवढे पैसे मिळतात. भारतीय रुपयांमध्ये त्याची किंमत प्रति तास तेराशे ते सतराशे रुपये एवढी होते, आणि समजा तुम्ही मास्टर टेलर असाल, म्हणजे तुम्हाला जर सर्व प्रकारचं काम उत्तम प्रकारे जमत असेल, तर मग तुमच्यासाठी ही एक फार मोठी संधी असू शकते, कारण अमेरिकेत मास्टर टेलरला प्रचंड मागणी आहे, मास्टर टेलरचं दर वर्षाचं सरासरी पॅकेज हे 68 हजार डॉलरपर्यं असतं. भारतीय रुपयांमध्ये सांगायचं झाल्यास एका मास्टर टेलरला अमेरिकेमध्ये दर वर्षी 65 लाख रुपयांपर्यंत पगार मिळतो.

एवढंच नाही तर तुम्ही कोणत्या शहरात काम करतात? त्यावर देखील तुमची कमाई अवलंबून असते. तुम्ही अमेरिकेच्या एखाद्या साध्या शहरात जरी काम केलं तर तुम्ही तिथे दरवर्षी कमीत कमी 40 ते 45 लाख रुपये कमावू शकतात. आणि तुम्ही जर अमेरिकेमधील न्यूयॉर्क किंवा कॅलिफोर्निया सारख्या मोठ्या शहरात काम करत असाल तर तुमची कमाई दुप्पट देखील वाढू शकते, म्हणजे तिथे तुम्ही वर्षाला 80 ते 90 लाख रुपयांपर्यंत पैसे कमावू शकतात.

Follow Us