
तुम्ही भारताबाहेर प्रवासासाठी किंवा इतर कोणत्याही कारणासाठी दुसऱ्या देशात गेलात तर तुम्हाला पासपोर्टची गरज असते. आज तुम्ही घरबसल्या सोप्या स्टेप्समध्ये पासपोर्टसाठी ऑनलाइन अर्ज करू शकता. आपल्याला फक्त मोबाइल फोन किंवा संगणक आणि इंटरनेट सेवा आवश्यक आहे. याशिवाय पासपोर्ट ऑफिसमध्ये जाऊन ऑफलाइन पासपोर्टसाठीही अर्ज करू शकता. वेळ न दवडता पूर्ण स्टेप्स जाणून घेऊया.
पासपोर्टसाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा?
स्टेप 1- सर्वप्रथम तुम्हाला पासपोर्ट सेवेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
स्टेप 2- जर तुम्ही पहिल्यांदाच ही वेबसाईट वापरत असाल तर आधी रजिस्ट्रेशन करा.
स्टेप 3- रजिस्ट्रेशन केल्यानंतर मिळालेल्या क्रेडेन्शियल्ससह लॉगिन करा.
स्टेप 4- लॉगिन केल्यानंतर तुम्हाला अप्लाई फॉर फ्रेश पासपोर्टया पर्यायावर क्लिक करावं लागेल.
स्टेप 5: विनंती केलेली माहिती प्रविष्ट करा आणि सबमिट बटणावर क्लिक करा.
स्टेप 6- आता तुम्हाला पुन्हा होम पेजवर जावे लागेल. येथे तुम्हाला व्ह्यू सेव्ह्ड या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
स्टेप 7- शेवटी, पे अँड शेड्यूल अपॉइंटमेंट पर्याय निवडा.
स्टेप 8- ज्यानंतर तुम्हाला अपॉइंटमेंट मिळेल. पुराव्यासाठी अर्जाची पावती डाऊनलोड करा.
तुमची व्हेरिफिकेशन पूर्ण होताच नवीन पासपोर्ट तुमच्या घरी पोहोचेल.
ऑनलाइन अर्ज केल्यानंतरही पासपोर्ट सेवा केंद्रात जावे लागणार आहे. येथे आपण दिलेल्या माहितीची पडताळणी केली जाईल. येथे पडताळणीसाठी आधार कार्ड, पॅन कार्ड आदी काही कागदपत्रे सोबत ठेवावी लागतील. तुमची व्हेरिफिकेशन पूर्ण होताच नवीन पासपोर्ट तुमच्या घरी पोहोचेल. पासपोर्ट सेवा केंद्रात तुम्ही दिलेल्या पत्त्यावर तो येईल. अशा प्रकारे पासपोर्टशी संबंधित आधीची प्रक्रिया तुम्ही घरबसल्या करू शकता.
हेन्ली इंडेक्समध्ये भारताचा पासपोर्ट यंदा 85 व्या स्थानावर आहे, जो गेल्या वर्षीच्या 80 व्या स्थानावरून पाच स्थानांनी खाली आला आहे. भारतीय पासपोर्टधारक 58 देशांमध्ये व्हिसामुक्त किंवा व्हिसा ऑन अरायव्हल प्रवास करू शकतात. मात्र, जागतिक स्तरावर भारताच्या क्रमवारीत घसरण झाल्याने चर्चेला उधाण आले आहे. तज्ज्ञांचे मत आहे की, भारताने आपली सामरिक भागीदारी अधिक मजबूत करण्याची आवश्यकता आहे जेणेकरून भारतीय नागरिकांना प्रवासाच्या अधिक सुविधा उपलब्ध होतील.