Inflation : सर्वसामान्यांचे हाल होणार, ऑगस्ट महिन्यापासून महागाई भडकणार, या चार क्षेत्रातील वस्तूंच्या किंमती दणादण वाढणार

Inflation : पश्चिम आशियात सुरु असलेल्या संघर्षामुळे कच्चा मालाच्या किंमतीत सतत चढ-उतार सुरु आहेत. वाहतूक खर्च वाढला आहे. त्याशिवाय चलनात सुद्धा घसरण होत आहे. त्यामुळे ग्राहकपयोगी वस्तू बनवणाऱ्या कंपन्या ऑगस्ट महिन्यापासून किंमती वाढवू शकतात.

Inflation : सर्वसामान्यांचे हाल होणार, ऑगस्ट महिन्यापासून महागाई भडकणार, या चार क्षेत्रातील वस्तूंच्या किंमती दणादण वाढणार
Inflation
| Updated on: Jul 28, 2026 | 10:02 AM

पश्चिम आशियात सुरु असलेल्या संघर्षामुळे कच्चा मालाच्या किंमतीत सतत चढ-उतार सुरु आहेत. वाहतूक खर्च वाढला आहे. त्याशिवाय चलनात सुद्धा घसरण होत आहे. त्यामुळे ग्राहकपयोगी वस्तू बनवणाऱ्या कंपन्या ऑगस्ट महिन्यापासून किंमती वाढवू शकतात. ऑगस्ट महिन्यापासून चहा, हेअर ऑइल, रेफ्रिजरेटर, टेलीविजन, कपडे आणि पॅसेंजर गाड्या सारख्या अनेक उत्पादनांच्या किंमतीत 6 ते 8 टक्के वाढ होऊ शकते. फेस्टिव सीजन सुरु होण्याआधी किंमतींमध्ये वाढ करण्याची ही शेवटची वेळ ठरेल अशी कंपन्यांची अपेक्षा आहे. यामुळे डिमांडवर जास्त परिणाम होणार नाही. ऑगस्ट महिन्यात केरळमध्ये ओनमचा सण आहे. तेव्हापासून फेस्टिव सीजनची सुरुवात होईल. सणांचा काळ हा पुढे गणपती, नवरात्री आणि दिवाळीपर्यंत कायम राहिलं. म्हणजे नोव्हेंबरपर्यंत फेस्टिव सीजन आहे.

हायर इंडियाचे चीफ एग्जीक्यूटिव सतीश एनएस म्हणाले की, “पश्चिम आशियात संकट कमी झाल्यानंतर परिस्थिती स्थिर होईल अशी मला अपेक्षा होती. पण पुन्हा निर्माण झालेल्या तणावामुळे किंमती वाढवाव्या लागतील. कारण एक्सचेंज रेटमध्ये चढ-उतार कायम आहे. कमोडिटी व क्रूड डेरिवेटिवच्या किंमती जास्त आहे. इंडस्ट्रीने अजूनपर्यंत वाढलेल्या किंमतींचा भार ग्राहकांवर टाकलेला नाही, ते काम आता होईल” भारतात केल्विन क्लाइन आणि टॉमी हिलफिगर विकणारी कंपनी अरविंद फॅशन्सने सुद्धा किंमती बदलण्याचे संकेत दिले आहेत. कंपनी पश्चिम आशियात सुरु असलेल्या संघर्षा दरम्यान नफा टिकवून ठेवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे असं चीफ एग्जीक्यूटिव अमीषा जैन यांनी मागच्या आठवड्यात एनालिस्ट्सना सांगितलं. यात कॉस्टवर कंट्रोल आणि किंमतींमध्ये सभाव्य बदल यांचा समावेश आहे.

स्मार्टफोनच्या किंमती सुद्धा वाढत आहेत

कपड्याच्या ब्रांड्सनी आतापर्यंत कमी किंमतीला विकत घेतलेला जुना स्टॉक विकून किंमत वाढवणं टाळलं होतं. जास्त किंमतीला विकत घेतलेलं सामान आता दुकानांमध्ये येऊ लागलं आहे. त्यामुळे किंमती वाढवणं अनिवार्य बनलं आहे. पश्चिम आशियातील तणावामुळे अनेक कंपन्या ऑगस्ट महिन्यात 8 टक्क्यापर्यंत किंमती वाढवू शकतात. कंज्यूमर इलेक्ट्रॉनिक्स कंपन्या ऑगस्टपासून सर्वच कॅटेगरीत 4 ते 6 टक्के किंमतींमध्ये वाढ करण्याच्या विचारात आहेत. यावर्षी रेफ्रिजरेटर आणि वॉशिंग मशीनच्या किंमती आधीच 10 टक्के वाढल्या आहेत. टेलीविजनच्या किंमती 15 टक्क्यापेक्षा जास्त वाढल्या आहेत. मेमरी चीपचा जास्त खर्च आणि पुरवठा कमी होत आहे. स्मार्टफोनच्या किंमती सुद्धा वाढत आहेत. कारण मागच्या आठ-नऊ महिन्यात मेमरी चिपची किंमत खूप वाढली आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us