मोठी बातमी! युद्ध सुरू असतानाच अमेरिका हादरली, थेट लॉकडाऊनची घोषणा, ट्रम्प यांना सर्वात मोठा धक्का

डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून 5 दिवस युद्ध विरामाची घोषणा करण्यात आली आहे. मात्र युद्ध विरामाची घोषणा करताच आता अमेरिका हादरली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का बसला असून, लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे.

मोठी बातमी! युद्ध सुरू असतानाच अमेरिका हादरली, थेट लॉकडाऊनची घोषणा, ट्रम्प यांना सर्वात मोठा धक्का
Donald Trump
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 24, 2026 | 3:16 PM

युद्धामुळे मध्य पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे. 28 फेब्रुवारी रोजी इस्त्रायलने इराणवर हल्ला केला आणि या भीषण युद्धाला सुरुवात झाली. या युद्धात इस्त्रायलची साथ देताना अमेरिकेनं देखील उडी घेतली. आपण काही दिवसांमध्येच इराणचा पराभव करू, असा डोनाल्ड ट्रम्प यांचा अंदाज होता. मात्र आता युद्धात अमेरिका आणि इस्त्रायल पूर्णपणे अडकले आहेत. हे युद्ध सुरू असतानाच डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून पाच दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा करण्यात आली, मात्र इराणकडून त्यावर अमेरिका आणि इस्त्रायलला स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत युद्ध सुरूच राहील असा पवित्रा आता इराणने घेतला आहे. त्यामुळे अमेरिका आणि इस्त्रायलयच्या अडचणी वाढल्या आहेत. दरम्यान या युद्धात इराणने अमेरिका आणि इस्त्रायलला घाम फोडला असतानाच आता अमेरिकेमधून एक हादरवणारी बातमी समोर आली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का बसला आहे. त्यानंतर आपत्कालीन लॉकडाऊनची घोषणा सरकारकडून करण्यात आली आहे.

अमेरिकेच्या दक्षिणेला असलेल्या टेक्सास राज्यातील एका तेल रिफायनरीमध्ये जोरदार स्फोट झाला आहे. या स्फोटानंतर या परिसरात भीषण आग लागली आहे. हा स्फोट नेमका कशामुळे झाला? याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र आग प्रचंड भडकल्यानं या भागातील लोकांना सरकारने सुरक्षित स्थळी हलवलं आहे. दरम्यान अमेरिकेच्या ज्या रिफायनरीमध्ये स्फोट झाला आहे, ती अमेरिकेतली एक प्रमुख रिफायनरी असून, या रिफायनरीमधून दररोज तब्बल 435000 बॅरल तेल प्रोसेस केलं जातं. हा अमेरिकेसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

दरम्यान इराण आणि अमेरिकेमध्ये युद्ध सुरू असतानाच या रिफायनरीमध्ये स्फोट झाल्यानं तर्क-विर्तकांना उधाण आलं आहे. हा स्फोट नेमका कशामुळे झाला याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र हा स्फोट काही तांत्रिक कारणांमुळे झाला की घातपाताचा प्रकार आहे? अशी देखील चर्चा आता सुरू झाली आहे. स्थानिक वेळेनुसार पहाटे सातच्या सुमारास हा स्फोट झाल्याची माहिती समोर येत आहे. इराणसोबत सुरू असलेल्या युद्धामुळे आधीच अमेरिकेत इंधनाचे दर भडकले आहेत, त्यातच आता हा स्फोट झाल्यानं अमेरिकेच्या अडचणी वाढल्या आहेत. दरम्यान या स्फोटामुळे आता अमेरिकेत आपत्कालीन लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली, असून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे, सरकारकडून नागरिकांसाठी हाय अर्लट जारी करण्यात आला आहे.

 

Follow Us