AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! अमेरिकाच भारताचा खरा मित्र, रशिया, चीनला जे जमलं नाही ते ट्रम्प यांनी केलं , टॅरिफनंतर आता भारताला सर्वात मोठं गिफ्ट

एकीकडे अमेरिकेनं भारतावर टॅरिफ लावला आहे, मात्र दुसरीकडे आता अमेरिकेतूनच भारतासाठी गुडन्यूज आली आहे, अमेरिकेकडून भारताला मोठं गिफ्ट मिळालं आहे. मोठी बातमी समोर आली आहे.

मोठी बातमी! अमेरिकाच भारताचा खरा मित्र, रशिया, चीनला जे जमलं नाही ते ट्रम्प यांनी केलं , टॅरिफनंतर आता भारताला सर्वात मोठं गिफ्ट
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 30, 2025 | 5:33 PM
Share

भारतीय अर्थव्यवस्थेच्या मजबुतीचा डंका सध्या संपूर्ण जगभरात वाजत आहे. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) चा नुकताच एक रिपोर्ट समोर आला आहे, ज्या रिपोर्टमधून हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे की, सध्या जगभरातील अनेक प्रमुख देशांसाठी गुंतवणूक करण्यासाठी भारत एक ‘हॉटस्पॉट’ बनलं आहे. आर्थिक वर्ष 2024 -25 मध्ये भारतात होणाऱ्या परदेशी गुंतवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. विशेष म्हणजे भारतात आतापर्यंत जेवढी काही परदेशी गुंतवणूक झाली आहे, त्यातील जवळपास 33 टक्के गुंतवणूक म्हणजे 100 रुपयांमधील 33 रुपये गुंतवणूक ही केवळ दोनच देशांनी केली आहे, भारतामध्ये ज्या देशांनी गुंतवणूक केली, त्यामध्ये सर्वाधिक गुंतवणूक करणाऱ्या देशांमध्ये अमेरिका प्रथम क्रमांकावर तर सिंगापूर दुसर्‍या क्रमांकावर आहे.

अमेरिका आणि सिंगापूर या दोन्ही देशांनी मिळून भारतामध्ये एकूण गुंतवणुकीपैकी 33 टक्के गुंतवणूक केली आहे. बुधवारी आरबीआयकडून ‘सर्वे ऑफ फॉरेन लायबिलिटी अँड असेट’ आर्थिक वर्ष 2024-25 सादर करण्यात आला आहे, या अहवालामधून ही माहिती समोर आली आहे. या रिपोर्टनुसार भारतामध्ये परदेशी गुंतवणूक मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अमेरिका आणि सिंगापूरने भारतामध्ये सर्वाधिक गुंतवणूक केली आहे.

आरबीआयच्या ताज्या आकडेवारीनुसार भारतात होणारी परदेशी गुतंवणूक वाढून 68.75 लाख कोटी रुपयांच्या रेकॉर्ड स्तरावर पोहोचली आहे. गेल्या वर्षी हा आकडा 61.88 लाख कोटी रुपये एवढा होता, गेल्या वर्षीच्या तुलनेत हा आकडा मोठ्या प्रमाणात वाढला आहे, भारतामध्ये होणार्‍या परदेशी गुंतवणुकीमध्ये 11.1 टक्के एवढी वाढ झाली आहे. यातील एकूण 20 टक्के गुंतवणूक ही एकट्या अमेरिकेची आहे. तर दुसऱ्या नंबरला सिंगापूरचा नंबर लागतो, सिंगापूरने भारतात एकूण गुंतवणुकीपैकी 14.3 टक्के गुंतवणूक केली आहे. त्यानंतर मॉरिशिशचा नंबर लागतो, मॉरिशसने भारतात 13.3 टक्के गुंतवणूक केली आहे तर ब्रिटनने 11.2 टक्के गुंतवणूक केली आहे.

एकीकडे अमेरिकेनं भारतावर टॅरिफ लावला आहे, मात्र दुसरीकडे गुंतवणुकीमध्ये देखील मोठी वाढ झाल्याचं पहायला मिळत आहे. अमेरिकेनं भारतामध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. अमेरिका हा भारतामध्ये जगातील सर्वाधिक गुतंवणूक करणारा देश ठरला आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...